प्रतिनिधी
सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटे वाडी ग्रामपंचायत येथील चार कोटी 42 लाख रुपयांच्या अपहरण प्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी बी. डी पाटील यांचे निलंबन करून विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे . अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासन विभागाकडून देण्यात आलीआहे.
याप्रकरणी सरपंच एस के राठोड उपसरपंच आर बी जाधव यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 अंतर्गत कलम 39 एक प्रमाणे कारवाईच्या अनुषंगाने पुढील सुनावनी 9 एप्रिल 2025 रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दक्षिण सोलापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी विद्यमान व तत्कालीन ग्रामसेवक तक्रारदार विनोद चव्हाण यांच्यासह सरपंच उपसरपंच यांना कागद पत्रा सह उपस्थित राहण्याचे जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी सुचित केले आहे.
फता टेवाडी ग्रामपंचायत अपहार प्रकरणे यापूर्वी ग्रामपंचायत अधिकारी विद्यमान सरपंच उपसरपंच यांच्यावर दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सलग दोन वर्षे सरपंच उपसरपंच तालुक्यातील फटाटेवाडी ग्रामपंचायत येथील अपहार प्रकरणे 18 मार्च 2025 आणि 25 मार्च 2025 अशा दोन सुनावण्या ठेवण्यात आल्या होत्या .या दोन्ही सूनावण्यात अर्जदार सरपंच गैरहजर राहिले आता तिसरी सू नावनी. 9 एप्रिल 2025 ला 20 ठेवण्यात आली आहे .या सुनावणी संबंधित सरपंच उपसरपंच व तत्कालीन तक्रार दार गैरहजर राहिल्यास संबंधित विभागातील आयुक्त कार्यालयात सादर करण्याचे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले