नवी दिल्ली , 23 एप्रिल (हिं.स.)।काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट थांबवून दिल्लीत पोहचले आहेत.मोदींनी आज(दि.२३) सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बैठक बोलावली असून गृहमंत्री अमित शहा यांनाही तत्काळ आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी (दि.२२) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केल्याने २५ जणांचा मृत्यू झाला. लष्कराच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले, त्यांची ओळखपत्रे तपासली आणि नंतर ते हिंदू असल्याचे सांगत त्यांना गोळ्या घालून ठार मारले. २६ मृतांपैकी बहुतांश पर्यटक आहेत, तर दोन परदेशी आणि दोन स्थानिक नागरिक आहेत. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. त्याच वेळी, सुरक्षा यंत्रणांनी काल(दि.२२) रात्री उशिरा काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज(दि.२३) जम्मू बंद आहे. आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बैठक होणार आहे.
हल्ल्यानंतर, सौदी अरेबिया दौरा अर्धवट सोडून आज(दि. २३) सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत पोहचले आहेत. त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवरून बोलून त्यांना आवश्यक पावले उचलण्याचे आणि काश्मीरला पोहोचण्याचे निर्देश दिले. शाह यांनी तातडीने त्यांच्या निवासस्थानी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि नंतर श्रीनगरला पोहोचले