टोकियो : टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताला आणखी एक पदक मिळालं. आहे. भारताचं हे तिसरं पदक आहे. थाळीफेक स्पर्धेत F52 गटात भारताच्या विनोद कुमारने कांस्य पदक मिळवले आहे. विनोद कुमारने पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत भारताकडून 19.91 मीटर लांब थाळी फेकत हे यश मिळवलं.
टोकयो पॅरालिम्पिकमध्ये भारताला आणखी एक पदक मिळालं आहे. उंच उडी स्पर्धेमध्ये भारताच्या निशाद कुमार याला सिल्व्हर मेडल मिळालं आहे. निशाद कुमारने 2.06 मीटर लांब उडी मारत फायनलमध्ये दुसरा क्रमांक पटकावला. भारताचं हे या स्पर्धेतील दुसरे मेडल आहे.
टोक्यो येथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतासाठी रविवारचा दिवस उत्तम ठरला आहे. भारतीय खेळाडूंनी दोन रौप्य आणि एक कांस्य अशी मिळून एकूण तीन पदके जिंकली. टेबल टेनिसपटू भाविना पटेलने दिवसाची सुरुवात रौप्यपदकाने केली. तर संध्याकाळ अखेरीस निषाद कुमारने उंच उडीत रौप्य आणि विनोद कुमारने डिस्कस थ्रोमध्ये कांस्यपदक जिंकले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उंच उडी टी-47 स्पर्धेत सहभागी झालेल्या निषादने 2.06 मीटरसह रौप्यपदक जिंकले. 2019 मध्ये पदार्पण केलेल्या निषादचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. त्याने पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकत आशियाई विक्रमाची बरोबरी केली. निषाद कुमार ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. भारतीय धावपटू राम पालची कामगिरीही स्तुत्य होती. त्याने 1.94 मीटर उडी घेऊन पाचवे स्थान मिळवले, ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे.
निषादने पदक जिंकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करून त्यांचे अभिनंदन केले. “टोक्योमधून आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. निषाद कुमारला रौप्यपदक जिंकताना पाहून खूप आनंद झाला. उत्कृष्ट कौशल्य आणि चिकाटी असलेला तो एक उल्लेखनीय खेळाडू आहे. त्याचे अभिनंदन”, असे मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. निषादसोबत मोदींनी कांस्यपदक पटकावलेल्या विनोद कुमारचेही अभिनंदन केले.
दरम्यान भारताचा रामपाल पाचव्या क्रमांकावर राहिला. टोकयो पॅरालिम्पिक्समधलं भारताचं हे दुसरं मेडल आहे. रविवारी सकाळी महिला पॅडलर भाविना पटेलने चंदेरी कामगिरी करत रौप्य पदकाला गवसणी घातली होती. भाविनाने देशाला रौप्य मिळवून दिलं असून अशी कामगिरी करणारी ती पहिलीच महिला आहे.