Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोहोळ परिसरात विष प्राशन केल्याने दोघांचा मृत्यू, पंढरपुरातील अपघातात एक ठार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

मोहोळ परिसरात विष प्राशन केल्याने दोघांचा मृत्यू, पंढरपुरातील अपघातात एक ठार

Surajya Digital
Last updated: 2022/02/11 at 11:02 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

सोलापूर – मोहोळ तालुका परिसरातील देवडी आणि वरवटे येथे विष प्राशन केल्याने दोघांचा सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना काल गुरुवारी मृत्यू झाल्याची नोंद पोलिसात झाली आहे.

रमेश पितांबर थोरात (वय 53 रा.देवडी ता. मोहोळ) असे मयताचे नाव आहे. त्याने 7 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास स्वतःच्या शेतात दारूच्या नशेत विष प्राशन केले होते. त्याला मोहोळ येथे प्राथमिक उपचार करून रोहन (मुलगा) यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तो आज सकाळी मरण पावला.

दुसरी घटना वरवटे येथे घडली. मंदाकिनी गंगाराम वाघमोडे (वय ३५) असे मयत महिलेचे नाव. आहे काल बुधवारी सकाळी तिने खोकल्याचे औषध समजून विषारी द्रव प्राशन केली होती. तिला उपचारासाठी सोलापुरात दाखल केले असता ती दुपारी मरण पावली. या दोन्ही घटनांची  प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे .

□ पंढरपूर येथे ट्रकच्या धडकेने दुचाकी चालक ठार

सोलापूर – पंढरपूर येथील अहिल्या चौकाजवळ वेगाने जाणार्‍या ट्रकच्या धडकेने उमेश रामू चव्हाण (रा.पाथर्डी जि. अहमदनगर) हा दुचाकी चालक गंभीर जखमी मरण पावला. बुधवारी (ता.9)  सकाळी 11 वाजेच्या सुमारास तो दुचाकी वरून पंढरपुर ते अहिल्या चौकाच्या दिशेने निघाला होता. जगताप पेट्रोल पंपाजवळ पाठीमागून सिजे 04 – 6852 हा ट्रक धडकल्याने तो गंभीर जखमी होऊन मरण पावला. या अपघाताची नोंद पंढरपूर पोलिसात झाली. पोलिसांनी शुभम पटेल (रा.सतना,मध्य प्रदेश) या ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. हवालदार ढवळे पुढील तपास करीत आहेत. Two killed due to poisoning in Mohol area, one killed in Pandharpur accident

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

□ रेल्वेतून उडी मारल्याने चौदा वर्षाची मुलगी जखमी

सोलापूर – पुणे रेल्वे स्थानकात रेल्वेतून उडी मारल्याने सोलापुरातील विजापूर नाका झोपडपट्टी परिसरात राहणारी एक चौदा वर्षाची मुलगी जखमी झाली. तिला पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात गुरुवारी दाखल करण्यात आले. ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास तिने पुणे स्थानकात रेल्वेतून उडी मारली होती. यामागचे कारण समजले नाही. या घटनेची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.

□ आष्टी येथे पूर्वीच्या भांडणावरून तलवारीने हल्ला, तरुण जखमी

सोलापूर – पूर्वीच्या भांडणावरून तलवार, लोखंडी गज आणि काठीने केलेल्या मारहाणी तरुण जखमी झाला. ही घटना आष्टी (ता.मोहोळ) येथील चौकात बुधवारी (ता. 9) रात्रीच्या सुमारास घडली.

राम नागनाथ माने (वय 30, रा.आष्टी) असे जखमीचे नाव आहे. त्याला मोहोळ येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात सुनील खंदारे (भाऊजी) यांनी दाखल केले. काल रात्री दहा वाजेच्या सुमारास गावातील चौकात त्याला अरविंद भीमराव गुंड, लालासाहेब गुंड, शेखर शिंदे, विष्णु शिंदे आणि अन्य पाच जणांनी मारहाण केली. असे प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे .

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Twokilled #poisoning #Mohol #area #Pandharpur #accident, #मोहोळ #परिसर #विष #प्राशन #दोघांचा #मृत्यू #पंढरपूर #अपघात #एकठार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माघी वारी : पाच ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना, नगरपालिकेच्या उपबंधाऱ्यातून  चंद्रभागेत सोडले पाणी
Next Article रस्ते अपघातातील जीवितहानी कमी करण्यासाठी नितीन गडकरींची मोठी घोषणा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?