Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाचा मृत्यू

admin
Last updated: 2025/03/21 at 4:18 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

लखनऊ, 21 मार्च (हिं.स.)। उत्तरप्रदेशच्या लखनऊ येथील चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडिया फ्लाइट एआय-2845 मध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. मृत प्रवाशाचे नाव आसिफुल्ला अंसारी असे असून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टम अहवालानंतरच समोर येईल.

एअर इंडिया फ्लाइट एआय-2845 हे विमान शुक्रवारी (दि. २१) सकाळी 8:10 वाजता दिल्लीहून लखनऊला पोहोचले.विमान लखनऊमध्ये पोहोचल्यानंतर क्रू मेंबर्सनी प्रवाशांना सीट बेल्ट काढून उतरायला सांगितले. मात्र, आसिफुल्ला अंसारी आपल्या सीटवर हालचाल न करता बसून राहिले. क्रू मेंबर्सनी त्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला, पण ते कुठलाही प्रतिसाद देत नव्हते.त्यानंतर डॉक्टरांना बोलावण्यात आले, त्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. विशेष म्हणजे, विमान लँड झाल्यानंतरही त्यांनी सीट बेल्टही काढला नव्हता, त्यामुळे त्यांचा प्रवासादरम्यानच मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या संशयास्पद मृत्यूनंतर पोलीस अधिक तपास करत आहेत. प्रवाशाची तब्येत आधीपासून बिघडलेली होती का? किंवा प्रवासादरम्यान काही आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या का? हे शोधले जात आहे. तसेच, त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून वैद्यकीय इतिहासाची माहिती घेतली जात आहे. पोस्टमार्टम अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

You Might Also Like

ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा

राहुल गांधींना मिळाला नवा सरकारी बंगला

आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार – मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धरणगावात ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कसारा घाटात सिमेंटचा ट्रक दरीत कोसळला; दोघांचा मृत्यू
Next Article India crosses 1 billion tonne mark in coal product भारताने कोळसा उत्पादनात १ अब्ज टनाचा टप्पा ओलांडला

Latest News

ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा
महाराष्ट्र June 20, 2025
राहुल गांधींना मिळाला नवा सरकारी बंगला
महाराष्ट्र June 20, 2025
आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार – मुख्यमंत्री
महाराष्ट्र June 20, 2025
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धरणगावात ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन
महाराष्ट्र June 20, 2025
अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
महाराष्ट्र June 20, 2025
शासकीय अधिकाऱ्यांनी मनात अपेक्षा न ठेवता काम करावे – हसन मुश्रीफ
देश - विदेश June 20, 2025
पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू
सोलापूर June 20, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय – शरद पवार
राजकारण June 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?