नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी M – Yoga हे ॲप लाँच केल्याची घोषणा केली. या ॲपच्या माध्यामातून जगभरातील लोकांना वेगवेगळ्या भाषेत योगा शिकता येणार आहे. योग दिनी पंतप्रधान मोदींनी वन वर्ल्ड वन हेल्थ असा नारा दिला. भारताने जागतिक आरोग्य संघटनेसोबत मिळून M Yoga App तयार केलं आहे. 12 ते 65 वर्षे वयोगटातील व्यक्ती या ॲपच्या माध्यमातून योगा शिकू शकतात असं WHO ने म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग दिनी संबोधित करताना म्हटलं की, जेव्हा भारताने संयुक्त राष्ट्रात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव ठेवला होता तेव्हा त्यामागे संपूर्ण जगाला योगा सहजपणे माहिती व्हावा हीच भावना होती.
https://twitter.com/PMOIndia/status/1406784756348456964?s=19
या ॲपचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जगभरातील विविध भाषांमध्ये आपण योगा शिकू शकतो. योगा करणे आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाचे आहे, हे संपूर्ण जगाला कळले आहे. कारण कोरोनामध्ये आपल्या शरीराची ताकद आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योगा फायदेशीर ठरला. एम. योगा ॲपची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एम. योगा अॅपव्दारे जगामध्ये योगाचा प्रसार आणि प्रचार होईल. वन वर्ल्ड वन हेल्थ या प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी या ॲपमुळे मदत मिळेल.
https://twitter.com/indiainmedan/status/1406916146050203648?s=19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून दर वर्षी 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. जागतिक योग दिनाचे औचित्य साधून राज्यातील 2 हजार 700 पेक्षा अधिक ठिकाणी हा कार्यक्रम साजरा होत असतो. मात्र, यंदा कोरोनाचं संकट असल्याने कोणताही सार्वजनिक कार्यक्रम झाला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तम आरोग्यासाठी योगसाधनेचे महत्व लोकांना समजणे आवश्यक आहे. 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार, योगाची माहिती फ्रेंच, इंग्लिश, हिंदीसह संयुक्त राष्ट्रांच्या भाषेमध्ये येत्या काही महिन्यात उपलब्ध होणार आहे. ॲप सुरक्षित असून युजरचा कोणताही डेटा यातून घेतला जात नाही. 12 ते 65 वर्षे वयोगटातील व्यक्ती या ॲपच्या माध्यमातून योगा शिकू शकतात असंही WHO ने म्हटलं आहे.
योगामुळे माणसाला दीर्घायुष्य मिळण्यास मदत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भाषण केलं होतं. त्यावेळी त्यांनी योग दिनाचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेत अन्य देशांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्राने 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1406872120286535680?s=19
यंदाच्या योग दिनाची थीम ही योगा फॉर वेलनेस आहे. योगदिनाच्या शुभेच्छा देताना मोदींनी ट्विटरवर म्हटलं की, ‘योगा फॉर वेलनेस’ योगामुळे शारीरीक आणि मानसिक आरोग्य तंदुरुस्त राहण्यास मदत होते. आजार असेल तर तो शोधा, त्याच्या मुळापर्यंत जा आणि त्याचा उपचार निश्चित करा असं महात्म्यांनी सांगितलं आहे. कोरोनाच्या या संकटात योगाचा इम्युनिटीवर होणाऱ्या सकारात्मक परिणामावर संशोधन सुरु आहे. अनेक कोरोना रुग्णांनी योगा केला. कोरोना काळात योग करणं गरजेचं असल्याचंही मोदींनी सांगितलं.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1406848590379507714?s=19