Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Face mask मंत्री चंद्रकांत पाटील यांना शाईफेकीची धास्ती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

Face mask मंत्री चंद्रकांत पाटील यांना शाईफेकीची धास्ती

Surajya Digital
Last updated: 2022/12/18 at 5:17 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

□ चंद्रकांतदादांनी स्वतःची घेतली फेसमास्क लावून काळजी

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ राज्यातील ग्रामपंचायतींसाठी आज मतदान》 पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा धिंगाणा

 

मुंबई : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना सांगवीत एका कार्यक्रमात शाईफेक करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर पाटील सावधान झाल्याचे पाहायला मिळाले. Pimpri Chinchwad face mask for minister Chandrakant Patil पिंपरी चिंचवडच्या सांगवी येथील कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी खबरदारी म्हणून चेहऱ्यावर थेट प्लास्टिकचं मास्क लावल्याचे बघायला मिळाले. याशिवाय धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा कार्यक्रमस्थळी ठेवण्यात आला.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. त्यांचा सर्व स्तरातून निषेध नोंदवण्यात आला.

 

संतप्त भावनेतून पिंपरी चिंचवड येथे भीमसैनिकांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकली. ही शाई त्यांच्या चष्म्यावर पडली, त्यांचा डोळा वाचला. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी जाहीर माफी मागितली आहे. तरीही भीमसैनिकांमध्ये त्यांच्याबाबत रोष कायम आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी पुन्हा शाईफेकीची धमकी आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी खबरदारी म्हणून की काय फेसमास्क लावत पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसून आले आहे.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

□ राज्यातील ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

 

महाराष्ट्र राज्यातील 7751 ग्रामपंचायतींसाठी आज रविवारी मतदान होत आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. या निवडणुकीची मतमोजणी 20 डिसेंबर रोजी होणार असून, विजयाचा गुलाल कोणा कोणाच्या अंगावर पडेल?, याचे चित्र मंगळवारी दुपारपासून स्पष्ट होईल. दरम्यान, सर्वांनी मतदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांच्या 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होणार आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5. 30 या वेळेत मतदान होईल. या निवडणुकीची मतमोजणी 20 डिसेंबर रोजी होणार असून, विजयाचा गुलाल कोणा-कोणाच्या अंगावर पडेल?, याचे चित्र 20 डिसेंबरला स्पष्ट होईल. सर्वांनी मतदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर गावागावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

 

》 पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा धिंगाणा

 

मुंबई- बीदर एक्सप्रेस काल पुणे स्थानकावर प्रवाशांनी रोखून धरली. लातूरला जाणाऱ्या प्रवाशांनी ही रेल्वे रोखली होती. ही रेल्वे मुंबईहून येतानाच भरुन आली होती. पुणे स्थानकावर रेल्वेतील प्रवाशांनी रेल्वेचे दारच उघडले नाही. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी आंदोलन केले. काहींनी तर रेल्वे रुळावरच झोपले. यानंतर रेल्वे पोलिसांनी हस्तक्षेप करत हा वाद मिटवला. यामुळे रेल्वे लातूरला दोन तास उशीरा आली.

 

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #PimpriChinchwad #facemask #minister #ChandrakantPatil, #मंत्री #पालकमंत्री #चंद्रकांतपाटील #शाईफेकीची #धास्ती #पिंपरचिचवड #सांगवी #फेसमास्क
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Mumbai Police मुलीचे लग्न सोडून ऑनड्यूटीवर; मुलीचे लग्न असताना ड्युटीला प्राधान्य
Next Article Maharashtra Police Bharti : पोलीस भरती – 18 हजार जागांसाठी 18 लाख अर्ज; 2 जानेवारीपासून मैदानी चाचणी, पण विशेष सूचना…

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?