मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली. याची माहिती मिळताच त्यांचे बंधू आणि समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पंकजाताई, डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच ब व्हाल, काळजी घ्या ताई, अशी पोस्ट धनंजय मुंडेंनी केली.
ताई, या विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या @Pankajamunde ताई. https://t.co/vgZ1Uvkbgt
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 29, 2021
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी करोनाची लागण झाली असून सध्या त्या विलगीकरणात आहेत. पंकजा मुंडे यांनी गुरुवारी सकाळी ट्विट करत आपल्याला करोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान यानंतर त्यांचे बंधू आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनजंय मुंडे यांनी बहिणीसाठी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी मोठा भाऊ म्हणून मी सोबत असल्याचं सांगत त्यांना धीर दिला आहे. धनंजय मुंडे यांनीही करोनाचा सामना केला असल्याने पंकजा मुंडेंना होणाऱ्या त्रासाची मला जाणीव असल्याचंही म्हटलं आहे.
https://twitter.com/Pankajamunde/status/1387631927583145986?s=19
“पंकजाताई, करोना विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या ताई,” असं धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1387683003564843021?s=19
२४ एप्रिलला शनिवारी संध्याकाळी भाजपा खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या धाकट्या बहीण प्रीतम मुंडे यांनी प्रकृती अस्वस्थ्य जाणवत असल्यामुळे उपचार घेत असल्याचा व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट केला होता. त्यावेळीही धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या होत्या.