Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शिवसेनेच्या दोन गटातील लढाई आता सुप्रीम कोर्टात, दोन वेगवेगळ्या याचिका दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

शिवसेनेच्या दोन गटातील लढाई आता सुप्रीम कोर्टात, दोन वेगवेगळ्या याचिका दाखल

Surajya Digital
Last updated: 2022/06/26 at 8:08 PM
Surajya Digital
Share
6 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ या आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आलीय□ शिवसेनेच्या 40 आमदारांचे मृतदेह येणार, संजय राऊतांची धमकी□ उद्धव ठाकरेंकडे उरले 55 पैकी 16 आमदार□ देशातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दणदणीत विजय

मुंबई : शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट व उद्धव ठाकरे गटाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. एकनाथ शिंदे गटाने 2 वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत. विधानसभेच्या उपाध्यक्षांनी दिलेल्या आपात्रतेच्या नोटीसीविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच, उद्धव ठाकरे गटाने अजय चौधरी यांची गटनेते पदी केलेली नियुक्ती अवैध असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.  Fight between two groups of Shiv Sena is now in the Supreme Court, two petitions have been filed by Rajkaran Thackeray Shinde

 

महाराष्ट्रातील राजकीय नाट्याचा पुढील अंक आता अपेक्षनुसार कोर्टात रंगणार आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे यांच्या गटातील 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे यांच्या गटातील 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली आहे. या नोटिशी विरोधात एकनाथ शिंदे आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या गटासमोर आता एखाद्या पक्षात विलीनीकरणाचा मार्ग आहे. त्यांनी विलीनीकरण न केल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करता येणे शक्य असल्याचे सुप्रीम कोर्टातील वकील ॲड. देवदत्त कामत यांनी सांगितले. ॲड. कामत यांच्याकडून शिवसेनेची कायदेशीर बाजू मांडण्यात येणार आहे. यावेळी त्यांनी कायदेशीर बाबी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.

शिवसेना भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना ॲड. देवदत्त कामत यांनी म्हटले. पक्षाचा व्हीप फक्त सभागृहाचे अधिवेशन सुरू असतानाच लागू होतो अशातला भाग नाही. तर, अधिवेशन नसतानाही व्हीप लागू होत असल्याचे ॲड. कामत यांनी सांगितले. शरद यादव यांनी विरोधी पक्षाच्या सभेत हजेरी लावली होती. मात्र, त्यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांचे राज्यसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. कोर्टानेही सभापतींचा हा निर्णय कायम ठेवला असल्याचे ही त्यांनी सांगितले.

 

शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांची भेट घेत बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी 12 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. त्यानंतर शुक्रवारी आणखी चार आमदारांना अशा एकूण 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर विधानसभा उपाध्यक्षांनी बंडखोर गटातील 16 आमदारांना अपात्रेची नोटीस बजावली. त्यानंतर आता शिंदे गटाने या नोटीशीला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आहे.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

त्यामुळे त्यांना अपात्रतेची नोटीस बजावण्याचा अधिकार नसल्याचा मुद्दा शिंदे गटाने उपस्थित केला आहे. कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर शिंदे गट आता सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे. शिंदे गट आता पक्ष प्रमुख ठाकरे यांना मात देण्यासाठी कायदेशीर मार्गाचा वापर करणार आहे.

दरम्यान, शुक्रवारी शिवसेना विधीमंडळ नेते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची बैठक झाली. ही बैठक जवळपास चार तास सुरू होती. बंडखोर आमदारांना नोटीसमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात येतील. त्यानंतर त्यांना अपात्र ठरविण्यात येईल, तसेच बंडखोर आमदारांना दोन दिवसांचा वेळ दिला जाईल. दोन दिवसात आमदार आपले उत्तर दाखल केले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांची भेट घेत बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी 12 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. त्यानंतर शुक्रवारी आणखी चार आमदारांना अशा एकूण 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर विधानसभा उपाध्यक्षांनी बंडखोर गटातील 16 आमदारांना अपात्रेची नोटीस बजावली. त्यानंतर आता शिंदे गटाने या नोटीशीला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.

□ या आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आलीय

 

1 ) एकनाथ शिंदे
2) अब्दुल सत्तार
3) संदीपान भुमरे
4) प्रकाश सुर्वे
5) तानाजी सावंत
6) महेश शिंदे
7) अनिल बाबर
8) यामिनी जाधव
9) संजय शिरसाट
10) भरत गोगावले
11) बालाजी किणीकर
12) लता सोनावणे
13) सदा सरवणकर
14) प्रकाश आबिटकर
15) संजय रायमूलकर
16) रमेश बोरनारे

□ शिवसेनेच्या 40 आमदारांचे मृतदेह येणार, संजय राऊतांची धमकी

 

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटात गेलेल्या आपल्याच पक्षाच्या आमदारांना धमकी दिली आहे. 40 आमदारांचे मृतदेह गुवाहाटीतून येतील त्यांना थेट शवागृहात पोस्टमॉर्टमसाठी पाठवू, अशी धमकी राऊतांनी दिली आहे. राऊत आज शिवसेना मेळाव्यात बोलत होते. दरम्यान, अशा भडकाऊ विधानांमुळे राज्यात हिंसाचार माजण्याची भीती व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत हे बंडखोर 40 आमदारांवर सडकून टीका करताना पाहायला मिळत आहे. असं असताना त्यांचा सख्खा भाऊ शिंदे गटात सहभागी होण्याच्या तयारीत असल्याने शिवसेना घरातच फुटली की काय? असे चित्रही उभे राहत आहे.

 

□ उद्धव ठाकरेंकडे उरले 55 पैकी 16 आमदार

 

– आदित्य ठाकरे – अजय चौधरी

– रमेश कोरगावकर – वैभव नाईक

– रवींद्र वायकर – उदयसिंह राजपूत

– संतोष बांगर – भास्कर जाधव

– सुनील राऊत – राजन साळवी

– नितीन देशमुख – कैलास पाटील

– राहूल पाटील – सुनील प्रभू

– प्रकाश फातर्फेकर – संजय पोतनीस

□ देशातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दणदणीत विजय

देशात झालेल्या लोकसभेच्या व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर व आझमगड हे 2 लोकसभा मतदारसंघ भाजपने जिंकले आहेत. सपाचा बालेकिल्ला असलेल्या आझमगडमधून भाजपच्या दिनेश लाल यादव निरहुआ यांनी अखिलेश यादव यांचे भाऊ धर्मेंद्र यादव यांचा पराभव केला आहे. तसेच, त्रिपुरामध्ये भाजपने 4 पैकी 3 जागा जिंकल्या आहेत आणि काँग्रेसने 1 जागा जिंकली आहे.

 

You Might Also Like

आयुष्यात कधीही भाजपसोबत जाणार नाही” – महादेव जानकरांचा स्पष्ट इशारा

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल गुरुवारी; सात आरोपींवर निर्णय

मुंबई विद्यापीठाचा निर्णय: विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदव्या घेण्याची संधी

“परभणी जिल्ह्यात काँग्रेस पुन्हा भक्कमपणे उभी करा” – हर्षवर्धन सपकाळ यांचा कार्यकर्त्यांना संदेश

सुशांतसिंग राजपूत प्रकरण : सीबीआय क्लोजर रिपोर्टवर रिया चक्रवर्तीला न्यायालयाची नोटीस

TAGGED: #Fight #two #groups #ShivSena #now #SupremeCourt #petitions #filed #Rajkaran #Thackeray #Shinde, #शिवसेना #दोन #गट #शिंदे #ठाकरे #लढाई #सुप्रीमकोर्ट #याचिका #दाखल #राजकारण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मसाप दक्षिण सोलापूर शाखेच्या अध्यक्षपदी महागांवकर तर कार्याध्यक्षपदी प्रशांत बडवे
Next Article संजय राऊतांच्या घरातच शिवसेना फुटली? आमदार भाऊ गुवाहाटीला जाण्याची चर्चा

Latest News

पावसामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित
देश - विदेश July 30, 2025
crime
सोलापूर : शेतकऱ्याच्या १.०७ लाख रुपयांच्या ट्रॅक्टर अवजारांची चोरी
सोलापूर July 30, 2025
आयुष्यात कधीही भाजपसोबत जाणार नाही” – महादेव जानकरांचा स्पष्ट इशारा
राजकारण July 30, 2025
लष्कर-ए-तैयबाच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नव्हता – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल
देश - विदेश July 30, 2025
जम्मू-काश्मीरमध्ये आयटीबीपी जवानांची बस सिंध नदीत कोसळली; सर्व जवान सुखरूप, चालक गंभीर जखमी
देश - विदेश July 30, 2025
पंतप्रधान मोदी २ ऑगस्ट रोजी वाराणसीतून किसान सन्मान निधीचा २०वा हप्ता वितरीत करणार
देश - विदेश July 30, 2025
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल गुरुवारी; सात आरोपींवर निर्णय
महाराष्ट्र July 30, 2025
ऑस्ट्रेलियात १६ वर्षांखालील मुलांसाठी यूट्यूबवर बंदी; सोशल मीडियावर सर्वप्रथम असा कायदा
देश - विदेश July 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?