Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंढरपुरातील संचारबंदीचा फेरविचार करावा, दोन्ही आमदारांनी घेतली भेट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

पंढरपुरातील संचारबंदीचा फेरविचार करावा, दोन्ही आमदारांनी घेतली भेट

Surajya Digital
Last updated: 2021/08/13 at 10:38 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पंढरपूर : पंढरपूरसह पाच तालुक्यात लावण्यात आलेल्या संचारबंदी विरोधात पंढरपुरातील वातावरण संतप्त असताना आज संचारबंदीच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी  आ. प्रशांत परिचारक व आ. समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

आ. परिचारक यांनी पंढरपुरात लावण्यात आलेली संचारबंदी ही व्यापारी व जनतेवर अन्याय करणारी असून याआधी वर्षातील सर्व यात्रांवर बंदी घालल्याने पंढरपूरची अर्थव्यवस्था उध्दवस्त झालेली आहे. आषाढी यात्रेत लावलेल्या संचारबंदी व सर्व नियमांचे पालन करीत जनता व व्यापारी यांनी प्रशासनास सहकार्य केले आहे.

आता पंढरपूर शहरातील कोरोना संक्रमण नग्यण असून ग्रामीण भागात वाढणार्‍या रुग्णांमुळे पंढरपुरला निर्बधांचा त्रास सहन करावा लागत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तरी सर्व जनता व व्यापारी यांचा विचार करुन आपण संचारबंदीच्या निर्णयाबाबत फेरविचार करावा, जसे पुणे शहर व ग्रामीण अशी विभागणी करुन पुणे शहराला निर्बधातून सुट दिली आहे तशीच सुट पंढरपूरला मिळावी अशी मागणी आ. परिचारक यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली.

याबाबत व्यापारी व जनतेचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर हे पंढरपुरात येणार असून ते सर्व व्यापार्‍यांसोबत बैठक घेतील व त्यामध्ये या निर्णयाबाबत विचार करण्यात येईल असे सांगण्यात आले. आ.प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही भेटले व त्यांना या प्रश्‍नात लक्ष घालण्याची विनंती केली. या प्रसंगी आ. रणजितसिंह मोहिते पाटील हे सुध्दा उपस्थित होते.

अत्यंत गडबडीत असतानाही आमदार परिचारक यांच्या विनंतीला मान देऊन मुख्यमंत्र्यांनी या बाबत आ. परिचारक व आ.आवताडे यांच्याशी चर्चा केली. आ. प्रशांत परिचारक यांनी पंढरपुरात लावण्यात आलेल्या संचारबंदी उठविण्याबाबत थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने संचारबंदीबाबत तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #curfew #Pandharpur #reconsidered #twoMLAs #met, #पंढरपुरातील  #संचारबंदीचा  #फेरविचार  #दोन्ही #आमदारांनी #भेट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोरोना काळात आश्रय दिल्याचा गैरफायदा घेवून चालकाने महिला अधिकार्‍याशी केले दुष्कर्म
Next Article नाशिकमध्ये उद्यापासून हेल्मेट सक्ती, हेल्मेट असेल तरच मिळेल पेट्रोल

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?