Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: परेश रावल यांनी अक्षय कुमारला व्याजासहित पैसे केले परत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

परेश रावल यांनी अक्षय कुमारला व्याजासहित पैसे केले परत

admin
Last updated: 2025/05/25 at 4:14 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 25 मे (हिं.स.)।’हेरा फेरी ३’ हा चित्रपट घोषणा झाल्यापासूनच काहीना काही कारणांनी चर्चेत आहे. चित्रपटातील बाबू भैय्या म्हणजेच अभिनेते परेश रावल यांनी एक्झिट घेतल्याची घोषणा केल्यापासूनच या चर्चा अधिक वाढल्या आहेत. परेश रावल यांच्या एक्झिटच्या घोषणेनंतर अक्षय कुमारच्या ‘केप ऑफ गुड फिल्म्स’ कंपनीद्वारे त्यांना २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावल्यात आला होता. त्यानंतर आता शनिवार, २४ मे रोजी परेश यांनी ही रक्कम अक्षयच्या प्रोडक्शन हाऊसला १५ टक्के व्याजासह परत केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटासाठी परेश यांचे एकूण मानधन १५ कोटी रुपये निश्चित करण्यात आलं होतं. त्यापैकी परेश यांनी त्यांना देण्यात आलेले ११ लाख रुपये हे व्याजासह परत केले. अशातच परेश रावल यांनी आज रविवार, २५ मे २०२५ रोजी एक नवीन ट्विट केले. या ट्विटवरुन हे स्पष्ट होते की, त्यांच्यात आणि चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये अद्याप काही आलबेल नाही.

निर्मात्यांना व्याजासह परत केलेल्या ११ लाख रुपयासंबंधीच्या वृत्तांबद्दलच परेश यांनी एक्सवर ट्विट शेअर केलं आहे. परेश यांनी शेअर केलेल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे, ‘माझे वकील अमित नाईक यांनी माझ्या चित्रपटातून बाहेर पडण्याबाबत योग्य ते उत्तर पाठवले आहे. एकदा त्यांनी माझे उत्तर वाचले की, सर्व समस्या सुटतील.’ दरम्यान, परेश यांनी शेअर केलेल्या ट्विटखाली अनेक चाहत्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसंच या संबंधित अनेक प्रश्नही विचारले आहेत.

दरम्यान, अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल हे त्रिकूट पुन्हा एकदा ‘हेरा फेरी ३’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं जाहीर तेव्हापासूनच चाहते मंडळींमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र, बाबू भैय्या म्हणजेच अभिनेते परेश रावल यांनी या चित्रपटात काम करणार नसल्याचं जाहीर करताच चाहत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यामुळे अनेक चाहते त्यांना पुन्हा एकदा या चित्रपटाचा भाग होण्यासाठी विनंती करताना दिसत आहेत.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article डेहराडूनमधील ‘राष्ट्रपती निकेतन’ 24 जूनपासून सर्वसामान्यांसाठी होणार खुले
Next Article अनुष्का-विराटने घेतलं अयोध्येतील हनुमान गढी मंदिरात दर्शन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?