Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘उद्या सकाळी मातीला या’ असं व्हॉटसअ‌ॅप स्टेटस ठेवून शेतक-याची आत्महत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रशिवार

‘उद्या सकाळी मातीला या’ असं व्हॉटसअ‌ॅप स्टेटस ठेवून शेतक-याची आत्महत्या

Surajya Digital
Last updated: 2021/02/03 at 10:08 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

परभणी : जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं कर्जवसुलीच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे शेतकऱ्यानं उद्या सकाळी मातीला या असं व्हॉटसअ‌ॅप स्टेटस ठेवून आत्महत्या केली आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्यांचं सत्र काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही.

चंद्रकांत धोंडगे असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. धोंडगे यांच्या आत्महत्येनं तिवठाणा गावामध्ये खळबळ उडाली आहे. परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील तिवठाणा या गावात चंद्रकांत उर्फ मुंजाजी धोंडगे हे शेती करायचे.
त्यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी वारंवार धमक्या येत होत्या. कर्ज वसुलीच्या तगाद्या कंटाळून चंद्रकांत भगवान धोंडगे यांनी आत्महत्या केली. धोंडगे यांनी आत्महत्या करत असल्याबाबतचं स्टेटस व्हॉटसअ‌ॅपवर ठेवले होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* पैश्यांमुळे मला त्रास झाला

माझ्या मुलांचा सांभाळ करावा उद्या सकाळी माती आहे सर्वांनी यावे. चंद्रकांत धोंडगे यांनी आत्महत्येपूर्वी व्हॉट्सअ‌ॅपवर ‘आपल्याला पैशासाठी धमक्या येत आहेत म्हणून मी आत्महत्या करत आहे. माझ्या मुलांचा सांभाळ करावा उद्या सकाळी माती आहे सर्वांनी यावे. पैश्यांमुळे मला त्रास झाला आहे.’ असं स्टेटस ठेऊन चंद्रकांत धोंडगे यांनी विषारी औषध प्राशन केले.

चंद्रकांत धोंडगे यांच्या व्हॉट्सअ‌ॅप स्टेटसची माहिती त्यांचे काका हणमंत धोंडगे यांनां मिळताच त्यांनी शेतात धाव घेतली. हणमंत धोडगे शेतात पोहोचले तेव्हा चंद्रकांत धोंडगे अत्यावस्थ अवस्थेत आढळून आले. हणमंत धोंडगेंनी चंद्रकांत धोंडगे यांना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयत दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर चंद्रकांत धोंडगे यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. चंद्रकांत धोंडगे यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

You Might Also Like

‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष

भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण

TAGGED: #Parbhani #farmercommit #suicide #afterputting #statuson #WhatsApp, #उद्यासकाळीमातीलाया #व्हॉटसअ‌ॅप #स्टेटसठेवून #शेतक-याची #आत्महत्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सरकारमध्ये असून माझ्याकडे मागणी करतात, राज्य सरकार नेमकं काय करतंय?; राज्यपालांचा सवाल
Next Article शनिवारी देशव्यापी चक्काजाम आंदोलन, केंद्र सरकारला दिली ऑक्टोबरपर्यंत डेटलाईन

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?