Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अहमदाबादमध्ये 242 प्रवाशांना घेवून जाणारं विमान कोसळलं
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

अहमदाबादमध्ये 242 प्रवाशांना घेवून जाणारं विमान कोसळलं

admin
Last updated: 2025/06/12 at 6:52 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

अहमदाबाद, १२ जून, (हिं.स.) : गुजरातच्या अहमदाबाद शहरात आज गुरुवारी दुपारी एक भीषण विमान अपघात घडला. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या दिशेने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच विमानतळापासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलायनर ७८७ हे प्रवासी विमान मेघानी नगर परिसरात कोसळले आहे. विमानात एकूण २४२ प्रवासी आणि कर्मचारी सवार असल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बचाव आणि मदत कार्य सुरु करण्यात आले आहे.

विमानात टेकऑफनंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाचा विमानावरील ताबा सुटला आणि ते मेघानी नगर येथील मोकळ्या मैदानात कोसळले. या दुर्घटनेनंतर परिसरात प्रचंड आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पसरले, ज्यामुळे आसपासच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अपघातानंतर काही इमारतींना देखील नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर विमानाचे काही अवशेष आणि एक पंख तुटून पडलेले दिसले. घटनास्थळी तातडीने पोलीस, अग्निशमन दल, आपत्कालीन बचाव पथके आणि स्थानिक प्रशासनाने धाव घेतली. आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा मारा करण्यात आला असून, काही प्रमाणात आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. अनेक जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या अपघातामागील नेमके कारण शोधण्यासाठी विमानन प्राधिकरण आणि तांत्रिक तज्ज्ञांनी तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष तज्ज्ञांचे पथक लवकरच ब्लॅक बॉक्सची तपासणी करणार असून, त्यानंतर अपघाताचे खरे कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. सध्या विमानात 133 प्रवासी असल्याची माहिती समोर आली असली तरी, अधिकृत दुजोरा प्रतीक्षेत आहे. तसेच, या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील या विमानातून प्रवास करत होते, अशी प्राथमिक माहिती आहे.

विमान अपघाताची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरात मुख्यमंत्र्यांना फोन करुन माहिती घेतली आहे. तसेच, पोलीस आयुक्त, गुजरातच्या गृहमंत्र्यांना देखील अमित शाहांनी फोन केला. केंद्र सरकारकडून विमान दुर्घटनेनंतर सर्वतोपरी मदत व सहकार्याचे आश्वासन अमित शाह यांनी फोनवरुन दिले आहे.

या दुर्घटनेनंतर प्रशासनाने मेघानी नगर आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. विमानतळ परिसरातही कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि केवळ अधिकृत माहितीचीच वाट पाहण्याचे आवाहन करण्यात आले असून बचावकार्य आणि तपास प्रगतीपथावर आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अहमदाबाद : विमान दुर्घटनेवर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी व्यक्त केले दुःख
Next Article एक देश एक निवडणूक देशाला महासत्ता बनवेल : डॉ अजित गोपछडे

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?