Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘त्या’ अनोळखी महिलेची हत्याच; कामती पोलिसाने जारी केले रेखाचित्र, ओळखच पटेना, पोलिसाचे आवाहन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

‘त्या’ अनोळखी महिलेची हत्याच; कामती पोलिसाने जारी केले रेखाचित्र, ओळखच पटेना, पोलिसाचे आवाहन

Surajya Digital
Last updated: 2023/03/25 at 7:38 PM
Surajya Digital
Share
6 Min Read
SHARE

 

Contents
》 सोलापुरात घरगुती कुंटणखान्यावर धाड; एकास अटक तर पीडीतेची सुटकास्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पतीसह तिघांवर गुन्हा● पोलीस ठाण्यात जाणाऱ्या सुनेचा सासूने घेतला चावा सासूसह आठ जणांवर गुन्हा

विरवडे बु – गेल्या काही दिवसापूर्वी मोहोळ तालुक्यातील शिंगोली शिवारातील उसाच्या फडात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. The murder of ‘that’ unknown woman; Kamti Police issued drawing, not identified, police appeal Solapur Mohol पोलिसांच्या प्राथमिक तपासात तिची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले असून कामती पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पुढे तपास चालू सुरू ठेवला होता.

मात्र खुनाला वाचाच फुटत नसल्याने अखेर कामती पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अंकुश माने यांनी रेखाचित्र तयार करून ते प्रसिद्ध केले आहे. याबाबत कामती पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार ३० जानेवारी रोजी हिंगोली शिवारात एका २५ ते ३० वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह उसाच्या फडात आढळून आला होता चेहरा पूर्ण विद्रूप आणि नग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला होता.

 

शिवाय तिच्याजवळ ना कोणतेही कपडे, ना मोबाईल ,ना कोणतीही वस्तू आढळून आली नाही. तसेच डोक्याला व छातीवर गंभीर जखमा आढळून आल्याने हा खुनाचा प्रकार असल्याचे निदर्शनात आल्यानंतर कामती पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक अंकुश माने यांनी तातडीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली तरी पण तिची ओळख पटत नसल्याने अखेर त्यांनी सुपर पोझिसेन टेकनिकच्या माध्यमातून तिचे रेखाचित्र तयार करून त्यांनी ते रेखाचित्र सोलापूर जिल्हातील सर्व पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, बस स्थानक आदी सार्वजनिक ठिकाणी व परिसरात चिटकावून ओळख पटवण्याचा पर्यंत सुरु ठेवला आहे.

 

हे रेखाचित्र ओळखणाऱ्यास शिवाय तिची माहिती देणाऱ्यास योग्य ते बक्षीस देऊ असे अंकुश माने यांनी कामती पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन केले आहे. मृतदेह आढळून आल्यानंतर महिलेच्या अंगावर डोक्याला व छातीवर जखमा आढळून आल्या मात्र तिच्याजवळ कुठल्याही वस्तू आढळून न आल्याने आरोपी पर्यंत पोहचणे आम्हाला अवघड झाले असल्याचे अंकुश माने ( पोलीस उपनिरीक्षक कामती पोलीस स्टेशन) यांनी सांगितले.

 

》 सोलापुरात घरगुती कुंटणखान्यावर धाड; एकास अटक तर पीडीतेची सुटका

 

सोलापूर : विडी घरकुलमधील आशा नगरात घरात कुंटणखाना चालवण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाला मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून एका संशयित आरोपीला अटक केली असून,पीडितेची सुटका केली आहे.

 

दिलीप सिद्धप्पा मंगरुळे (वय-४०,रा. सुनील नगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला वरील ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवले. त्यानंतर याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी वरील ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी एका पीडितेची सुटका केली. आरोपी हा पीडितेला पैशाचे आमिष दाखवून तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत तिच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेत होता. त्याच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३१ मार्चपर्यंत पोलिस कस्टडी सुनावली आहे.
ही कामगिरी मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे बजरंग साळुंखे, सहा.फौजदार राजेंद्र बंडगर,महादेव बंडगर, अ. सत्तार पटेल,अकिला नदाफ,नफिसा मुजावर, अरुणा परब, तृप्ती मंडलिक, रमादेवी भुजबळ, उषा माळगे, सीमा खोगरे, शैला चिकमळ,दादा गोरे यांनी केली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

● पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पतीसह तिघांवर गुन्हा

 

सोलापूर : चारित्र्यावर संशय घेत, वंशाचा दिवा दिला नाही म्हणत पत्नीला उपाशी ठेवल्याप्रकरणी पतीसह तिघांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी लावण्या तुळशीदास ऊर्फ विनोद मामड्याल (वय-३०, रा.साखर पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी लावण्या यांचे २०१४ मध्ये तुळशीदास ऊर्फ विनोद मामड्याल यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर पती तुळशीदास, सासू शारदा मामड्याल, सासरे श्रीनिवास मामड्याल (सर्व रा.साखर पेठ) यांनी संगनमत करून फिर्यादी लावण्या यांच्या चारित्र्यावर संशय घेत तू वंशाचा दिवा दिला नसल्याचा आरोप करीत मानसिक त्रास देत होते. शिवाय फिर्यादीस उपाशी ठेवून शिवीगाळ करत छळ केला, अशा आशयाची फिर्याद लावण्या यांनी दिली. या फिर्यादीवरून वरील संशयित आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिस नाईक चव्हाण तपास करत आहेत.

 

● पोलीस ठाण्यात जाणाऱ्या सुनेचा सासूने घेतला चावा सासूसह आठ जणांवर गुन्हा

सोलापूर : वाद झाल्याने तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात जाणाऱ्या सुनेला, सासूने चेहऱ्यावर,हाता-पायवर ओरबडत चावा घेतल्याप्रकरणी सासुसह आठ जणांवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत आयेशा रफिक शेख (वय-३४,रा. मुरारजी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी आयेशा शेख यांचे रफिक शेख याच्याशी मागच्या वर्षी विवाह झाला होता. दरम्यान सासूसोबत झालेल्या वादातून आयेशा शेख या तक्रार देण्यासाठी जाताना सासू शमा सिराज शेख यांनी आयेशा यांना शिवीगाळ करत तुला लय मस्ती आली आहे. तू माझ्या मुलीची तक्रार देण्यासाठी पोलिसात जाते का म्हणत नणंद आस्मा पठाण व सासू यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

 

शिवाय त्यांच्या चेहऱ्यावर, हाता-पायावर नखाने ओरबडले व चावा देखील घेतला तर सासरा सिराज शेख हा त्यांना मारण्यासाठी सांगत होता. यामुळे त्या रक्तबंबाळ अवस्थेत बेशूध्द होऊन पडल्या. शुध्दीवर आल्यानंतर त्यांनी माळेगाव पोलिस ठाणे गाठत घडलेली याबाबतची तक्रार दिली.

 

यात त्यांनी पती रफिक सिराज शेख,सासू शमा शेख, सासरे सिराज शेख,नणंद आस्मा पठाण,रेश्मा सिराज शेख, शब्बीर शेख,सुफीया अमिन आगा,अमीर आगा (सर्व रा. सांगवी,बारामती) यांनी घालून-पाडून बोलत शिवीगाळ करत,दमदाटी केली.शिवाय लाथाबुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादीचा जाचहाट केला,अशा आशयाची फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून सासूसह आठजणावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोलीस नाईक नरेश कामूर्ती करत आहेत

 

 

You Might Also Like

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू

TAGGED: #murder #unknown #woman #KamtiPolice #issued #drawing #not #identified #policeappeal #Solapur #Mohol, #अनोळखी #महिला #हत्या #कामती #पोलिस #जारी #रेखाचित्र #ओळख #पटेना #पोलिसाचेआवाहन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तुम्ही अदानींचा बचाव का करत आहात ? मी सतत विचारत राहणार – राहुल गांधी
Next Article राहुल गांधी … ओलांडली राज्यघटनेची हद्द, झाली खासदारकी रद्द

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?