Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंढरपूर तालुका परिसरात नवजात अर्भक आढळले; रुग्णालयात दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

पंढरपूर तालुका परिसरात नवजात अर्भक आढळले; रुग्णालयात दाखल

Surajya Digital
Last updated: 2022/02/20 at 9:39 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

पंढरपूर – तालुक्यातील नारायण चिंचोली जवळ रात्रीच्या सुमारास चारचाकी वाहनातून जाणाऱ्या अविनाश वसेकर यांना पुरुष जातीचे नवजात अर्भक आढळून आले. ही घटना काल शनिवारी (ता. १९) रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

अविनाश वसेकर हे चारचाकी वाहनातून दर्शनासाठी निघाले होते. नारायण चिंचोली येथील साईराज ढाब्याजवळ रस्त्याच्या मध्येच लहान बाळ रडत असल्याचे दिसून आले. त्यांनी आपले वाहन उभे करून पाहणी केली. तेव्हा ते  पुरुष जातीचे बाळ नुकतेच जन्मलेले असल्याचे आढळले. वसेकर यांनी इतर नागरिकांच्या मदतीने ते बाळ ताब्यात घेतले.

त्याला पंढरपुरातील शितल शहा रुग्णालयात दाखल केले. वसेकर यांनी वेळीच तत्परता दाखवली त्यामुळे बाळाचे प्राण वाचले. त्यानंतर याची माहिती पंढरपूर तालुका पोलिसांना कळविली. पोलीसांनी अनोळखी इसमाचा विरुद्ध गुन्हा दाखल केला. यासंबंधी कोणास माहिती असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक फौजदार अशोक जावळे यांनी केले आहे. Newborns found in Pandharpur taluka area; Hospitalized

□ पैशासाठी वृद्ध मातेस मारहाण; मुलाविरुद्ध ज्येष्ठ नागरिक पालन-पोषण अधिनियमाप्रमाणे गुन्हा 

सोलापूर – आम्ही वृद्ध झालो आहोत, चालू वर्षाचे उसाचे बिल तुला मिळाले. त्यापैकी काही पैसे आम्हाला देत का नाही? अशी विचारणा करणाऱ्या वृद्ध आईस पोटच्या मुलाने चापटा मारून ढकलून दिल्याची घटना पानमंगरूळ (ता.अक्कलकोट) येथे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणात अक्कलकोट साउथच्या पोलिसांनी त्यांचा मुलगा महेश बसण्णा पडणुरे (वय ४५) याच्याविरुद्ध ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालनपोषण अधिनियम आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

यासंदर्भात शिवम्मा बसण्णा पडणूरे (वय ७१) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास आपण पतीसोबत घरात बसलो होतो. त्यावेळी माझा मुलगा महेश हा घरात आला होता. तेव्हा आईने आपल्या मुलास आम्ही वृद्ध झालो आहोत, चालू हंगामातील उसाचे बिल तुला मिळाले आहे. त्यातील काहीं पैसे दोघांना देत का नाही? असे म्हणाल्या. त्यावेळी महेश याने तुम्हाला पैसे देत नाही. काय करायचे ते करा. असे म्हणत आईला  मारहाण करत ढकलून दिले. यापुढे शेती मागितल्यास दोघांना खल्लास करतो. अशी धमकीही मुलांनी दिली. हवालदार चव्हाण पुढील तपास करीत आहेत .

□ तुंगत येथे रॉडने मारहाण तरुण जखमी

तुंगत (ता.पंढरपूर) येथील फौजी हॉटेल जवळ जागेच्या वादातून रॉड आणि दगडाने केलेल्या मारहाणीत शिवाजी सदाशिव कांबळे (वय ३५ रा.तुंगत) हा जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (ता. १८) सायंकाळच्या सुमारास घडली. त्याला पंढरपूर येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिलीप गायकवाड, अविराज गायकवाड आणि अन्य दोघांनी मारहाण केली अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Newborns #found #Pandharpur #taluka #area #Hospitalized, #पंढरपूर #तालुका #परिसरात #नवजात #अर्भक #रुग्णालयात #दाखल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुख्यमंत्री के. चंद्रशेखर रावांनी घेतली शरद पवारांची भेट, तब्बल दीड तास चर्चा
Next Article ‘पावनखिंड’ चित्रपटाने रचला इतिहास, एकाच दिवसात दीड हजारांपेक्षा अधिक शो

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?