Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: तृतीयपंथीयांसाठी महापालिकेच्या माध्यमातून स्वाभिमानी रोजगार पॅटर्न 
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

तृतीयपंथीयांसाठी महापालिकेच्या माध्यमातून स्वाभिमानी रोजगार पॅटर्न 

Surajya Digital
Last updated: 2022/03/11 at 6:22 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

□ पन्नास जणांना मिळणार कायमस्वरूपी रोजगार

सोलापूर :  सहानुभूती अथवा तात्पुरती मदत करण्याऐवजी वारांगना व तृतीयपंथीयांना स्वाभीमानाने स्वतःच्या पायावर उभा करून त्यांना कायमस्वरूपी रोजगार देण्याच्या महत्त्वपूर्ण उद्देशाने सोलापूर महापालिकेच्या माध्यमातून भोगाव येथील बायो एनर्जी प्लांट येथे स्वाभिमानी रोजगार पॅटर्न राबविण्यात येत आहे. देशात महापालिकेच्या माध्यमातून प्रथमच असा अभिनव पॅटर्न राबविला जात आहे.

वारांगना व तृतीयपंथी यांना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. त्यांना वेगळी वागणूक दिली जाते. फार तर काही वेळा प्रसंगी त्यांना सहानुभूती दाखवली जाते. कधी तात्पुरती मदत दिली जाते, मात्र वारांगना व तृतीयपंथी यांना स्वाभिमानानं स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, त्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे या उद्देशातून भोगाव येथील बायो एनर्जी प्लांट येथे वारांगना व तृतीयपंथीयांना रोजगार दिला जाणार आहे. अशी माहिती महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली. Swabhimani employment pattern for third parties through Municipal Corporation

 

सुमारे 50 वारांगना व तृतीयपंथीयांना या कायमस्वरूपी रोजगाराच्या माध्यमातून दरमहा किमान वेतन दिले जाणार आहे. यातून त्यांना मोठा उदरनिर्वाहाचा आधार मिळेल तसेच स्वावलंबी जीवन जगता येईल. सोलापूर महापालिकेच्या माध्यमातून भोगाव येथील बायोएनर्जी प्लांट च्या सहकार्यातून हा अभिनव पॅटर्न राबविण्यात येत आहे असेही उपायुक्त धनराज पांडे यांनी सांगितले.

महापालिकेच्या माध्यमातून राबविला जाणारा अशा प्रकारचा हा स्वाभिमानी रोजगार पॅटर्न पहिलाच असावा ही बाब निश्चितच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे यामुळे वारांगना व तृतीयपंथी यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होईल यात शंका नाही.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□  मंजूर रेखांकनातील जागांची महापालिकेने सुरू केली मोजणी
सोलापूर : शहरातील गुंठेवारी व मंजूर रेखांकन अन्वये ज्या ठिकाणी विकास झालेला आहे. परंतु अंतिम मंजुरी घेण्यात आलेली नाही, अशा ठिकाणी महापालिकेमार्फत मोजणी करून यासाठी येणारा खर्च हा मालमत्ता करातून वसूल करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली.
शहरातील जे रेखांकने प्राथमिक स्वरूपाने मंजूर आहेत. परंतु त्यांची भूखंडनिहाय मोजणी झालेली नाही. व ज्या ठिकाणी गुंठेवारी अन्वये विकास झालेला आहे. परंतु त्याचे नगर भूमापन झालेले नाही. अशा ठिकाणी महानगरपालिकेकडून भूखंड निहायमोजणी करण्यात येणार आहे. शिवाय या मोजणीसाठी येणारा खर्च संबंधित भूखंड धारकांकडून बांधकाम परवानगीच्या वेळेस शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी बांधकामे झालेली आहेत. परंतु बांधकाम परवानगी घेण्यात आलेले नाही.
अशा ठिकाणी भूखंडनिहाय मोजणी करून त्यासाठी येणारा खर्च संबंधित भूखंड धारकाकडून त्यांच्या कराच्या बिलामध्ये जमा करून घेण्यात येणार आहे. यासंबंधीची कार्यवाही सुरू करण्यात आली असून, लवकरच महापालिकेकडे दाखल झालेल्या सुमारे ३००० प्रकरणावरील प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

 

You Might Also Like

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न

सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे

सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

TAGGED: #Swabhimani #employment #pattern #third #parties #Municipal #Corporation, #तृतीयपंथीय #महापालिका #स्वाभिमानी #रोजगार #पॅटर्न
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्रात CNG स्वस्त, पेट्रोलबाबत मात्र दिलासा नाही
Next Article राज्य सरकार इम्पिरिकल डेटा गोळा करणार; पाच सदस्यांची नवी समिती स्थापन

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?