सांगली : होळकर साम्राज्याच्या सातबाऱ्यावर पवार कुटुंबियांचा डोळा आहे. आपण जर माहिती घेतली तर जेजुरी परिसरात हे लोकं होळकरांच्या संपत्तीवर डोळा ठेवून आहेत, हे दिसेल. त्यासाठी हा उद्योग सुरु आहे, असा गंभीर आरोप पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी केला. संभाजीराजे छत्रपती जर जेजुरी मधील कार्यक्रमाला जाणारच असतील तर त्यांनी अहिल्यादेवी पुतळ्याचे अनावरण करावे, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याहस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे आज अनावरण होणार आहे. या पार्श्वभूमीवर भूषण सिंह होळकर यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
होळकरांच्या सातबाऱ्यावर पवार कुटुंबियांचा डोळा असल्याचा आरोप पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी केला आहे. आपण जर माहिती घेतली तर जेजुरी परिसरात हे लोकं प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे होळकरांच्या संपत्तीवर डोळा ठेवून आहेत, हे दिसेल. त्यासाठी हा उद्योग सुरु आहे, असा गंभीर आरोप भूषणसिंह होळकर यांनी केला आहे.
संभाजीराजे छत्रपती जर उद्याच्या जेजुरी मधील कार्यक्रमाला जाणारच असतील तर त्यांनी अहिल्यादेवी पुतळ्याचे अनावरण करावं. संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते जर अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण झले तर आम्ही त्याचे स्वागतच करू, असे होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी म्हटलं आहे. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून भूषणसिंह होळकर यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जेजुरी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचा आडून बहुजन समाजात दुही माजवण्याचे राजकारण सुरू असून आज पार पडणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला छत्रपती संभाजीराजे यांनी जाऊ नये, अशी पत्राद्वारे विनंती केली असल्याचे भूषण सिंह होळकर यांनी सांगलीमध्ये बोलताना सांगितला आहे.
या पुतळ्याचे अनावरण बहुजन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांच्या हस्ते होऊ नये, या गोष्टीला आमचा विरोध असून छत्रपती संभाजी महाराज जर त्या कार्यक्रमाला जाणार असतील तर त्यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणे योग्य ठरेल, त्याला आमचा विरोध असणार नाही, पण होळकर घराण्याच्या संस्कृतीचा आणि 70 वर्षांपासून बहुजन समाजाचा राजकारणासाठी वापर केलेल्या व्यक्तीकडून अनावरण झाल्यास देशभरातील बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या जातील, असेही भूषणसिंह होळकर यांनी स्पष्ट केले आहे.
खंडेरायाच्या जेजुरी गडावर जेजुरी देवस्थानने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आज शरद पवार आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यासाठीची सगळी तयारीही पूर्ण झाली आहे. मात्र काल पहाटे अचानक भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह जेजुरी गडावर पोहचले आणि त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पडळकर यांचे कार्यकर्ते आणि जेजुरी देवस्थानच्या कर्मचाऱ्यांमधे झटापट देखील झाली. त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्याचं गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले आणि ते कार्यकर्त्यांसह निघून गेले.