Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: 2021 वर्ष कोरोनावरील उपचाराचा आशेचा किरण : पंतप्रधान मोदी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

2021 वर्ष कोरोनावरील उपचाराचा आशेचा किरण : पंतप्रधान मोदी

Surajya Digital
Last updated: 2021/01/01 at 9:30 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : आरोग्य हीच संपत्ती आहे हे मावळत्या वर्षाने शिकवलं. 2020 हे आव्हानांचं वर्ष होतं. 2020 चा मंत्र ‘जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं’ हा होता. आता 2021चा मंत्र -आपल्याकडे ‘औषध आहे आणि सावधगिरीसुद्धा’ हा आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. राजकोट येथील नव्या ‘एम्स’चा पायाभरणी समारंभ मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे पार पडला. यावेळी ते बोलत होते.

भारत एकत्र येतो तेव्हा कोणत्याही मोठ्यातील मोठ्या संकटाशी यशस्वीरित्या दोन हात करू शकतो, असे या वर्षाने दाखवून दिले आहे. परिणामकारक पावले उचलल्याने भारतात उत्तम परिस्थिती आहे. कोरोना रुग्णांना वाचवण्यात भारत इतर देशांपेक्षा कितीतरी पटीने आघाडीवर आहे. भारतात लसीसंबधी आवश्‍यक ती सर्व खबरदारी घेतली जात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. गेल्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये करोनाच्या प्रादुर्भावामुळे नैराश्याचं वातावरण होतं, सगळीकडे संशयाचं वातावरण होतं, मात्र 2021 हे कोरोनावरील उपचाराचा आशेचा किरण घेऊन येत आहे, असं मोदी म्हणाले.

भारतात बनलेली लस भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी घेतले जात असलेले प्रयत्न आता अंतिम टप्प्यात आहे. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवण्यासाठी भारताची तयारी वेगाने सुरू आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

गतवर्षी ज्याप्रमाणे संसर्ग रोखण्यासाठी आपण एकत्रितपणे प्रयत्न केले तसेच लसीकरण यशस्वी करण्यासाठीही करण्याचे आवाहन त्यांनी केले, राजकोटच्या एम्समुळे 5 हजार थेट नोकऱ्या तर अगणित अप्रत्यक्ष रोजगार संधी मिळतील, असे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एवढी दशके उलटूनही देशात फक्त 6 एम्स आहेत. अटलजींच्या 2003 मधील सरकारने अजून 6 मोठी एम्स स्थापन करण्याच्या दृष्टीने पावले उचलली होती. गेल्या सहा वर्षात 10 नवी एम्स सुरू झाली. आयुष्मान भारत योजनेखाली दूर्गम भागांमध्ये 1.5 दशलक्ष आरोग्य केंद्र व वेलनेस केंद्रे उभारण्याचे काम सुरू असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

2020 हे आरोग्य आव्हानांचे वर्ष होते, तर 2021 हे आरोग्यविषयक समस्यांच्या सोडवणुकीचे वर्ष असेल. भारताने ज्याप्रमाणे आरोग्य आव्हानांचा सामना करताना महत्वाची भूमिका बजावली त्याचप्रमाणे आरोग्यसमस्यांचे निराकरण करतानाही बजावेल. जग सजगतेने आरोग्य सुविधांकडे पाहिल.

आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी 2021 मधील भारताचे योगदान हे या समस्येच्या प्रमाणात महत्वाचे ठरेल, असेही ते म्हणाले. भारत हा भविष्यातील आरोग्य आणि आरोग्यातील भविष्य या दोहोंमध्येही महत्वाची भूमिका बजावेल असे मोदींनी सांगितले.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #2021वर्ष #कोरोनावरील #उपचाराचा #आशेचा #किरण #पंतप्रधान #मोदी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नवीन वर्षातील पहिली मोठी बातमी, फायजर-बायोटेक लसीच्या इमर्जन्सी वापराला मंजुरी
Next Article नवीन वर्षात पहिल्याच दिवशी कमर्शियल गॅस सिलेंडर महागला

Latest News

test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?