Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आजपासून दोन दिवस पंढरपूरला येणारे सर्व बस वाहतूक बंद; लोकांना एकत्र येण्यासही मनाई
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

आजपासून दोन दिवस पंढरपूरला येणारे सर्व बस वाहतूक बंद; लोकांना एकत्र येण्यासही मनाई

Surajya Digital
Last updated: 2020/11/05 at 5:27 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

पंढरपूर : आज गुरुवारी राञी बारा वाजल्यापासून शनिवारी राञी बारा वाजेपर्यंत  पंढरपूरला येणारे सर्व एसटी बससेवा बंद करण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.

मराठा समाजाचे शनिवारी पंढरपूर ते मुंबई अशी आक्रोश दिंडी निघणार आहे. या पार्श्वभूमीवर  पंढरपूर शहरात कोरोनाच प्रादुर्भाव वाढु नयेत यासाठी हे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर  मंदिर परिसरात दोनपेक्षा अधिक व्यक्तींना एकञ जमण्यास देखील मनाई करण्यात आली आहे.

मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा, सकल मराठा समाज, महाराष्ट्र राज्य या संघटनांचे वतीने मराठा आरक्षण मागणीसाठी ७ नोव्हेंबरपासून पंढरपूर- अकलुज- बारामती- आकुर्डी- निगडी- मावळ- वाशी या मार्गाने मुंबई मंत्रालय पर्यंत पायी दिंडी आक्रोश मोर्चा काढणेत येणार आहे. पायी दिंडीत मराठा समाजातील लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे यासाठी मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा, सकल मराठा समाज, महाराष्ट्र राज्य या संघटनांचे वतीने संघटनांनी आवाहन केले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

संघटनांनी मराठा समाजातील व्यक्तींना पंढरपूर येथे जमण्यासाठी जे आवाहन केलेले आहे. व त्यांचे वतीने पंढरपूर ते मंत्रालय, मुंबई असा जो आक्रोश मोर्चा काढणेत येणार आहे. त्यानुसार पंढरपूर येथे आंदोलनकर्ते एकत्र जमल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढू शकतो. त्यातून सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य व जिवितास धोका निर्माण होवू शकतो, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले.

* असा आहे जिल्हा प्रशासनाचा आदेश

– महाद्वार घाट ते नामदेव पायरी परिसर, चौफाळा ते पश्चिम द्वार परिसर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर प्रदक्षिणा मार्ग या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

– पंढरपूर शहरात दोन व दोन पेक्षा अधिक व्यक्तिना एकत्र येण्यास जमण्यास मनाई करण्यात येत आहे. व उक्त नमुद कालावधीत नामदेव पायरी दर्शन सर्वांसाठी बंद ठेवणेत येत आहे.

– मराठा आरक्षण पायी दिंडी आक्रोश मोर्चात जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील सहभागी होण्यासाठी येणारे आंदोलनकर्ते, संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना दि. ०५.११.२०२० रोजी रात्रीचे १२.०० वाजल्यापासून ते ०७ नोव्हेंबर २०२० रोजीचे रात्री १२.०० वाजेपर्यंत पंढरपूर व सोलापूर जिल्ह्यात येण्यास बंदी करण्यात येत आहे.

–  या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती/ संस्था अथवा संघटना भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०)
कलम १८८ मधील तरतूदीनुसार दंडनीय / कायदेशीर कारवाईस पात्र आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी आणि इतर कायदे आणि विनियम यानुसार कारवाई करणेत येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांचेविरुध्द संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी कारवाई करावी. असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पारीत केला आहे.

You Might Also Like

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

TAGGED: #पंढरपूर #दोनदिवस #एसटीसेवाबंद #एकत्र #येण्यासही #बंदी #जिल्हाप्रशासन #आदेश
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article गोव्यात आक्षेपार्ह चित्रीकरण करणे पडले महागात; पूनम पांडेला अटक
Next Article इतिहासातील मोठी आग ! 150 दिवसांपासून धुमसतेय; भारतातील मोठ्या आगीच्या घटना

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?