सोलापूर / पंढरपूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत सुरुवातीच्या कलानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. या ठिकाणी भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाराव्या फेरीनंतर 33229 मतांनुसार आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादीचे भागिरथ भालके 32015 मतांसह पिछाडीवर आहेत.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके, भाजपाकडून समाधान आवताडे, स्वाभिमानीचे सचिन शिंदे, अपक्ष शैला गोडसे, सिद्धेश्वर आवताडे यांच्यासह 19 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1388754796249640963?s=20
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपानेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या पोटनिवडणुकांच्या निकालातील पहिल्या फेरीत पोस्टल मतदानाची मोजणी करण्यात आली. त्यामध्ये, महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालकेंनी आघाडी घेतली होती. मात्र, नवव्या फेरीअखेर भाजपाच्या समाधान अवताडेंनी भगिरथ भालकेंना मागे टाकले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपानेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीच्या आठव्या फेरीअखेर भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. भाजपाचे समाधान आवताडे यांना आठव्या फेरीअखेर 2295 मतांची आघाडी मिळाली आहे. तर राष्ट्रवादीचे भगीरथ भालके हे पिछाडीवर आहेत. सुरुवातीला भालके आघाडीवर होते.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1388726959371218947?s=20
मंगळवेढा संपूर्ण तालुका तर पंढरपूर तालुक्यातील 35 गावे आणि पंढरपूर शहर असा पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके महाविकास आघाडीकडून तर भाजपच्या वतीने समाधान आवताडे रिंगणात होते. शिवसेनेकडून उमेदवारी मिळेल ही आशा फोल ठरल्यानंतर शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा शैला गोडसे यांनी बंडखोरी करून या निवडणुकीत उडी घेतली.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1388745833001086976?s=20
या मतदार संघाची एकूण मतदार संख्या तीन लाख 40 हजार 889 एवढी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही या मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री बच्चू कडू, गुलाबराव पाटील यांसह अन्य मंत्र्यांनी वारंवार सभा घेतल्या. तर समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत परिचारक, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, आमदार राम सातपुते, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनीही मतदारसंघ पिंजून काढला.
तृणमूलला स्पष्ट बहुमत, मात्र नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी 8 हजाराने पिछाडीवर https://t.co/vXWmv2DxAv
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021
या निवडणुकीत एकूण 65.73 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दोन लाख 24 हजार 68 मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये मतदारांनी स्व. भारत भालके यांची आमदारकीची गादी भगीरथ भालके यांच्याकडेच सोपवली की मंगळवेढ्यातील 35 गावच्या पाणी प्रश्नासाठी मतदार समाधान आवताडे यांच्या बाजूने उभे राहिले, याचा फैसला आज मतमोजणीतून होत आहे.
पंढरपूर पोटनिवडणूक : भाजपाचे समाधान आवताडे यांना 2295 मतांची आघाडी #surajyadigital #पोटनिवडणूक #सुराज्यडिजिटल #Byelection #pandharpur #पंढरपूर #भाजपा #NCP pic.twitter.com/UizMugk1N7
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021
* समाधान आवताडे यांना 4100 मतांची आघाडी
– अठराव्या फेरीअखेर भाजपाच्या समाधान आवताडे यांच्याकडे तब्बल 4100 मतांची आघाडी
– पंढरपूर शहरानंतर कासेगाव खर्डी गावातून भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांना मताधिक्य मिळाल्याचे दिसून येते.
– पंढरपूर शहर व तालुक्यातील मतमोजणी संपली; मंगळवेढ्यातील मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
– मंगळवेढा तालुक्यातील मतदानाची मतमोजणी 19 ते 38 फेरीत होणार आहे.
विरोधी पक्षनेते फडणवीसांविषयी शिवराळ भाषेचा वापर, पाचजणांवर गुन्हा https://t.co/KFrKyoEnPO
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021