Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शेतकऱ्याची पेट्रोलने पेटवून घेऊन आत्महत्या, सोलापुरात दोघांची गळफास घेऊन आत्महत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

शेतकऱ्याची पेट्रोलने पेटवून घेऊन आत्महत्या, सोलापुरात दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

Surajya Digital
Last updated: 2022/02/14 at 7:01 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

सोलापूर – अंगावर पेट्रोल ओतून पेटवून कर्नाटकातील एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास धत्तरगी (ता.अफजलपुर जि.कलबुर्गी) येथे घडली.

संगप्पा आडवीअप्पा  होगार (वय ३५ रा.धत्तरगी) असे मयताचे नाव आहे. काल रात्रीच्या सुमारास त्याने राहत्या घरात दारूचे नशेत अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले होते. त्याला भाजलेल्या गंभीर अवस्थेत गुंडप्पा होगार(मामा) यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात केलेले होते. उपचारादरम्यान तो पहाटे मरण पावला. कर्जाला कंटाळून त्याने आत्महत्या केली अशी चर्चा नातेवाईकात होती. या घटनेची प्राथमिक नोंद  सिव्हील पोलिस चौकीत झाली आहे .

□ गळ्यावर चाकूने वार करून वृद्ध इसमाची आत्महत्या; लिमयेवाडी येथील प्रकार

सोलापूर – आजारास कंटाळून एका ७६ वर्षीय वृद्ध इसमाने गळ्यावर चाकूने वार करून आत्महत्या केली. ही घटना लिमयेवाडी परिसरातील विठ्ठल मंदिराजवळ घडली.

रामचंद्र खंडू जाधव (वय ७६) असे मयताचे नाव आहे. ते अविवाहीत असून विठ्ठल मंदिराचे सेवेकरी होते. कांही दिवसापासून त्यांना दम्याचा आजार जडला होता. काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास त्यांनी गळ्यावर चाकूने वार करून घेतला होता. त्यांना मंदिरातील अच्युत मोफरे यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान ते शनिवारी पहाटे मरण पावले. या घटनेची नोंद सलगरवस्ती पोलिस झाली आहे. Farmer commits suicide by burning with petrol, two commit suicide by hanging in Solapur

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

□ उत्तर सोलापूर तालुका परिसरात विविध कारणावरून दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर – उत्तर सोलापूर तालुका परिसरातील कवठे आणि भाटेवाडी येथे विविध कारणावरून दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद सलगर वस्ती पोलिसात झाली आहे.

त्यापैकी पहिली घटना कवठे येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. शंकर बाबू गुडगे (वय ५५) असे मयताचे नाव आहे. काल रात्री ९ वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरातील लोखंडी  पाईपला दोरीने गळफास घेतला होता. मयत शंकर हा मजुरी करीत होता. याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. मणक्याच्या आजारास कंटाळून त्याने आत्महत्या केली. अशी प्राथमिक नोंद पोलिसात झाली. हवालदार उपासे पुढील तपास करीत आहेत.

तर दुसरी घटना भाटेवाडी येथे आज रविवारी सकाळच्या सुमारास घडली. धनाजी भारत टेळे असे मयताचे नाव आहे. तो मजुरी करीत होता. पहाटेच्या सुमारास त्याने स्वतःच्या घरातील लोखंडी अँगलला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे. घरातील किरकोळ तक्रारीवरून वरून त्याची पत्नी माहेरी गेली होती. या घटनेची नोंद वस्ती पोलिसात झाली. हवालदार गायकवाड पुढील तपास करीत आहेत .

You Might Also Like

उजनीतून ३७ लाख युनिट वीजनिर्मिती

सोलापूर विमानतळ परिसराची संयुक्त पाहणी

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

TAGGED: #petrol #commit #suicide #hanging #solapur, #शेतकरी #पेट्रोल #पेटवून #आत्महत्या #सोलापूर #गळफास #आत्महत्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विजेची वायर तुटून गोठ्यावर पडली, करंट लागून सोलापुरात ३२ शेळ्या दगावल्या
Next Article संभाजीराजे छत्रपतींची मोठी घोषणा; 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार

Latest News

कडूंच्या कार्यकर्त्यांनी शेतात रोवले चक्क भाजपचे झेंडे..!
राजकारण July 8, 2025
संसदीय राजभाषा समिती सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट
महाराष्ट्र July 8, 2025
देशव्यापी भारत बंदची हाक; 25 कोटी कामगार सहभागी, अत्यावश्यक सेवा ठप्प होण्याची शक्यता
देश - विदेश July 8, 2025
“मी मंत्री, आमदार नंतर… मराठी आधी!” – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र July 8, 2025
विरोधी पक्षनेत्यावरून विरोधकांचा सभात्याग
महाराष्ट्र July 8, 2025
महाराष्ट्रातील सहा औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार – मुख्यमंत्री
महाराष्ट्र July 8, 2025
या गोंधळाला केवळ गृहविभाग जबाबदार — सुप्रिया सुळे
महाराष्ट्र July 8, 2025
न्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीश होणे म्हणजे सामाजिक समतेचा विजय – एकनाथ शिंदे
महाराष्ट्र July 8, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?