नवी दिल्ली, 15 ऑगस्ट – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून 101 मिनिटांहून अधिक काळ भाषण देत स्वतःचाच सर्वात प्रदीर्घ भाषणाचा विक्रम मोडला. याआधीचा त्यांचा विक्रम 2024 मध्ये झालेल्या 98 मिनिटांच्या भाषणाचा होता.
मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर अवघ्या एका वर्षात, 2015 मध्येच, 88 मिनिटांचे भाषण देत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या 72 मिनिटांच्या रेकॉर्डला मागे टाकले होते. त्यानंतर त्यांनी अनेकदा स्वतःचे विक्रम मोडत यंदा 101 मिनिटांचा नवा विक्रम प्रस्थापित केला.
यासह मोदींनी आणखी एक विक्रम केला – लाल किल्ल्यावर सलग 12व्यांदा तिरंगा फडकावणारे ते नेहरूंनंतर पहिले पंतप्रधान ठरले. यापूर्वी इंदिरा गांधी यांनी सलग 11 वेळा तिरंगा फडकावला होता.