Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पार्थसंबंधी पवार कुटुंबियांची एकञित बैठक; संपूर्ण कुटुंब हे पहिल्यांदाच येणार एकत्र
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

पार्थसंबंधी पवार कुटुंबियांची एकञित बैठक; संपूर्ण कुटुंब हे पहिल्यांदाच येणार एकत्र

Surajya Digital
Last updated: 2020/08/14 at 10:57 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार यांच्यावर केलेल्या टीकेची महाराष्ट्राच्या राजकारणात मागील दोन दिवसांपासून मोठी चर्चा सुरू आहे. पक्षाच्या भूमिकेविरुद्ध मत मांडत असलेल्या पार्थ यांना शरद पवारांनी खडेबोल सुनावले. साहजिकच याचा परिणाम पक्षासोबतच पवार कुटुंबावरही झाल्याचं बोललं गेलं. पण हाच वाद आता सोडवण्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येत चर्चा करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांचे कुटुंबीय शनिवार आणि रविवारी बारामतीत एकत्र भेटणार असल्याची माहिती मिळते आहे. अजित पवारांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांच्या बारामतीच्या घरी पार्थसंबंधी पवार कुटुंबियांची एकञित बैठक होणार असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होणार आणि या सगळ्याबाबत अजित पवार नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

खरंतर, विधानसभेच्या वेळीही श्रीनिवास पवार यांच्या मध्यस्थीनेच अजित पवार आणि शरद पवारांमध्ये समेट घडला होता. त्यामुळे यावेळीही पवार कुटुंबात पार्थवरून निर्माण झालेला तिढा श्रीनिवास पवारच सोडवणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, पवार कुटुंबाच्या या एकूण वादात संपूर्ण कुटुंब हे पहिल्यांदाच एकत्र येणार आहे.

एकीकडे, मुलगा पार्थ पवारच्या राजकीय भूमिकेवरून राष्ट्रवादीतच रणकंदन सुरू असतानाच दुसरीकडे पुण्यात मात्र अजित पवारांकडून दैनंदिन बैठकांचा धडका सुरूच आहे. पुणे कोरोनाची साप्ताहिक आढावा बैठक घेतली त्यानंतर ते सर्किट हाऊसला आले पण मीडियाचे कॅमेरे असल्याने त्यांनी मागच्या दाराने एन्ट्री करून माध्यमांना चकवा दिला. तिथं पीएमपीची बैठक तसंच पक्ष पदाधिकारी त्यांना भेटताहेत.

थोडक्यात घरात काही झालंच नाही अशा अर्विभावात अजित पवारांनी दिवसभर बैठका आणि भेटीगाठीचं सञं सुरूच ठेवलं आहे. तर दुसरीकडे पार्थ पवार मुंबईहून पुण्याकडे निघाल्याचं सांगितलं जात आहे.

* दुखावलेले पार्थ मोठा निर्णय घेणार

पुण्यात जाऊन पार्थ पवार कुटुंबाशी चर्चा करणार आहेत. पार्थ पवार आपले काका श्रीनिवास पवार, अभिजित पवार, जयंत पवार तसंच सर्व आत्यांशी बोलून आपली भूमिका आणि निर्णय घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. तसंच सध्याची राजकीय स्थिती बघता निर्णय घेण्याची ही योग्य वेळ असल्याचा दावाही पार्थ पवार यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. पार्थ पवार हे मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. तसंच मुलाला फटकारल्याने अजित पवारही नाराज झाल्याचं सांगण्यात येतंय.

* अजित पवारांनी नाराजी बोलून दाखविली ?

पार्थ प्रकरणावर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांची बैठक झाली. या बैठकीदरम्यान पार्थ पवार यांच्याबाबतीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत राष्ट्रवादीकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र यावेळी अजित पवार यांनी मुलगा पार्थची बाजू सावरण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. तो अजून लहान आहे, हळूहळू तयार होईल. मात्र त्याला असे सार्वजनिकरित्या खडेबोल सुनावणं योग्य नाही,’ अशा शब्दांत शरद पवार यांच्यासमोर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रच मोर्चा काढणार – संजय राऊत

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

TAGGED: #पार्थसंबंधी #पवारघराणे #एकत्रित #निर्णय #एकनाथपवार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंढरपुरातील चाळीस वर्षीय डॉक्टरांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू; कोरोनाबळीची संख्या झाली 28
Next Article डॉक्‍टर, परिचारिकांसह इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचा देश ऋणी

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?