पुणे : पुण्याच्या आळंदीत ज्ञानेश्वर मंदिरातील प्रवेशावरून दिंडीतील वारकरी आणि पोलीसांत वाद झाल्याची घटना घडली आहे. Verbal skirmishes and scuffles: Police lathi-charge Mauli Palkhi Sohala Alankapuri on Varkari in Pune यावेळी वारकऱ्यांवर पोलीसांनी सौम्य लाठीचार्ज केला. त्यामुळे इथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावरून अनेकांनी नाराजीचा सूर व्यक्त केला. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून आता पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, मोजक्याच लोकांना मंदिरात प्रवेश दिल्याने हा वाद झाला.
आषाढी वारीसाठी लाखो वारकरी आळंदीत जमले आहेत. आज रविवारी माऊलींच्या पालखीचे मुख्य मंदिरातून पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. मात्र त्यापूर्वीच आषाढी वारी सोहळ्याला गालबोट लागलं. मंदिरात प्रवेश करण्यावरून वारकरी आणि पोलीस आमने-सामने आले. वारकऱ्यांनी पोलिसांना न जुमानता मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्नात होते. तेव्हा पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक आणि झटापट झाली. यामुळं पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी सोहळ्यासाठी राज्यासह इतर राज्यातून लाखों भाविकांचा महामेळा अलंकापुरीत जमला आहे. इंद्रायणी घाट, सिध्दबेट, हैबतबाबा पायरी, पुंडलिक मंदिर, नृसिह सरस्वती महाराज मंदिर, संत जलाराम मंदिर, राघवदास महाराज, ज्ञानेश्वर भिंत, साईबाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर, पद्मावती मंदिर, गोपाळपुरा, विश्रांतवड आदी ठिकाणी भाविकांची गर्दी झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून या कृतीचा निषेध केला जात आहे.
महाराष्ट्राला वारीची ३०० वर्षाची परंपरा आहे. या तीनशे वर्षांच्या परंपरेत प्रथमच वारीच्या पवित्र परंपरेला गालबोट लागून पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठी चार्ज केलेला आहे. तीनशे वर्षांमध्ये कधीही न झालेली गोष्ट शिंदे फडणवीस सरकारने करून दाखवली आहे.
हि घटना अत्यंत निषेधार्ह आहे.#alandi pic.twitter.com/R3XaC6nnNX
— Yogiraj Dhamale Patil (@DhamaleSpeaks) June 11, 2023
आज सायंकाळी चार वाजता माउलींच्या पालखी सोहळ्याचे मुख्य मंदिरातून पंढरीकडे प्रस्थान झालं. यापार्श्वभूमीवर प्रस्थान पूर्वीची संपूर्ण तयारी पूर्ण झाल्याची माहिती देवस्थान कमिटीने दिली. अशातच वारकरी अन् पोलीस आमने सामने आले असून पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. पालखीचे प्रस्थान होण्याअगोदरच हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माऊलींच्या आषाढीवारी सोहळ्यासाठी लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. आज माऊलींच्या पालखीचे मुख्य मंदिरातून पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. मात्र त्यापूर्वीच आषाढी वारी सोहळ्याला गालबोट लागल्याचे दिसून आलं आहे.
मंदिरात प्रवेश करण्यावरून वारकरी आणि पोलीस आमने-सामने आले आहेत. वारकऱ्यांनीही पोलिसांना न जुमानता मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक आणि झटापट झाली आहे. यातूनच वारकरी अन् पोलीस आमने सामने आले असून
पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला आहे.
वाद मिटल्यानंतर माऊलींच्या मंदिरासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसंच कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि वारीला गालबोट लागू नये यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये झालेल्या वादानंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता. यानंतर वारकरी आणि पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
या पालखी सोहळ्यासाठी शेकडो पोलीस तैनात करण्यात आले आहेत. वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि सुरक्षेसाठी पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे. हा वाद पोलीस आणि वारकऱ्यांमध्येच झाल्याने पोलिसांचं नियोजन चुकल्याचं बोललं जात आहे.