Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शरद पवारांच्या धमकीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; पवारांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

शरद पवारांच्या धमकीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; पवारांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ

Surajya Digital
Last updated: 2023/06/09 at 4:52 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत.  Chief Minister took note of Sharad Pawar’s threat; Increase in security outside Pawar’s house Devendra Fadnavis Eknath Shinde शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबद्दल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन जीवे मारण्याची धमकी आली आहे. आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या पुण्यातील घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे. घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धमकी दिलेल्या ट्वीटमध्ये ‘तुमचा दाभोळकर होणार,’ असे लिहिलेले आहे. धमकी देणाऱ्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी नेत्यांनी केली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

शरद पवार यांना ट्वीटरवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे या मुंबई पोलिस आयुक्तालयात दाखल झाल्या आहेत. दोन ट्वीटर अकांऊट वरुन त्यांना ही धमकी मिळाली आहे. ‘भाडखाउ तुझा दाभोळकर केला जाईल’ असे या ट्वीटमध्ये म्हटले आहे. या ट्वीटर अकाऊंटवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ आयुक्तालयात दाखल झाले आहे.

धमकीची मला चिंता नाही, धमक्या देऊन कुणी आवाज बंद करु शकत नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी आज दिली आहे. तसेच कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान पवार यांना आज ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर सरकारनेही सतर्क होत त्यांच्या घरासमोर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. दुसरीकडे संजय राऊत यांनाही फोनवरून शिवीगाळ करत धमकी देण्यात आली आहे.

शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयात भेट दिली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गृहमंत्रालयाने या प्रकरणात तत्काळ कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली. तसेच महाराष्ट्रात सध्या द्वेषाचे राजकारण सुरु आहे. काही झाले तर याला गृह खाते जबाबदार असेल, असे त्या म्हणाल्या.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि सुनील राऊत यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राजकीय पातळीवर मतभेद असतील पण मनभेद नाहीत. कोणत्याही नेत्याला धमकी येणं खपवून घेणार नाही. कायद्याप्रमाणे पोलिस कारवाई करतील. सभ्येतेच्या मर्यादा ओलांडणे खपवून घेणार नाही,” असे फडणवीस म्हणाले आहेत.

You Might Also Like

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

TAGGED: #ChiefMinister #took #note #SharadPawar #threat #Increase #security #outside #Pawar's #house #DevendraFadnavis #EknathShinde, #शरदपवार #धमकी #मुख्यमंत्री #एकनाथशिंदे #दखल #पवार #घराबाहेरील #सुरक्षा #वाढ #देवेंद्रफडणवीस
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भगीरथ भालके यांनी घेतली केसीआर यांची भेट
Next Article भरधाव टिप्पर अंगावर … खासदार ओमराजे निंबाळकर थोडक्यात बचावले

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?