नवी दिल्ली, ७ सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ सप्टेंबर रोजी पूरग्रस्त पंजाबला भेट देणार आहेत. या दरम्यान ते पूरग्रस्त भागातील नागरिकांशी संवाद साधतील आणि नुकसानग्रस्त परिस्थिती जाणून घेतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ सप्टेंबर रोजी पंजाबमधील गुरुदासपूरला येत आहेत. ते पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना थेट भेटतील आणि पीडितांना मदत करण्यासाठी ठोस पावले उचलतील.
गुरुवारी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी अमृतसर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना भेट दिली होती. त्यांनी असेही म्हटले होते की, पूरग्रस्त भागांचा आढावा घेण्यासाठी दोन केंद्रीय पथके पंजाबला भेट देत आहेत. जी त्यांचा अहवाल केंद्राला सादर करणार आहेत.
पंजाबमधील बहुतेक जिल्हे सध्या पुराच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान लक्षात घेता, केंद्रीय आर्थिक मदतीची सतत मागणी केली जात आहे.