Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जुगाराची सेवा देणा-या ॲपला परवानगी नाही; पेटीएमवर गुगलची कारवाई
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Techनिकअर्थाअर्थ

जुगाराची सेवा देणा-या ॲपला परवानगी नाही; पेटीएमवर गुगलची कारवाई

Surajya Digital
Last updated: 2020/09/18 at 4:05 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाणारे पेटीएम हे अॅप गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरुन काढून टाकले आहे. गुगलने यासंदर्भात विस्तृतपणे स्पष्टीकरण दिले आहे.

पेटीएम अॅपच्या माध्यमातून खेळांसंदर्भातील नियमांचे उल्लंघन करुन खेळांवर पैसे लावून जुगार खेळण्यासाठी परवानगी देत नाही, असं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे कसिनोसारख्या सेवा पुरवणे नियमांमध्ये बसणारे नाही असंही गुगलने स्पष्ट केलं आहे. गुगलने पेटीएम फॉर बिझनेस, पेटीएम मॉल, पेटीएम मनी याचबरोबर कंपनीच्या अन्य अ‍ॅपवरही कारवाई केली आहे. यासंदर्भात पेटीएमने सध्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

या प्रकरणामध्ये चौकशीनंतर कंपनीकडून अधिकृतपणे पत्रक जारी करण्यात येणार आहे. हे अ‍ॅप्लिकेशन आता फक्त अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवर डाऊनलोडसाठी उपलब्ध असेल.

गुगलने यासंदर्भात आपल्या ब्लॉगमध्ये माहिती दिली आहे. लाखो युझर्स असणाऱ्या पेटीएमवर कारवाई करण्यामागे कंपनीने ऑनलाइन जुगारासंदर्भातील नियमांचे कारण दिलं आहे. “आम्ही ऑनलाइन कसिनो किंवा नियमांचे उल्लंघन करुन खेळांवर पैसे लावण्यासाठी पुरवण्यात येणारी जुगाराची सेवा देणाऱ्या अ‍ॅपला परवानगी देत नाही. एखाद्या ग्राहकाला आपल्या प्लॅटफॉर्मवरुन बाहेरील वेबसाईटवर ऑनलाइन जुगारासाठी जाण्यास परवानगी देणारी सेवा उपलब्ध करुन देणाऱ्या अ‍ॅपचाही यामध्ये समावेश होतो. अशाप्रकारच्या देवाणघेवाणीमधून पैसे तसेच रोख रक्कम बक्षीस म्हणून देणे हे आमच्या नियमांच्या विरोधात आहे,” असं गुगलने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* पेटीएमने केले उल्लंघन

ज्या गोष्टींमुळे आर्थिक फसवणूक होऊ शकते अशा गोष्टींपासून आमच्या युझर्सचे संरक्षण व्हावे असे आमचे नियम आहेत. एखाद्या अ‍ॅपने याचे उल्लंघन केल्यास आम्ही त्यासंदर्भातील नियमांची माहिती अ‍ॅपच्या डेव्हलपर्सला देतो. यासंदर्भातील इतर कायदेशीर माहिती आणि नियम अ‍ॅप निर्माण करणाऱ्या कंपन्यांना सांगितली जाते. मात्र अनेकदा सांगितल्यानंतरही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अ‍ॅपवर आम्ही कारवाई करतो. यासंदर्भात आम्ही या कंपनीचे गुगल प्ले डेव्हपर अकाऊंट बंद करण्यासारखी गंभीर कारवाईही करु शकतो. आपल्या प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या सर्व डेव्हलपर्सला हे नियम लागू होतात,” असं गुगलने म्हटलं आहे.

You Might Also Like

क्यूआर कोडवर आता आधारकार्ड तक्रारींचे निराकरण

Budget 2024 | 5 वर्षांत ग्रामीण भागात 2 कोटी घरे बांधली जाणार

बजेट ब्रेकिंग – 7 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना टॅक्स नाही

Ed action mobile company लोकप्रिय मोबाईल कंपनीवर ईडीची कारवाई; 5,551 कोटींची मालमत्ता जप्त

Corona / Reserve Bank कोरोना : आर्थिक नुकसानीवर मात करण्यासाठी भारताला २०३५ पर्यंत पहावी लागणार वाट

TAGGED: #जुगार #पेटीएम #हटविले #प्लेस्टोअर #गुगल #कारवाई
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article निमंत्रितावरुन इंदू मिल डॉ. आंबेडकर पुतळ्याचा पायाभरणी कार्यक्रम पुढे ढकलला
Next Article बलात्कारित दोषींना केले जाणार नपुंसक; महिलेने बलात्कार केल्यास तिलाही वेगळीच शिक्षा, कायद्याची जगभरात चर्चा

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?