Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पोलीस भरतीवरील निर्बंध अखेर हटविले, पहिल्या टप्प्यात पाच हजार जागांसाठी पोलिस भरती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

पोलीस भरतीवरील निर्बंध अखेर हटविले, पहिल्या टप्प्यात पाच हजार जागांसाठी पोलिस भरती

Surajya Digital
Last updated: 2021/01/22 at 5:27 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : राज्य शासनाच्या पदभरतीवर वित्त विभागाने आणलेल्या निर्बंधातून सूट देत पोलीस शिपायांची १२ हजार ५२८ पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश गुरुवारी काढण्यात आला. यापैकी २०१९  मधील रिक्त ५ हजार २९७ पदे भरण्याला पहिल्या टप्प्यात अनुमती देण्यात आली असून, उर्वरित पदांसाठीचा आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्याच्या आर्थिक स्रोतांवर प्रतिकूल परिणाम झाला होता. त्या पार्श्वभूमीवर ४ मे २०२० रोजी एक आदेश काढून वित्त विभागाने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता अन्य विभागांनी नवीन कोणतीही पदे भरण्यावर निर्बंध घातले होते. नुकत्यात दिलेल्या आदेशाने गृह विभागाला पोलीस भरतीसाठी त्यातून सूट देण्यात आली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपायांची पदे १०० टक्के भरण्याला अनुमती देण्यात येत असल्याचे वित्त विभागाने गुरुवारच्या आदेशात स्पष्ट केले आहे. दिनांक १३ नोव्हेंबर २०२० च्या मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस शिपायांची २०१९ मधील रिक्त ५,२९७ पदे तसेच  २०२० मधील ६,७२६ पदे, मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी ५०५ अशी एकूण १२,५२८ पदे भरण्यासाठी आधीचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यासंबंधीचा शासन आदेश  गुरुवारी काढण्यात आला.

पहिल्या टप्प्यातील पोलीसभरती नक्षलग्रस्त भागात वर्धा – मराठा आरक्षणाच्या मुद्यामुळे पोलीसभरती रखडली होती. मात्र, आता पोलीसभरती घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने नक्षलग्रस्त भागासह पहिल्या टप्प्यात पाच हजार जागांसाठी भरती घेण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच भरती सुरू होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी येथे दिली.

“राज्यात पोलीस शिपायांची पदे भरण्याचा शब्द आमच्या सरकारने पाळला आहे. आजच्या आदेशाने पोलीस दल अधिक मजबूत होण्यास मदत होईल”
– अनिल देशमुख, गृहमंत्री

You Might Also Like

त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण

अतिवृष्टीमुळे कोल्हापूर-रत्नागिरी रोडवर वाहतूक कोंडी

तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी – विजय वडेट्टीवार

मुंबई-ठाण्यात मुसळधार पावसाचा कहर; वाहतुकीवर मोठा परिणाम

राज्यात मुसळधार पावसाचा कहर; अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर

TAGGED: #पोलीसभरतीवरील #निर्बंध #हटविले #पहिल्याटप्प्यात #पाचहजारजागांसाठी #पोलिसभरती
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सिस्टिम अपग्रेडेशनसाठी १ ते ३ या कालावधीत यूपीआय पेमेंट्स सेवेमध्ये समस्या
Next Article नारायण राणेंना आता सुखाने झोप लागेल, तसेच शेतकरी आंदोलनात सहभागी होणार – शरद पवार

Latest News

सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
देश - विदेश August 18, 2025
‘द बंगाल फाइल्स’वरून विवेक अग्निहोत्रींविरुद्ध नवा एफआयआर
देश - विदेश August 18, 2025
त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण
महाराष्ट्र August 18, 2025
सोलापुरात डीजेमुक्त गणेश मंडळांना विशेष बक्षीस
सोलापूर August 18, 2025
शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष; महाडीबीटी पोर्टलमुळे लाभार्थी वंचित
सोलापूर August 18, 2025
सोलापुरात जिल्हा परिषदेची दोन एकरांची फाईल गायब
सोलापूर August 18, 2025
बिहारचा औंठा-सिमारिया ६ पदरी पूल पूर्ण; २२ ऑगस्टला पंतप्रधान करतील उद्घाटन
देश - विदेश August 18, 2025
वंदे भारतला जोडणार चार डबे; ३१२ प्रवाशांना अतिरिक्त सुविधा
सोलापूर August 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?