Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मिरवणुकीतून जाताना डीजेचा टेम्पो झाला पलटी, एक ठार चार जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

मिरवणुकीतून जाताना डीजेचा टेम्पो झाला पलटी, एक ठार चार जखमी

Surajya Digital
Last updated: 2022/04/19 at 12:15 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर  : सोलापूर येथील आंबेडकर जयंतीतील कार्यक्रमातील डी. जे. वाजवून परतत असताना भरधाव वेगातील डी.जे. चा टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात चौघे जण जखमी, तर एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

सोलापूर येथील आंबेडकर जयंतीतील कार्यक्रमातील डी.जे. वाजवून परतत असताना भरधाव वेगातील डी. जे. चा टेम्पो  पलटी  होऊन झालेल्या अपघातात  चौघे जण जखमी,  तर एकाचा जागीच मृत्यू  झाल्याची घटना सोमवारी पहाटे 3.30 वाजता मंगळवेढा तालुक्यातील चाळीसधोंडा येथे घडली.

यश ऊर्फ राहुल गुंड्या माने (रा. धनवड, ता. खानापूर, जि. सांगली) असे मृताचे नाव आहे. या घटनेची खबर राहुल कुंडलिक माने (वय 40, रा. धानवड, जिल्हा खानापूर) यांनी दिले असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, त्याच्या टेम्पोला सोलापूर येथील आंबेडकर जयंती कार्यक्रमासाठी मिरवणुकीसाठी डी.जे. ला सुपारी 17 एप्रिल साठी मिळाली होती.

The DJ’s tempo reversed as he passed through the procession, killing one and injuring four

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

सदर मिरवणुकीतील कार्यक्रम संपल्यानंतर (आंधळी, ता. पलूस, जि.सांगली) येथे जाण्याकरता टेम्पो क्रमांक एम एच 14 व्ही 451 मधून रत्नागिरी-नागपूर या महामार्गावरून जात असताना मंगळवेढा ते सांगोला रोडवर चाळीस धोंडा येथे भरधाव वेगाने जाणा-या टेम्पोने कडेला असणाऱ्या फुलांच्या कठड्याला धडकून पलटी झाला.

झोपेत असलेले अभिजित बाळासाहेब शिंदे, विशाल उत्तम चव्हाण, संदीप लक्ष्मण माने, मनोज जनार्दन पवार, यश उर्फ गुंड्या राहुल माने हे टेंपोतून फेकले गेले त्यामधील यश माने याच्या अंगावर टेम्पोचे हौदे पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
बाकी जखमींना उपचारासाठी मंगळवेढ्यातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामध्ये 50 हजार रुपये टेम्पोचे नुकसान झाले असून भरधाव वेगाने वाहन चालवून चौघाला जखमी व एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी चालक अनिकेत शिंदे यांच्याविरोधात फिर्याद देण्यात आली.

महामार्गावरील एखाद्या अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर मृतावर शवविच्छेदन करण्यासाठी आंधळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदन कक्ष नसल्यामुळे शवविच्छेदनासाठी गैरसोय होत असल्याची तक्रार नातेवाईकानी केली.

अपघातातील मृत झालेल्या यशला शवविच्छेदन करण्यासाठी मंगळवेढा येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यास विलंब झाल्यामुळे मृताच्या नातेवाईकांना भर उन्हात दिवसभर मंगळवेढ्यातील निष्क्रिय आरोग्यसेवेचा मनस्ताप सहन करावा लागला. ही तक्रार पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे गेली.  यावर प्रशासनाला तत्काळ संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी सांगितल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #DJ's #tempo #reversed #passed #through #procession #killing #injuring #four, #मिरवणूक #डीजे #टेम्पो #पलटी #एकठार #चार #जखमी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article लाचखोर विद्युत अधिका-यास ठोकल्या बेड्या, लाचेसाठी खास कोल्हापूरहून आला सोलापुरात
Next Article मोहोळ : मालट्रकला रूग्णवाहिकेने दिलेल्या धडकेत एक ठार, डॉक्टरासह पाच जखमी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?