Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर । सीआयडीच्या हातावर ‘तुरी’ देवून पीआयसह सात पोलीस पसार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

सोलापूर । सीआयडीच्या हातावर ‘तुरी’ देवून पीआयसह सात पोलीस पसार

Surajya Digital
Last updated: 2023/05/20 at 5:25 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
○ दोन दिवस झाले, शोधूनही थांगपत्ता लागेना !स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

○ दोन दिवस झाले, शोधूनही थांगपत्ता लागेना !

सोलापूर : पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी पसार झाला, अशा आशयाच्या बातम्या आपल्याला कधी कधी वाचायला मिळतात पण सोलापुरात एक अफलातून प्रकार घडला आहे. एका पीआयसह सात पोलीस सीआयडीच्या पथकाला गुंगारा देऊन पसार झाल्याने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून हे पथक सोलापुरात तळ ठोकून आहे. या पथकाने सारे शहर पिंजून काढले. जिल्ह्यात शोध मोहीमही सुरू आहे. हे पोलीस सीआयडीच्या हाती लागले नाहीत. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) पथक डेथ इन कस्टडीच्या प्रकरणात आपल्याला अटक करण्यासाठी आल्याचे समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षकासह ७ पोलीस गुरुवारी मध्यरात्री ड्यूटी सोडून पसार झाले आहेत. सीआयडीच्या पथकाने त्यांची शोध मोहीम अधिक तीव्र केली आहे. सीआयडीचे पथक संबंधितांचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक गिरीष दिघावकर यांनी दिली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, सप्टेंबर २०२१ मध्ये घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी भीमा रज्जा काळे (४२, रा. भांबुरे वस्ती, पारधी वस्ती, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) याला अटक केल्यानंतर त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. पोलिसांनी त्याला मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला.

उपचारासाठी आरोपीला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा दि. ३ ऑक्टोबर २०२१ रोजी मृत्यू झाला. विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या कोठडीत त्याला मारहाण झाला होती. मारहाणीत मृत्यू झाल्याने प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

पोलिसांच्या मारहाणीमुळे आणि हलगर्जीपणामुळे आरोपींचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत सीआयडीने त्यावेळी विजापूर नाका पोलीस स्टेशनचे आणि सध्या चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह शामराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार मारुती कोल्हाळ, पोलीस अंमलदार श्रीरंग खांडेकर, पोलीस तुकाराम पोलीस अंमलदार शिवानंद दत्तात्रय भिमदे, पोलीस अंमलदार, अंबादास बालाजी गड्डम, पोलीस अंमलदार अतिश काकासाहेब पाटील आणि पोलीस अंमलदार लक्ष्मण पोमु राठोड यांच्यावर दि. २१ एप्रिल २०२२ रोजी गुन्हा दाखल केला होता.

 

त्यावेळी सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक श्रीशैल्य सिद्रामप्पा गजा यांनी गुन्हा दाखल केला होता. त्यासंदर्भात सीआयडीने सोलापूरच्या पोलीस आयुक्तांना अहवाल देखील सादर केला होता. सदरील गुन्ह्याचा तपास सीआयडीने पथक करीत होते.

○ मोबाईल बंद करुन गायब झाले

सीआयडीचे पथक पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ आणि इतर ५ पोलीस अंमलदारांच्या अटकेसाठी सोलापूरमध्ये दाखल झाले. त्याबाबतची माहिती संबंधितांना समजल्याने त्यांनी तात्काळ त्यांचे मोबाईल फोन बंद केले आणि ते गायब झाले. सीआयडीच्या पथकाने गायब झालेल्यांचा शोध घेण्यासाठी सोलापुरात तळ ठोकला आहे.

 

You Might Also Like

ब्रिटनने रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारतीय कंपनीवर लावले निर्बंध

पुणे – पालिकेच्या पाणी मीटर मोहिमेत अडथळा आणल्यास गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

सरन्यायाधीशावर हल्ल्याचा प्रयत्न, लातूरातील वकिलांनी काढला मोर्चा

जर यावेळी युद्ध झाले, तर पाकिस्तानचा मोठा विजय होईल – पाक संरक्षणमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेस : शरद पवारांचे असंख्य कार्यकर्ते अजित पवारांकडे

TAGGED: #Solapur #Seven #police #pass #mobile #switchoff #PI #turi #CID #hands, #सोलापूर #सीआयडी #हातावर #तुरी #देवून #पीआय #सात #पोलीस #पसार #मोबाईल #स्वीचऑफ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अंत्यविधी उरकून परतताना भीषण अपघातात 3 महिलांचा मृत्यू, सहा महिला जखमी
Next Article पोलीस निरीक्षकासह सात पोलिसांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?