Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भाजपच्या फ्लॉप सभेचे छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशराजकारण

भाजपच्या फ्लॉप सभेचे छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल

Surajya Digital
Last updated: 2021/02/21 at 6:10 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : देशात पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पुढील दोन-महिन्यांत होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सभा, बैठका, विविध उपक्रम, कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित केले जात आहे. अशाच एका भाजपच्या फ्लॉप सभेचे छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. काँग्रेसचे नेते खासदार शशी थरूर यांनीही हे छायाचित्र ट्विट केले आहे.

पश्चिम बंगालमधील निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. ठिकठिकाणी सभा, विविध कार्यक्रम घेतले जात आहेत.  सध्या राज्यात परिवर्तन यात्राही काढण्यात आली आहे. सोशल मिडियावर व्हायरल झालेले छायाचित्र बंगालमधीलच असल्याचे बोलले जात आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

छायाचित्रामध्ये एका भल्या मोठ्या मैदानावर भाजपची सभा सुरू असल्याचे दिसते. सभेच्या स्टेजवर पाच नेते दिसत आहेत. तर मागील फलकावर सहा-सात नेत्यांचे छायाचित्र आहे. स्टेजच्या समोरही काही मोजक्याच खुर्च्या आहेत. पण केवळ एकच व्यक्ती समोर बसल्याचे दिसत आहे. त्याच्यासमोरच एका वक्त्याचे भाषण सुरू असल्याचे छायाचित्रात दिसते.

काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी हे छायाचित्र ट्विट केले आहे. त्यासाठी त्यांनी #PThepartyIsOver’ हा हॅशटॅग वापरला आहे. तसेच ‘स्टेजवर पाच लोक, चित्रात सात नेते. प्रेक्षकांमध्ये एक व्यक्ती. आणि हे केरळमध्येही नाही,’ असेही त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे. या ट्विटला अनेक नेटकऱ्यांनी लाईक तसेच शेअर केले आहे. त्याचप्रमाणे अनेकांनी शरूर यांची विविध छायाचित्र, व्हिडिओ टाकून त्यांची फिरकीही घेतली आहे.

You Might Also Like

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक

नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान

पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर

TAGGED: #Photo #ofBJP'sflop #meeting #goes #viral #onsocialmedia, #भाजपच्या #फ्लॉपसभेचे #छायाचित्र #सोशलमिडियावर #व्हायरल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article लस घेऊनही जिल्हाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह, उस्मानाबादेत खळबळ
Next Article सोलापुरात रेल्वेचा राज्यातील सर्वात पहिला सौर प्रकल्प, १२ ते १६ मेगावॅट वीज निर्मिती

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?