Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अकलूज : उधारीच्या कारणावरून मोबाईल दुकानात मारहाण, आठ जणांविरूद्ध गुन्हा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

अकलूज : उधारीच्या कारणावरून मोबाईल दुकानात मारहाण, आठ जणांविरूद्ध गुन्हा

Surajya Digital
Last updated: 2022/06/25 at 10:24 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ येवती येथे घरफोडी; १ लाख ३५ हजारांचे दागिने लंपासस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट… □ चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला मारहाण; पतीविरुद्ध गुन्हा□  हत्तुर ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकले: महिला सदस्याच्या पतीविरुद्ध गुन्हा

सोलापूर – उधारीवर घेतलेल्या मोबाईलचे पैसे मागितल्याच्या कारणावरून तीक्ष्ण शस्त्र आणि पाईपने केलेल्या मारहाणीत मोबाईल दुकानाच्या मालकासह दोघ गंभीर जखमी झाले. यात आठजणांविरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. Akluj: Assault on mobile shop due to borrowing, crime against eight people Hattur Gram Panchayat office locked

ही घटना अकलूज येथील एस.एस मोबाईल दुकानासमोर गुरुवारी (ता. 23) सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणात अकलूजच्या पोलिसांनी विठ्ठल येवले (रा.माळीनगर) याच्यासह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या संदर्भात मोबाईल दुकानाचा चालक सलमान मुबारक शेख (वय२५ रा. काजीगल्ली,अकलूज) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली.उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून विठ्ठल येवले आणि त्याच्या साथीदारांनी मिळून त्यांना आणि त्यांच्या चुलत भाऊ मोहसीन हिरालाल शेख यांना मारहाण केली.असे त्यांच्या फिर्यादीत नमूद आहे. हवालदार कोळी पुढील तपास करीत आहेत.

□ येवती येथे घरफोडी; १ लाख ३५ हजारांचे दागिने लंपास

 

सोलापूर – येवती (ता.मोहोळ) येथे एका महिलेच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील ११ हजार रुपये रोख आणि २८ ग्रॅम सोन्याचे दागिने असा १ लाख ३५ हजाराचा ऐवज पळविला. ही चोरी शुक्रवारी (ता. 24) पहाटेच्या सुमारास घडली.

यासंदर्भात इंदुमती औदुंबर हारगुडे( रा. येवती) यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. फौजदार खापरे पुढील तपास करीत आहेत.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

□ चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला मारहाण; पतीविरुद्ध गुन्हा

सोनके (ता.पंढरपूर) येथे चारित्र्याच्या संशयावरून काठीने केलेल्या मारहाणीत हसीना शाहरुख मुलाणी (वय २६ रा.सोनके) ही विवाहिता जखमी झाली. ही घटना गुरुवारी (ता.23) सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी पंढरपूर ग्रामीणच्या पोलीसांनी  तिचा पती शाहरुख नजीर मुलाणी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुरुवारी  सुमारास त्याने दारूच्या नशेत पत्नीला काठीने मारहाण केली होती. अशी नोंद पोलिसात झाली आहे हवालदार मुंडे पुढील तपास करीत आहेत .

□  हत्तुर ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकले: महिला सदस्याच्या पतीविरुद्ध गुन्हा

सोलापूर – हत्तूर येथील ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून कार्यालयास कुलूप लावल्या प्रकरणी  महिला सदस्याच्या पतीविरुद्ध पोलिसांनी शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
 यासंदर्भात संगनबसप्पा रेवणसिद्ध ठक्का (रा.सैफुल) यांनी विजापूर नाका पोलीसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलीसांनी गुरुनाथ भीमाशंकर सतुबर (रा. हत्तुर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सोमवारी सायंकाळी ठक्का हे ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय काम करीत होते. त्यावेळी गुरुनाथ हा कार्यालयात घुसून त्यांना आणि सुनील नारायणे (लिपीक) तसेच प्रकाश निम्बर्गी (शिपाई) यांना शिवीगाळ आणि दमदाटी करून कार्यालयाबाहेर काढले. त्यानंतर कार्यालयास कुलूप लावले, अशी नोंद पोलिसात झाली. पुढील तपास फौजदार मुलाणी करीत आहेत.

You Might Also Like

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

TAGGED: #Akluj #Assault #mobile #shop #borrowing #crime #people #Hattur #GramPanchayat #office #locked, #अकलूज #उधारी #मोबाईल #दुकान #मारहाण #हत्तूर #ग्रामपंचायत #कार्यालय #कुलूप
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर : लाचखोर फौजदाराला सुनावली पोलीस कोठडी
Next Article अग्निपथ योजनेच्या विरोधात काँग्रेसचे सोलापुरात धरणे आंदोलन

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?