Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंढरपूर पत्नीला औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

पंढरपूर पत्नीला औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न

Surajya Digital
Last updated: 2022/11/30 at 8:31 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● दहिफळ येथील यात्रेत रथाचे दगडी चाक पायावरून गेल्याने वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे माहेरहून पैसे घेऊन येत नसल्यामुळे पत्नीस बेदम मारहाण करून तिला गोचीड मारण्याचे औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पती विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली. Pandharpur Rath yatra attempt to kill wife by taking medicine

 

याप्रकरणी सुनील लक्ष्मण लामकाने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील याचा 2009 साली तालुक्यातील खेडभोसे येथील मनीषा हिच्याबरोबर विवाह झाला होता. मात्र दारूचे व्यसन असल्यामुळे लग्नानंतर काही दिवसातच त्याने पत्नीस माहेरहून पैसे आणावेत म्हणून जाचहाट सुरू केला. सुनील वारंवार पत्नीस शिवीगाळ करून मारहाण करीत होता.

 

यामुळे चार वर्षांपूर्वी मनीषाचे वडील विठ्ठल पवार आपल्या लेकीला माहेरी घेऊन आले होते. तसेच सुनील याच्या विरोधात न्यायालयात तक्रार देखील दाखल केली होती. मात्र हा वाद सामोपचाराने मिटवण्यात आला. यानंतर पुन्हा ती सासरी नांदण्यास आली. मात्र काही दिवसात पुन्हा त्याने माहेरहून खर्चासाठी पैसे आण म्हणून तगादा लावला व मारहाण सुरू केली होती.

 

9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी मनीषा स्वयंपाक करीत असताना दारू पिऊन आलेल्या सुनीलने तिला पुन्हा शिवीगाळ करून घर खर्चासाठी वडिलांकडून पैसे आण म्हणून दमदाटी सुरू केली. तसेच उसाने मारहाण करू लागला. यामुळे मनीषाने पतीस घराबाहेर ढकलून घराचा दरवाजा बंद केला. मात्र त्याने खिडकी तोडून आत मध्ये प्रवेश केला व पत्नीला खाली पाडून घरात गोचीड मारण्यासाठी ठेवलेले औषध बळजबरीने तिला पाजले. हा गोंधळ पाहून मुलं, सासू व दीर धावून आले व तातडीने मनीषाला पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

 

रुग्णालयातून घरी आल्यानंतर मनीषा हिने पतीच्या विरोधात जाचहाट, मानसिक व शारीरिक त्रास तसेच जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यावरून आरोपी सुनील लामकाने यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यास चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

● दहिफळ येथील यात्रेत रथाचे दगडी चाक पायावरून गेल्याने वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू

 

सोलापूर – गावातील खंडोबाच्या यात्रेत रथाचे दगडी चाक पायावरून गेल्याने ६० वर्षीय वृद्ध शेतकरी गंभीर जखमी होऊन मरण पावले. ही दुर्घटना दहिफळ (ता. कळंब जि.उस्मानाबाद) येथे मंगळवारी (ता. 29) दुपारच्या सुमारास घडली.

 

गोरख निवृत्ती खंडागळे (वय ६० रा. दहिफळ ता.कळंब) असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. काल दुपारी ४ वाजेच्या सुमारास गावात खंडोबाच्या यात्रेनिमित्त रथाची मिरवणूक निघाली होती. त्या मिरवणुकीत गोरख खंडागळे हे देखील दर्शनासाठी गेले होते. गर्दीमध्ये ते रथाजवळ खाली कोसळले.

 

त्यावेळी रथाचे दगडी चाक त्यांच्या दोन्ही पायावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उस्मानाबाद येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात सचिन खंडागळे (मुलगा) यांनी दाखल केले असता ते उपचारापूर्वीच मयत झाले. मयत गोरख खंडागळे यांच्या पश्चात २ मुले आणि २ मुली असा परिवार आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.

 

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

TAGGED: #Pandharpur #Rathyatra #attempt #kill #wife #bytaking #medicine, #पंढरपूर #पत्नी #औषध #पाजून #जीवे #मारण्याचा #प्रयत्न #रथयात्रा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तुळजापूर तीर्थक्षेत्र आता रेल्वेच्या नकाशावर झळकणार; 452 कोटींचा निधी मंजूर
Next Article शेतकऱ्याच्या लेकीची उत्तुंग भरारी : एमपीएससीच्या दोन परीक्षा, पहिल्याच प्रयत्नात पास

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?