Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूरच्या राष्ट्रवादीतही वाहू लागले बंडाचे वारे : अनगरच्या सुपुत्रांचा भाजपकडे ओढा, मालकांच्या साहेब निष्ठेने होणार तिढा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

सोलापूरच्या राष्ट्रवादीतही वाहू लागले बंडाचे वारे : अनगरच्या सुपुत्रांचा भाजपकडे ओढा, मालकांच्या साहेब निष्ठेने होणार तिढा

Surajya Digital
Last updated: 2022/07/20 at 10:37 AM
Surajya Digital
Share
6 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ राजन पाटलांची मुले पक्षावर नाराज : आ. यशवंत माने□ ‘आमचं ठरलंय’मुळे संभ्रमावस्था□ मी पक्ष सोडून का जाऊ ? : राजन पाटील

मोहोळ / संजय आठवले

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू माजी आमदार राजन पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. गेले काही दिवस राजनमालकांनी मौन पाळल्याने जिल्हावासियांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता मात्र मंगळवारी त्यांनी आपल्या निष्ठेचे अस्त्र बाहेर काढले. आपली निष्ठा शरद पवारांच्या विचाराशीच सदैव असेल, असे त्यांनी ठणकावून सांगितले. दरम्यान त्यांचे दोन सुपुत्र बाळराजे व अजिंक्यराणा यांचा भाजपकडे ओढा असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. दोनही मुलांनी अशी भूमिका घेतली तर मालकांची निष्ठा तिढ्यात सापडणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे व संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या घडामोडीकडे लागून आहे.  Winds of rebellion started blowing in the nationalists of Solapur: Rajan Patil, Balraje Patil, Ajinkyarana Patil sons of Angar are drawn to BJP, the loyalty of the owners will be torn.

 

मागील पंधरा दिवसापूर्वी पासून याबाबत जिल्हाभर चर्चा होत असताना दिसत आहे. त्याबाबत त्यांचे चिरंजीव बाळराजे पाटील यांनी फेसबुक वर एक पोस्ट केली होती. त्या पोस्टवरून त्यांची राष्ट्रवादी बद्दल नाराजी आणि भाजपात प्रवेश होणार असल्याची चर्चा सुरू झाली . याबाबत भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून नेते मंडळी कडून प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून व प्रसार माध्यमाच्या माध्यमातून येऊ लागल्या . त्यामुळे मोहोळ तालुक्यात या प्रश्नाबाबत जास्तच उत्सुकता निर्माण झाली एकीकडे त्यांच्या पक्षातील प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील व रमेश बारस्कर मानाजी माने यांच्या गटाच्या माध्यमातून मोहोळ तालुक्यात राजन पाटील यांनी तालुक्याचा विकास केला नाही लोकनेते साखर कारखाना हा खाजगी केला अशा शब्दात टीका करत आहेत.

 

नक्षत्र ची कागदपत्रे मुन्ना महाडिक यांच्याकडे संतोष पाटील यांनी सुपूर्द केली आणि याबाबतच्या चर्चा जास्तच होऊ लागली. याबाबत थेट राजन पाटील यांच्याशी अनगर येथे जाऊन चर्चा केली असता ते म्हणाले की ” आज पर्यंत राष्ट्रवादीचे प्रामाणिकपणे काम केलं आहे, करत आलो आहे आणि करत राहणार आहे”आमचे नेते पवार साहेब यांनी माझं कोणतंही काम थांबवलं नाही आणि मी सांगेल ते काम त्यांनी केलेली आहेत. फोनवरून सुद्धा ते माझी कामे करत असतात. त्यामुळे मी पक्ष सोडून का जाऊ असा प्रतिप्रश्नच केला. त्यानंतर लोकनेते साखर कारखान्याच्या खाजगीकरणाच्या बाबत जी चर्चा तालुक्यात सुरू आहे. त्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की मी आणि माझे नातेवाईक असे सगळ्यांचे मिळून टोटल १९ लाखाचे शेअर्स त्या कारखान्यांमध्ये आहेत आणि तेवढा पैसा आम्ही सहजासहजी मिळवू शकतो. तेवढा पैसा आमच्याकडे असू शकतो. त्यामुळे कुठलाही गैरप्रकार आम्ही केलेला नाही. त्यामुळे आम्हाला ईडीच्या सुद्धा चौकशीची भीती वाट वाटत नाही आणि कारखाना हा जनतेच्या मालकीचा आहे, असे राजन पाटील यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

 

राजन पाटील यांना “नक्षत्र” विषयी विचारले असता नक्षत्रची प्रक्रिया ही कायदेशीरपणे सुरू आहे. यामध्ये कोणताही गैरप्रकार झालेला नाही. कारण यामध्ये संपूर्ण एक्साईजचे अधिकारी त्या प्रक्रियेमध्ये सहभागी असतात आणि त्यांच्या सही शिवाय पान सुद्धा हलत नसते, आणि ही प्रक्रिया करता येत नाही, पूर्ण होत नाही. त्यामुळे आम्ही यामध्ये गैर प्रकार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जर आमच्या हिशोबा मध्ये चुकून काही घोळ झाला असेल किंवा काही गैरव्यवहार झाला असेल आणि जर काही राहिले असेल तर शासनाचा जो काही टॅक्स जो काही होईल तो आम्ही भरण्यास तयार आहोत त्यामुळे यामध्येही घाबरण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे सांगितले.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/585641806446886/

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/585248646486202/

 

राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील हे वारंवार तुमच्यावर आरोप करत असतात याबाबत तुम्ही कोणतीही प्रतिक्रिया देत नाही आणि खुलासा करत नाही असे नाही विचारले असता चिखलामध्ये दगड टाकून शिंतोडे उडवून घाण अंगावर घ्यायची आमची इच्छा नाही. त्यामुळे आम्ही गप्प असल्याचे त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून राजन पाटील यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश निश्चित झाला असल्याच्या पोस्ट फिरू लागल्या आणि आणखी चर्चेला उधाण आले परंतु राजन पाटील यांनी पक्षप्रवेशाबद्दल बोलण्याचे टाळत “मौनं सर्वार्थ साधनम “अशीच भूमिका घेतली. आणि याबाबत अधिक माहिती देण्यास किंवा बोलण्यास त्यांनी टाळाटाळ केली.

आता यामुळे राजन पाटील नेमके काय करणार या प्रश्नाबाबत सर्वच राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालीय. परंतु त्यांच्याकडून आजपर्यंत या प्रश्नाबाबत कोणताही दुजोरा मिळाला नाही. त्यामुुळे राजन पाटील भाजपा मध्ये प्रवेश करणार का ? हा संभ्रम व उत्सुुुुकता तशीच राहिली आहे.

 

□ राजन पाटलांची मुले पक्षावर नाराज : आ. यशवंत माने

 

राजन पाटील भाजपमध्ये जातील, असे मला वाटत नाही. मात्र, त्यांचे दोन चिरंजीव नाराज असल्याची स्पष्टोक्ती मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी दिली. राजन पाटील हेच आमचे नेते आहेत. उमेश पाटील हे कार्यक्रमाच्या माध्यमातून पाटील पिता-पुत्रांवर टीका करतात, हे पाटील यांना मान्य नाही. उमेश पाटील यांना थांबविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी काहीच ॲक्शन घेतली नाही, असे आमदार माने म्हणाले.

 

□ ‘आमचं ठरलंय’मुळे संभ्रमावस्था

गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार राजन पाटील हे राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा रंगत आहे. विशेषतः अजिंक्यराणा आणि बाळराजे पाटील यांच्या मनात पक्षाबाबत साशंकता निर्माण झालेली आहे. बाळराजे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर आमचं ठरलंय ही पोस्ट टाकली आहे. ही पोस्ट मोठ्याप्रमाणात व्हायरल झाली आहे. एकीकडे राजन पाटील भाजप प्रवेश करणार नाही म्हणत आहेत तर दुसरीकडे बाळराजे पाटील यांची आमचं ठरलंय ही पोस्ट यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.

 

 

□ मी पक्ष सोडून का जाऊ ? : राजन पाटील

आजपर्यंत राष्ट्रवादीचे प्रामाणिकपणे काम केले आहे, करत आलो आहे आणि करत राहणार आहे. आमचे नेते पवारसाहेब यांनी माझे कोणतेही काम थांबवले नाही आणि मी सांगेल ती कामे त्यांनी केलेली आहेत. फोनवरून सुद्धा ते माझी कामे करत असतात. त्यामुळे मी पक्ष सोडून का जाऊ, असा प्रतिप्रश्नच केला.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/585554429788957/

 

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

TAGGED: #rebellion #blowing #nationalists #Solapur #RajanPatil #BalrajePatil #AjinkyaranaPatil #sons #Angar #drawn #BJP #loyalty #owners #torn, #मोहोळ #सोलापूर #राष्ट्रवादी #बंड #अनगर #राजनपाटील #बाळराजेपाटील #अजिंक्यराणापाटील #सुपुत्र #भाजप #ओढा #मालक #साहेब #निष्ठा #तिढा #राजकारण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठे यश, दिल्लीत जावून शिवसेनेचे 12 खासदार फोडले
Next Article देवेंद्र फडणवीस म्हणाले, सुनावणीने आम्ही समाधानी; सत्ता संघर्षाची पुढील सुनावणी 1 ऑगस्टला

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?