Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पुणे दौऱ्यावर; एक तास घालवणार सिरम इन्स्टिट्यूटमध्ये वेळ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशमहाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पुणे दौऱ्यावर; एक तास घालवणार सिरम इन्स्टिट्यूटमध्ये वेळ

Surajya Digital
Last updated: 2020/11/26 at 6:41 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात कोरोना लसीची निर्मिती सुरु आहे. त्याचाच भाग असलेल्या ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि सिरम इन्स्टिट्यूटकडून निर्माण केली जाणारी कोविडशिल्ड ही लस अंतिम टप्प्यात असल्याचं सिरमचे अदर पुनावाला यांनी सांगितलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर आहेत आणि ते सिरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन लसीच्या प्रगतीचा आढावा घेणार आहेत.

सिरम आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे (आयसीएमआर) देशातील 15 केंद्रांवर कोव्हीशिल्ड लसीच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे या चाचण्या समाधानकारक असल्याची माहितीही सिरम आणि आयसीएमआरकडून व्यक्त करण्यात आली आहे. या चाचण्यांचे निकाल चांगले आले असून आता लस रुग्णांच्या वापरासाठी तयार असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत लस मिळण्याची शक्यता आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* एक तास घालावणार इन्स्टिट्यूटमध्ये वेळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 28 नोव्हेंबरला पुण्यात येणार आहेत. त्याच दिवशी ते सिरम इन्स्टिट्यूला भेट देणार आहेत. दुपारी 1 ते 2 या दरम्यान मोदी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लसीच्या निर्मितीबाबत माहिती घेतील. त्यानंतर 4 डिसेंबरला 100 देशांचे राजदूत सिरम इन्स्टिट्यूट आणि हिंजवडीतील जिनेव्हा बायोटेक कंपनीला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि 100 देशांच्या राजदूतांचा दौरा नक्की असून, त्याची अधिकृत माहिती लवकरच प्राप्त होईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉक्टर सौरभ राव यांनी दिली आहे.

* डिसेंबरपर्यंत 10 कोटी डोस पुरवणार

संपूर्ण जगात सध्या कोरोना लसीवर मोठ्या वेगाने काम सुरू आहे. यातच पुण्यातल्या कोव्हीशिल्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. भारतात डिसेंबरपर्यंत सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीचे 10 कोटी डोस पुरवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जर असं झालं तर कोरोनाचा संसर्ग संपवण्यात भारताला मोठं यश येईल.

* ‘सिरम’ची कोरोना लस 225 रुपयांना

सिरम इन्स्टिट्यूटच्या लस उत्पादनासंदर्भात एक महत्त्वपूर्ण करार झाला आहे. त्यामुळे आता सिरमची कोरोना लस साधारण 225 रुपयांना उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली.   सिरम इन्स्टिट्यूटचा बिल गेट्स फाउंडेशनबरोबर महत्त्वपूर्ण करार झाला. या करारानुसार बिल गेट फाउंडेशन सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तब्बल 150 मिलियन डॉलर गुंतवणूक करणार आहे. या माध्यमातून सिरम इन्स्टिट्यूट तब्बल 100 मिलियन डोस तयार करणार आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

TAGGED: #पंतप्रधाननरेंद्रमोदी #शनिवारी #पुणेदौऱ्यावर #एकतास #घालवणार #सिरमइन्स्टिट्यूटमध्ये #वेळ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article प्रचाराला जात असलेल्या ‘वंचित’च्या लातूर जिल्हाध्यक्षांसह पाचजणांचा दुर्दैवी मृत्यू
Next Article राज ठाकरे ‘ठाकरे सरकार’वर कडाडले, हा तर सरकारचा ‘जिझिया’ कर

Latest News

Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Hitnspin Cazinou – Pentru toți cei căror le îi place să cumpere inteligent
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?