Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंढरपूर । अभिजीत पाटलांची विधानसभेची प्रॅक्टिस; पक्ष आणि मतदारसंघ लवकरच ठरणार ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

पंढरपूर । अभिजीत पाटलांची विधानसभेची प्रॅक्टिस; पक्ष आणि मतदारसंघ लवकरच ठरणार ?

Surajya Digital
Last updated: 2022/12/12 at 9:48 PM
Surajya Digital
Share
6 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सोलापुरात आले तसे निघून गले; आशेने आलेले नागरिक निराश होऊन परतले

पंढरपूर /सूरज सरवदे : अल्पावधीतच साखर कारखानदारीमध्ये आपल्या नावाचा ठसा महाराष्ट्रात उमटवणारे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील आता विधानसभेच्या आखाड्यात उतरणार का?  Pandharpur. Abhijit Patal’s Legislative Assembly practice ; Party and constituency soon? Vitthal Cooperative Sugar Factory असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचं कारण असं की, पाटील यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ आणि माढा मतदारसंघ या दोन्ही विधानसभा मतदारसंघात विधानसभेची प्रॅक्टिस सुरू केली आहे.

 

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन हा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचा आमदारकीचा उमेदवार असतो, असे समीकरण आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा जरी पंढरपूर तालुक्यात असला तरी तो माढा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात येतो. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पाटील यांना मिळालेले मताधिक्य हे माढा मतदार संघातून मिळाले आहे. त्यामुळे पाटील यांचे माढा विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत असल्याचा अनुमान आहे.

 

अभिजित पाटील यांचे मतदान देखील माढा मतदारसंघात आहे. तसेच ते माढा मतदारसंघातील गावांमध्ये जास्तीत जास्त दौरे करत असतात. पंढरपूर तालुक्यातील ४२ गावातून त्यांनी जवळपास १०० वेळा दौरे केले आहेत. उसाच्या माध्यमातून ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचत आहेत. गावातील प्रत्येक नागरिकांशी वन टू वन संपर्क साधण्यावर त्यांचा भर आहे.

 

सध्या ग्रामपंचायतच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकांमध्येही पाटील यांनी आपले सहकारी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे. एकंदरीतच पाटील हे आपला गट वाढवण्याच्या तयारीत आहेत. कारण त्यांना येणारी विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर दिसत आहे. त्याच पध्दतीने पाटील यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावांचा दौरा देखील केला आहे. अलीकडच्या काळात पाटील यांनी मंगळवेढा मध्ये लक्ष घातल्याचे दिसून येत आहे.

 

नवरात्रीमध्ये पाटील यांनी मंगळवेढ्यामध्ये देवीच्या दर्शनानिमित्त दौरा करून मतदारसंघाची पाहणी केली आहे. तसेच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील एकही कार्य ते सोडत नाहीत. प्रत्येक ठिकाणी ते स्वतः जातात असाच अनुभव आहे. मंगळवेढा येथील प्रस्तावित शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी ५ लाख ५१ हजार रुपयाची मदत केली होती. यावरूनच माढा पाठोपाठ पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघात पाटील हे चाचपणी करत आहेत, हे दिसून येत आहे.

 

माढा मतदारसंघातून भाजपकडून त्यांना यापूर्वीच विचारणा झाली होती. त्यामुळे भाजपच्या तिकिटावर माढा विधानसभा ते लढू शकतील तर पंढरपूर मंगळवेढा हा भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची निवडणूक लढू शकतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

》 मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सोलापुरात आले तसे निघून गले; आशेने आलेले नागरिक निराश होऊन परतले

 

● डाकबंगल्यात उत्तरासाठी आलेले प्रश्नच घेऊन गेले

 

सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री; त्यांच्यासोबतीला जिल्ह्याचे पालकमंत्री, शिवाय अन्य काही मंत्री आणि वरिष्ठांचेही वरिष्ठ अधिकारी एकाचवेळी सोलापूर दौऱ्यावर आलेले. त्यांच्या समोर आपले प्रश्न मांडून, निवेदने देऊन समस्या सोडवून घेण्यासाठी विविध क्षेत्रातील शेकडो नागरिकही जिल्ह्यातून सोलापुरात आलेले. मंत्रिमहोदय सर्वांची निवेदने डाकबंगल्यातच स्वीकारणार असल्याचे त्यांना प्रशासनाकडून सांगण्यात आलेले. मात्र झाले उलटेच. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जसे आले तसे निघून गेले. त्यांच्या भेटीतून उत्तर मिळवण्यासाठी आलेले नागरिक स्वतःचा प्रश्न आहे तसा घेऊन निराशेने निघून गेले.

 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्यासह अन्य काही मंत्री, राज्यातील वरिष्ठ आणि अतिवरिष्ठ अधिकारी रविवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यांना भेटून विविध समस्यांचे निवेदन देऊन प्रश्न सोडवून घेण्यासाठी जिल्ह्यातून शेकडो नागरिक सोलापुरात आले होते. सर्वांची निवेदने सातरस्ता परिसरातील डाकबंगल्यातच स्वीकारली जातील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.

 

त्यामुळे निवेदन देण्यासाठी आलेल्या नागरिकांची डाकबंगल्यात गर्दी झाली होती. निवेदनकर्त्यांना पोलिसांनी डाकबंगल्यातून बाहेर पडून दिले नाही आणि मंत्रिमहोदय डाकबंगल्याकडे फिरकले नाहीत. त्यामुळे विविध समस्यांनी पछाडलेले नागरिक त्यांची समस्या आहे तशी सोबत घेऊन निराशेने निघून गेले.

 

 

● सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच

 

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्रच येणार असल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी सकाळी अकरापासूनच डाकबंगल्यात गर्दी केली होती. दुपारी बारानंतर या गर्दीत वाढ होत गेली. दुपारी तीनच्या सुमारास तर गर्दी आवरण्यासाठी वेगळा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सायंकाळी पाचच्या दरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे विमान उडाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आल्यानंतर डाकबंगल्यातली गर्दी ओसरली.

● शेतकरी, कर्मचारी, कामगार अन् मजूर….

अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले; मात्र त्याची भरपाई मिळाली नाही, असे शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे होते. बारा-बारा वर्षे काम केल्यानंतर घरी पाठवलेले वीज मंडळातील कर्मचारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आले होते. आपली जगावेगळी समस्या घेऊन तृतीयपंथी समुदाय डाकबंगल्यात एकवटला होता. शेतमजूरही आपले दुःख मंत्रिमहोदयांना सांगण्यासाठी आले होते. विविध पक्षांचे काही कार्यकर्तेही स्टार्चचे कडक कपडे घालून आले होते. पण सर्वांचीच निराशा झाली.

 

● प्रलंबित प्रश्न राहिले प्रलंबित

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले प्रश्न घेऊन नागरिक आले होते. गेल्या अनेक महिन्यांनंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकत्रच सोलापुरात आले होते. डाकबंगल्यात निवेदनकर्त्यांची गर्दी झाली होती. पण झाले उलटेच. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होटगी रोड विमानतळावरून कार्यक्रमस्थळी गेले. कार्यक्रम आटोपून थेट विमानतळ गाठले. त्यामुळे निवेदने देताच आली नाहीत. परिणामी प्रलंबित प्रश्न प्रलंबितच राहिले.

 

You Might Also Like

लंडनमध्ये उड्डाणानंतर विमान कोसळण्याची दुर्घटना

देशभरात मान्सूनचा जोर; मप्र-राजस्थानात पूरस्थिती, वीज कोसळून, बुडून पाच जणांचा मृत्यू

राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून उज्ज्वल निकमांसह चौघे राज्यसभेवर

दिग्गज दाक्षिणात्य अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचे निधन

भारतीय महिला संघाने इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका ३-२ ने जिंकली

TAGGED: #Pandharpur #AbhijitPatil #Legislative #Assembly #practice #Party #constituency #soon #Vitthal #Cooperative #SugarFactory, #पंढरपूर #अभिजीतपाटील #विधानसभा #प्रॅक्टिस #पक्ष #मतदारसंघ #लवकरच #ठरणार #विठ्ठलसहकारी #साखर #कारखाना
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंढरपूरच्या कॉरिडॉरविरोधात भाजपचे डॉ. स्वामी उतरले मैदानात, नरेंद्र मोदींना म्हणाले रावण
Next Article नौदलाचा ऐतिहासिक निर्णय, नौदलात महिलांनाही कमांडो होण्याची संधी

Latest News

भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध थांबले नसते तर पुढे अण्वस्त्र युद्ध झालं असतं – डोनाल्ड ट्रम्प
देश - विदेश July 15, 2025
निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा पुढे ढकलली
देश - विदेश July 15, 2025
पहलगाम हल्ला : आयएसआय व लश्कर-ए-तोयबाचा कट
देश - विदेश July 15, 2025
मुंबई आणि उपनगरांना मुसळधार पावसाचा तडाखा; ऑरेंज अलर्ट जारी
महाराष्ट्र July 15, 2025
टेस्लाचे स्मार्ट एसयूव्ही मॉडेल Y भारतात लाँच; किंमत ५९. ८९ लाखांपासून सुरू
देश - विदेश July 15, 2025
गणपतीसाठी कोकणात एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार – प्रताप सरनाईक
देश - विदेश July 15, 2025
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी घेतली चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट
देश - विदेश July 15, 2025
देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी १ ऑगस्टपासून मुंबईत धावणार
महाराष्ट्र July 15, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?