Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: घरफोडीतल्या आरोपीचा पोलिस कोठडीत उपचारादरम्यान मृत्यू, आता सीआयडी करणार तपास
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

घरफोडीतल्या आरोपीचा पोलिस कोठडीत उपचारादरम्यान मृत्यू, आता सीआयडी करणार तपास

Surajya Digital
Last updated: 2021/10/04 at 7:36 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : विजापूर नाका पोलीस कोठडीतून उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या भीमाशा रज्जा काळे (भांबुरे पारधी वस्ती, कुर्डुवाडी, ता. माढा) याचा उपचारादरम्यान काल रविवारी मृत्यु झाला. हा मृत्यु पोलीसांच्या मारहाणीत झाला आहे असा आरोप पारधी समाजातील युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येवून केला.

आज सोमवारी सकाळपासून पोलीसांकडून विजापूर नाका जिल्हाधिकारी कार्यालयात सोलापूर आणि उस्मानाबाद येथून भिमशा काळे यांचे नातेवाईक जमा झाले. तो पारधी आहे आणि तो गुन्हेगारच आहे असं समजून पोलीसांनी काळे याला बेदम मारहाण केली, असा आरोप भिमशा यांच्या पत्नीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केला.

न्यायालयाने त्याला 25 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली. मात्र, 24 सप्टेंबरलाच त्याला त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला (Civil Hospital) हलविण्यात आले. काल रविवारी (ता. 3) उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि पोलिसांच्या मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला. आता या प्रकरणाचा पुढील तपास सीआयडीमार्फत (CID) केला जाणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मला 7 मुलं आहेत, पती गेला आता सारेजण रस्त्यावर आलो आहोत न्याय द्या, अशी ती मागणी करत होती. भिमशा काळे यांच्या चोरीचे विविध गुन्हे विविध पोलीस स्टेशनला दाखल झाले. संशयावरुन त्यांना कुर्डुवाडी पोलीसांकडून विजापूर नाका पोलीसांनी काही दिवसापूर्वी ताब्यात घेतलं. तपास करताना त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यात तो गंभीर जखमी झाला होता असे काळे यांच्या वकिलांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे यांचे दोनशेवर स्त्री-पुरुष नातेवाईक आणि सहकारी जमले होते. याठिकाणी प्रशासनाच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलनही करण्यात आलं. जिल्हाधिकारी आल्यानंतर या हे सर्वजण त्यांच्या कक्षात आले. पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

दरम्यान, न्यायालयाने 25 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली. परंतु, 24 तारखेलाच त्याला त्रास होऊ लागला. त्याच्या किडनीवर डायलेसिसचे उपचार सुरू होते. मानसिकदृष्ट्या तो आजारी असल्याने त्याला सिव्हिल हॉस्पिटलला उपचारासाठी हलविले होते. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून त्याला कोणत्याही प्रकारची मारहाण झाली नसल्याचेही विजापूर नाका पोलिसांनी सांगितले.

“घरफोडीत काहीही संबंध नसताना पोलिसांनी संशय घेऊन माझ्या पतीला अटक केली. त्यानंतर पोलिस ठाण्यात त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला आणल्यानंतर ते नैसर्गिक विधीसाठी जाताना त्यांच्या पायातून रक्‍त पडत होते”

– मयताची पत्नी

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Accused #burglary #dies #treatment #police #custody #CID #investigate, #घरफोडीत #आरोपी #पोलिसकोठडी #मृत्यू #सीआयडी #तपास
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘त्या’ प्रत्येक मुलांच्या खात्यात 5 लाख जमा; 24 जिह्यांमधील बालकांच्या खात्यात पैसे वर्ग
Next Article माढ्यात लिपिकाच्या घरावर सशस्त्र दरोडा; बार्शीत सास-याने सुनेला कात्रीने भोसकली

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?