Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुलीचे खोटे लग्न लावून लुटणारी टोळी उघडकीस, सोलापुरातील मायलेकीसह पाचजणांवर गुन्हा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

मुलीचे खोटे लग्न लावून लुटणारी टोळी उघडकीस, सोलापुरातील मायलेकीसह पाचजणांवर गुन्हा

Surajya Digital
Last updated: 2022/08/03 at 12:57 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ ट्रॅव्हल्स गाडी अचानक जळून खाक

सांगली : आर्थिक स्वार्थासाठी पोटच्या मुलीचे खोटे लग्न लावून लाखो रूपये लुटणा-या मायलेकीस पोलिसांनी अटक करून बेड्या ठोकल्या आहेत. सांगलीतील विटा पोलिसांत पाचजणांवर गुन्हा दाखल दाखल झाला आहे.  The gang of robbing a girl by falsely marrying them was exposed, five persons including Mileki from Solapur were charged with the crime.

 

सांगलीतील हिवरे येथील दत्तात्रय नागेश हसबे (वय ३१, रा. हिवरे, ता. खानापूर) या तरुणाला एक लाख ७५ हजार रुपयांना गंडा घातल्याची तिने फिर्याद दिली. या प्रकरणात सोलापूर व कर्नाटक राज्यातील पाच जणांविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

जयश्री गदगे (रा. जुगुल, ता. चिकोडी, कर्नाटक), सुनील दत्तात्रय शहा (रा. निपाणी, कर्नाटक), धनम्मा उर्फ धानुबाई नागनाथ बिराजदार, मुलीची आई दीपाली विकास शिंदे व मुलगी प्रियांका विकास शिंदे (सर्व रा. सोलापूर) अशी संशयितांची नावे आहेत. मुलीची आई दीपाली शिंदे (वय ४०) व नववधू प्रियांका शिंदे (वय २१) यांना विटा पोलिसांनी अटक केली आहे.

हिवरे येथील दत्तात्रय हसबे या तरुणाचा काही केल्या विवाह जमत नव्हता. त्यामुळे हसबे हा त्याचा मित्र संजय खिलारी याच्या ओळखीच्या कर्नाटकातील जयश्री गदगे या लग्न जुळविणाऱ्या महिलेकडे दोघेजण गेले. त्यावेळी संबंधित महिलेने सोलापूर येथे मुलगी चांगली आहे. परंतु, मुलीच्या घरच्यांना एक लाख व लग्न जुळविणारे एजंट सुनील शहा व धनम्मा उर्फ धानुबाई बिराजदार यांना ७० हजार रुपये द्यावे लागतील,असे सांगितले. मोबाइलवर मुलगी प्रियांका शिंदे हिचा फोटो पाहून हसबे याने पैसे देण्यास होकार दिला.

मुलगीला हिवरेत येण्यासाठी हसबे याने जयश्रीला ऑनलाइन पाच हजार रुपये दिले. दि. २७ जुलै रोजी रात्री नऊ वाजता संशयित जयश्री गदगे, सुनील शहा, धनम्मा बिराजदार, मुलगी प्रियांका व तिची आई दीपाली शिंदे हे गावात आले. त्याच रात्री दोघांचा विवाह लावून दिला.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

३० जुलै रोजी दीपालीही हिवरेत आली. तिने कपडे घ्यायची आहेत, असे सांगून मुलीला घेऊन गेली. त्यांच्यासोबत दत्तात्रय व नातेवाईक गेले. दीपालीने भिवघाटातून प्रियांकाला सोलापूर घेऊन जाण्याची तयारी केली. फिर्यादी दत्तात्रयने तिला विचारणा केली असता खोटे लग्न लावून देण्यासाठी २० हजार रुपये दिल्याचे दीपालीने सांगितले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दत्तात्रय हसबे याने विटा पोलिसांत जयश्री गदगे, सुनील शहा, धनम्मा बिराजदार, दीपाली शिंदे व प्रियांका शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दीपाली व प्रियांका शिंदे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

□ ट्रॅव्हल्स गाडी अचानक जळून खाक

पुणे : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस (ता. दौंड) भागवतवाडी येथे प्रवासी ट्रॅव्हल्स गाडीला अचानक आग लागून ती खाक झाली. ही घटना मंगळवारी (दि.२) मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडली. यातील १७ प्रवासी सुखरूप असून या घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही.

 

मंगळवारी रात्री १ च्या दरम्यान पुणे येथील भोसरीतुन अहमदपूरला जात असताना ओम साईराम कंपनीची ट्रॅव्हल्स बस (एमएच ११ सीएच ९९६६) ही पाटस येथून पुढे जात होती. यावेळी चालू ट्रॅव्हल्स गाडीच्या बोनटमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे गाडीला आग लागली. गाडी चालक विठ्ठल पंढरीनाथ वडारी यांना हे समजताच त्यांनी गाडी रोडच्या बाजूला घेऊन थांबवली. प्रसंगावधान साधून गाडीमध्ये असणाऱ्या क्लिनर सचिन प्रकाश कांबळे यांनी गाडीत असणाऱ्या १७ प्रवाशांना तात्काळ खाली उतरवले व पाणी मारून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला.

तेवढ्यात आगीने मोठा पेट घेऊन संपूर्ण गाडी जळून खाक झाली. या घटनेत कसलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती यवतच्या पोलीसांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नारायण पवार, हवालदार भाऊसाहेब बंडगर, पोलीस अजित काळे, समीर भालेराव, वाहतूक पोलीस व अग्नीशमक दल यांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

You Might Also Like

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण

TAGGED: #gang #robbing #girl #byfalsely #marrying #exposed #five #persons #Mileki #Solapur #charged #crime., #मुली #खोटे #लग्न #लुटणारी #टोळी #उघडकीस #सोलापूर #मायलेकी #सांगली #विटा #पाचजणांवर #गुन्हा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर : हद्द झाली… डॉक्टरानी ओटीपी व कन्फर्मेशन दिलेले नसतानाही सव्वा लाखाची फसवणूक
Next Article पंढरपूर : रेल्वेच्या धडकेत तीन बिहारी मजूरांच मृत्यू, रुळावर आढळल्या बाटल्या

Latest News

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन
महाराष्ट्र October 18, 2025
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला
महाराष्ट्र October 17, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?