Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंढरपूर सुराज्य इम्पॅक्ट ! श्री विठ्ठल मंदिर परिसर झाला अतिक्रमण मुक्त
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

पंढरपूर सुराज्य इम्पॅक्ट ! श्री विठ्ठल मंदिर परिसर झाला अतिक्रमण मुक्त

Surajya Digital
Last updated: 2022/11/28 at 10:12 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● अतिक्रमण काढण्यासाठी दैनिक सुराज्यची भूमिका महत्त्वाचीसोलापूर । फॉर्म्युनर कार कालव्यात कोसळली; लावणी कलावंत मीना देशमुखांचे निधन

पंढरपूर : श्री विठ्ठल मंदिर परिसरात व्यपारांनी केलेल्या स्थानिक रहिवाशांच्या घरावर हातोडा पडणार या आशयाची बातमी दैनिक सुराज्यने प्रसिद्ध केल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण काढण्याची भूमिका घेतली आहे. तर व्यपारांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. व्यपाऱ्यांनी अतिक्रमण काढल्यामुळे श्री विठ्ठलाने मोकळा श्वास घेतला आहे. Pandharpur Surajya Impact! Shree Vitthal Mandir Precinct became Encroachment Free Corridor Business Administration

 

दैनिक सुराज्यच्या दणक्यानंतर नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले. अतिक्रमण काढण्यासाठी व्यपाऱ्यांना आज (सोमवार) पर्यंतचे अल्टिमेटम दिले होते. व्यपाऱ्यांनी चौफाळा ते पश्चिम द्वार आणि महाद्वार ते महाद्वार चौक पर्यंत सर्व अतिक्रमण स्वयंस्फुर्तीने काढली आहेत. मात्र काहीची अतिक्रमण स्पष्ट दिसत असताना आपले दुकान कॅरिडॉरमध्ये जाणार आहे. अतिक्रमण काढून काय फायदा म्हणत अतिक्रमण तसेच ठेवले आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाला जबाबदारीने अतिक्रमण काढण्याची वेळ येणार आहे.

मंदिर परिसरातील चौफाळा ते पश्चिम द्वार आणि महाद्वार ते महाद्वार चौक या रस्त्यावरील अतिक्रमणे व्यापाऱ्यांनी काढल्यामुळे हे दोन्ही रस्ते भले मोठे दिसू लागले आहेत. व्यापाऱ्यांच्या अडमुटपणामुळे आजपर्यंत दहा पाच दहा फुटांचे अतिक्रमण रस्त्यावर केले होते. त्यामुळेच कॅरीडोरचा विषय समोर आला होता. आज या रस्त्यावरून जाणाऱ्या भाविकांना रस्ते हे मोकळे मोकळे दिसत आहेत. त्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणातून श्री विठ्ठल मुक्त झाला झाला आहे.

 

 

● व्यापाऱ्यांचे अडमुटपणाची भूमिका कायम

मंदिर परिसरातील बहुतांश अतिक्रमण केलेल्या व्यापाऱ्यांनी आपले अतिक्रमण हे स्वयंस्फूर्तीने काढले आहे. मात्र काही व्यापारी हे आपल्या अतिक्रमण काढण्यासाठी अद्यापही तयार नाहीत नगरपालिकेने अतिक्रमण काढण्यासाठी अल्टिमेटम दिलं होतं. अतिक्रमणित भागावर लाल रंगाचा कलर लावण्यात आला आहे. मात्र व्यापारी अतिक्रमण काढण्यासाठी तयार नाहीत. त्यांच्या या अडमुटपणाच्या भूमिकेमुळे इतर व्यापारी आणि स्थानिक रहिवाशांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

□ कॅरिडोरच्या भीतीने अनेक वर्षांची अतिक्रमणे निघाली

मंदिर परिसरात नगरपालिकेने अनेक वेळा अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली होती. मात्र मंदिर परिसर व्यापारी संघटनेने प्रत्येक वेळी आंदोलनाचे हत्यार उपसत असल्यामुळे अतिक्रमणे काढण्यास अडथळा येत होता. त्यामुळे नगरपालिकेच्या अतिक्रमण मोहीम थांबवावी लागत होती. अनेक वेळा प्रशासन आणि व्यापारी संघटनेमध्ये संघर्ष झाला होता. तरी देखील व्यापाऱ्यांनी आपली अतिक्रमणे काढली नव्हती. मात्र कॉरिडॉरच्या भीतीपोटी व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली अतिक्रमणे काढली आहेत. त्यामुळे रस्ते मोकळे झाले आहेत. अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनावरचा मोठा ताण दैनिक ‘सुराज्य’मुळे हलका झाला आहे.

 

 

● अतिक्रमण काढण्यासाठी दैनिक सुराज्यची भूमिका महत्त्वाची

“विठ्ठल मंदिर परिसरात व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे स्थानिकांच्या घरावर हातोडा पडणार” या आशियाची बातमी दैनिक सुराज्यने प्रसारित केली होती. या बातमीची प्रशासनाने चांगली दखल घेत अतिक्रमण काढण्याचा विषय हाती घेतला होता. अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाने मोठी तयारी केली आहे. त्यासाठी लागणारे मोठा पोलिसांचा फौजफाटा मागवण्यात आला आहे.

 

सोलापूर । फॉर्म्युनर कार कालव्यात कोसळली; लावणी कलावंत मीना देशमुखांचे निधन

सोलापूर : ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे अपघातात निधन झाले आहे. पंढपूरजवळ एक फॉर्म्युनर कार 50 फूट खोल कालव्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. रविवारी (ता. 27) रात्रीच्या सुमारास अपघात झाला.

या रस्त्यावरुन जाताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातातील जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. यावेळी त्या मोडलिंबकडून पंढरपूरकडे चालल्या होत्या. फॉर्च्युनर कार 50 फूट खोल कालव्यात कोसळली या अपघातात कलावंत मीना देशमुख यांचे निधन झाले. तर तीन जखमी झाले आहेत. पंढरपूर कुर्डुवाडी रस्ताच्या चौपदीकरणाचं काम सुरु असल्यामुळे या पुलावर नेहमी अपघात घडतात. रात्रीच्या वेळी या अरुंद पुलावरून जात असता कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार 50 फूट खोल कालव्यात कोसळली.

या अपघातात लावणी कलावंत यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची कन्या, नातं, आणि वाहन चालक हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची कार ज्या कालव्यात पडली त्या ठिकाणी उतरायला जागा नाही. अपघाताची माहिती मिळतातच स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य सुरु केले. रुग्णवाहिका बोलावून तातडीने दोऱ्याच्या साहाय्याने जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.

 

स्थानिकांनी जखमींना दोरीच्या साहाय्याने बाहेर काढले आणि उपचारासाठी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या अपघातात मीना देशमुख यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. रात्री या रस्त्यावरील अरुंद पूल ओलांडताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार खोल कालव्यात पडल्याचे सांगण्यात येत आहे.

पंढरपूर – कुर्डूवाडी रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असताना पाटबंधारे विभागाच्या अनास्थेमुळे या पुलाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे हा पूल सध्या प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आलंय.

You Might Also Like

उजनीतून ३७ लाख युनिट वीजनिर्मिती

सोलापूर विमानतळ परिसराची संयुक्त पाहणी

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

TAGGED: #Pandharpur #Surajya #Impact! #Shree #VitthalMandir #Precinct #EncroachmentFree #Corridor #Business #Administration, #कॉरिडॉर #व्यापारी #प्रशासन #फौजफाटा, #पंढरपूर #सुराज्य #इम्पॅक्ट ! #श्री #विठ्ठल #मंदिर #परिसर #अतिक्रमणमुक्त
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यपालांची पदमुक्त होण्याची इच्छा ! महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ
Next Article गोवरचे सोलापुरात आढळले दोन संशयित रुग्ण; लसीकरण – सर्वेक्षणाच्या कामाला वेग

Latest News

वडोदरा पूल दुर्घटना – पंतप्रधानांकडून मृतांच्या कुटुंबियांसह जखमींसाठी आर्थिक मदत जाहीर
Top News July 9, 2025
संजय गायकवाडांना समज देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राजकारण July 9, 2025
इंग्लंडचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक गोल्डमन सॅक्समध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून सामील होणार
देश - विदेश July 9, 2025
महाराष्ट्रासारखंच बिहारमध्ये मतांच्या चोरीचा प्रयत्न सुरू – राहुल गांधी
Top News July 9, 2025
मला सरकार चालवल्याबद्दल नोबेल मिळाला पाहिजे- अरविंद केजरीवाल
Top News July 9, 2025
राजस्थानात हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले, दोन मृतदेह सापडले
देश - विदेश July 9, 2025
केजरीवालांच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टाची ईडीला नोटीस
Top News देश - विदेश July 9, 2025
मुंबई, मराठी माणसाच्या भल्यासाठी राज आणि मी एकत्र आलोय – उद्धव ठाकरे
राजकारण July 9, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?