Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंतप्रधानांनी केली स्वामित्व योजनेची सुरुवात; एक लाख लोकांना घरांच्या प्रॉपर्टी कार्डचे केले वितरण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थदेश - विदेश

पंतप्रधानांनी केली स्वामित्व योजनेची सुरुवात; एक लाख लोकांना घरांच्या प्रॉपर्टी कार्डचे केले वितरण

Surajya Digital
Last updated: 2020/10/11 at 3:30 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरंसद्वारे 6 राज्यांतील 763 खेडेगावांतील एक लाख लोकांना स्वामित्व योजनेच्या माध्यमातून घरांच्या प्रॉपर्टी कार्डचे वितरण केले. या सर्व लाभार्थ्यांनी त्यांचे स्वामित्व कार्ड ऑनलाईन डाऊनलोड केले होते.

22 एप्रिल रोजी या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. या योजनेनुसार भूधारक त्यांच्या संपत्तीचा वापर कर्ज घेण्यासाठी किंवा इतर आर्थिक लाभ घेण्यासाठी करू शकतील. ही योजना पंचायत राज मंत्रालयातर्फे राबवण्यात येणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असेही म्हटले आहे की जगात एक तृतीयांश लोकांकडेच त्यांच्या संपत्तीचे रेकॉर्ड उपलब्ध आहे. उरलेल्या दोन तृतीयांश लोकांकडे ही माहिती उपलब्ध नाही. अशा वेळी भारतासारख्या विकसनशिल देशातील लोकांकडे त्यांच्या संपत्तीचे रेकॉर्ड असणे आवश्यक आहे.

* 6 राज्यांतील 763 गावातील लोकांना फायदा

स्वामित्व योजनेचा फायदा हा 6 राज्यांतील 763 गावातील लोकांना होणार आहे. त्यात उत्तर प्रदेशातील 346, हरियाणातील 221, महाराष्ट्रातील 100, मध्य प्रदेशातील 44, उत्तराखंडातील 50 आणि कर्नाटकातील 2 खेडेगावांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील गावांव्यतिरिक्त बाकी राज्यांतील गावांतील लाभार्थ्यांना एका दिवसाच्या आत त्यांचे संपत्ती कार्ड मिळेल. महाराष्ट्र शासन संपत्ती कार्डवर सामान्य शुल्क लावण्याचा विचार करत आहे, त्यामुळे इथल्या लाभार्थ्यांना त्यांचे संपत्ती कार्ड मिळण्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

* विरोधकांचा विरोध स्वत:च्या भल्यासाठी

विरोधी पक्षावर टीका करताना पंतप्रधान म्हणाले की शौचालयं आणि विजेची समस्या खेडेगावांत होती. महिलांना चुलीवर जेवन तयार करणे नाईलाज होता. अनेक वर्षे सत्तेचा उपभोग घेतलेल्यांनी मोठ्या-मोठ्या बढाया मारल्या पण त्यांनी खेडेगावांना त्यांच्या नशिबांवर सोडून दिले. मी असे करू शकत नाही. खेडेगावातील लोकांना आणि गरीबांना ते आहेत त्याच परिस्थितीत ठेवणे हा काही लोकांच्या राजकारणाचा भाग आहे. कृषीसंबंधी लागू करण्यात आलेल्या तीन नव्या ऐतिहासिक कायद्यांनाही त्यांचा विरोध आहे. त्यांचा विरोध हा शेतकऱ्यांच्या भल्यासाठी नसून त्यांच्या स्वत:साठी आहे.

“स्वामित्व योजना खेडेगावात राहणाऱ्या लोकांना आत्मनिर्भर बनण्यासाठी मदत करेल. आपल्याकडे असे म्हंटले जाते की भारताचा आत्मा हा त्याच्या खेडेगावांत आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की या खेडेगावांकडे आतापर्यंत कोणीही लक्ष दिले नाही. मी खेडेगावातील माझ्या बांधवांना त्यांच्या नशिबावर सोडून देणार नाही.” नरेंद्र मोदी – पंतप्रधान

You Might Also Like

पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा

न्यायाबरोबर निसर्गाचे रक्षण देखील सामाजिक जबाबदारी – सत्र न्यायाधीश अंजू शेंडे

इराणने मोसादशी संबंध असलेल्या तीन गुप्तहेरांना दिली फाशी, ७०० जणांना अटक

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातुन उपमुख्यमंत्रील अजित पवार विजयी

विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा करणारा पाकिस्तानी मेजर टीटीपी हल्ल्यात ठार

TAGGED: #स्वामित्वयोजना #संपत्तीचे #रिकार्ड #विरोधक #ऐतिहासिक #लाखप्रापर्टीकार्डचे #वितरण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रेल्वे लाईन क्रॉस करताना भीषण अपघात, जागीच 17 जणांचा मृत्यू तर 30 जखमी
Next Article अरण्यऋषी मारुती चितमपल्ली नागपूर सोडून सोलापूरला राहायला येतायत

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?