Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लग्नाचे आमिष दाखवून आणलेल्या विधवा महिलेस विष पाजले; हिरज येथील घटना
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

लग्नाचे आमिष दाखवून आणलेल्या विधवा महिलेस विष पाजले; हिरज येथील घटना

Surajya Digital
Last updated: 2023/03/15 at 9:59 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

सोलापूर – लग्नाचे आमिष दाखवून पुणे येथील एका विधवा महिलेस सोलापुरात आणल्यानंतर तिला मारहाण करीत विष पाजल्याची घटना हिरज (ता.उत्तर सोलापूर ) येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. तिला बेशुद्ध अवस्थेत सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. A widow lured into marriage was poisoned; Incident at Hiraj Solapur Pimpri Chinchwad Pune

Contents
》 मोहोळ येथे मेहुण्यास पळवून चाकूने मारहाणस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 तृतीयपंथीयाशी अनैतिक संबंध; पत्नीने केला अडसर ठरणा-या पतीचा खून

 

ती ३० वर्षीय महिला (पिंपरी चिंचवड जि.पुणे) येथे राहण्यास होती. तिच्या पतीचे निधन झाले होते. त्यानंतर तिच्या परिचयातील सागर फंड (रा. हिरजगाव ता. उत्तर सोलापूर) याने तिला सहा महिन्यापूर्वी तुझ्याशी लग्न करतो असे म्हणत तिला आपल्या गावात आणले होते. त्यानंतर सायंकाळी सागर फंड आणि बापू भोसले या दोघांनी तिला मारहाण करीत बळजबरीने विष पाजले. तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ती बेशुद्ध आहे. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

 

》 मोहोळ येथे मेहुण्यास पळवून चाकूने मारहाण

 

सोलापूर – घरगुती भांडणातून मेहुण्यास गोड बोलून दुसरीकडे नेऊन चाकू आणि लाथाबुक्क्याने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना चंद्रमौळी ता.मोहोळ) येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली.

रेवणसिद्ध गोकुळ व्हनमाने (वय २६ रा. कुंभारखणी, मोहोळ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला मोहोळ येथे प्राथमिक उपचार करून नवनाथ (भाऊ) यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले . रेवणसिद्ध व्हनमाने हा काल घरात बसला होता. त्याचा भाऊजी नितीन सोनटक्के (रा.नागनाथनगर मोहोळ) याने त्याला घरगुती भांडणातून गोड बोलत चंद्रमौळी येथे नेले . त्यानंतर नितीन व त्याच्या एक साथीदार असे दोघांनी त्याला चाकू आणि लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यात तो जखमी झाला. अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

》 तृतीयपंथीयाशी अनैतिक संबंध; पत्नीने केला अडसर ठरणा-या पतीचा खून

 

सोलापूर : तृतीयपंथीयाशी अनैतिक संबंध त्यात पतीचा अडसर मग काय पत्नीने अडसर ठरणा-या पतीचा तृतीयपंथीयाच्या मदतीने खून केला. उलट पती हरवल्याची तक्रारही त्याच खून करणा-या पत्नीने पोलिसात दिली. वाचा सोलापुरात घडलेली घटना.

 

अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा तृतीयपंथीय मित्राच्या मदतीने खून करून रेल्वे मार्गावर टाकून दिल्याप्रकरणी पंढरपूर शहर पोलिसांनी आरोपी पत्नी व तिच्या तृतीयपंथीय प्रियकराला अटक केली आहे.

मंगळवारी ( दि. ७ मार्च) रामबाग झोपडपट्टी परिसरात राहणारा वैभव हा सायंकाळच्या सुमारास अर्बन बँक चौकाकडे म्हणून गेला. त्यानंतर तो गायब झाला होता. ८ तारखेला वैभव मगर याच्या पत्नीने नवरा हरवल्याची तक्रार पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दिली.

 

त्यानुसार पोलिसांनी वैभव यांच्या मोबाइलचे कॉल रेकॉर्डिंग तपासले. दरम्यान, सांगोला तालुक्यातील मांजरी गावच्या हद्दीत रेल्वे रुळावर एका व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची माहिती पंढरपूर शहर पोलिस ठाण्याला मिळाली. त्यामुळे हरवलेल्या व्यक्तीचे वर्णन आणि सांगोला तालुक्यात सापडलेल्या मृतदेहाचे वर्णन मिळतेजुळते असल्यामुळे पंढरपूर पोलिसांनी या संदर्भात सांगोला पोलिसांकडे अधिक चौकशी केली.

 

त्यानंतर पोलिसांनी मृताच्या पत्नीला ताब्यात घेतले. त्यावेळी मृताची पत्नी व तृतीयपंथी अक्षय रमेश जाधव यांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. या अनैतिक संबंधांमध्ये वैभव मगर अडथळा ठरत असल्यामुळे त्या दोघांनी वैभव याला सांगोला रोडवरील दाते मंगल कार्यालय येथे ठार मारले व त्याचा मृतदेह खासगी वाहनातून मांजरी (ता. सांगोला) येथील रेल्वे रुळावर टाकून दिला. या खूनप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. तर खासगी वाहनाचा चालक अमोल खिलारे याचा पोलिस शोध घेत आहेत.

 

 

You Might Also Like

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट

सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार

सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू

सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

उजनीतून ३७ लाख युनिट वीजनिर्मिती

TAGGED: #widow #lured #marriage #poisoned #Incident #Hiraj #Solapur #PimpriChinchwad #Pune, #पिंपरीचिंचवड #पुणे, #सोलापूर #लग्न #आमिष #दाखवून #विधवा #महिला #विष #पाजले #हिरज #घटना
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्या 17, आज तीन रुग्ण आढळले
Next Article तब्बल बारा वर्षांपासून प्रलंबित असलेले महापालिकेतील रोस्टर अखेर मंजूर

Latest News

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट
सोलापूर July 10, 2025
सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार
सोलापूर July 10, 2025
crime
सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू
सोलापूर July 10, 2025
पावसाळ्यात वाढला डेंग्यूचा धोका; सहा महिन्यात २८७ जणांना डेंग्यूची लागण
महाराष्ट्र July 10, 2025
सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
सोलापूर July 10, 2025
वडोदरा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा १५ वर; बचावकार्य सुरू
Top News July 10, 2025
मुख्यमंत्री विदर्भाचा, पण काही कामाचा नाही – बच्चू कडू
Top News July 10, 2025
ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात, 2145 वैज्ञानिक ‘नासा’मधून पडले बाहेर
Top News July 10, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?