Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मद्यपीने भोसकल्यामुळे पोलिस पाटील गंभीर जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

मद्यपीने भोसकल्यामुळे पोलिस पाटील गंभीर जखमी

Surajya Digital
Last updated: 2021/09/10 at 9:39 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

बार्शी : दारु पिवून शिवीगाळ, आरडाओरडा करण्यास मज्जाव केल्यामुळे मद्यपीने पोलिस पाटील आणि त्यांच्या सहकार्‍याला चाकूने भोसकल्याची घटना तालुक्यातील धोत्रे येथे घडली आहे. या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या पोलिस पाटलांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे.

याप्रकरणी जखमी सहकारी प्रविण रामचंद्र सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन हल्लेखोर सुनील उर्फ सोन्या अंकुश गुरव याच्याविरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला असून तालुका पोलिस ठाण्याचे स.पो.नि. शिवाजी जायपत्रे यांनी आरोपीस लागलीच अटक केली आहे.

आरोपी सुनील गुरव हा गावात दारु पिवून आरडाओरडा करत फिरत होता. त्यामुळे पोलिस पाटील शाहीर दत्तात्रय जाधवर हे मयूर लांडे व प्रविण सोनवणे यांच्यासह त्याच्या वस्तीवर गेले व त्यास तू शिवीगाळ, आरडाओरडा करु नकोस अन्यथा मी पेालिस ठाण्यास फोन करतो, असा दम दिला. त्यामुळे त्याने पाटील यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. पाटील यांनी त्यास उलट धक्का दिला असता तो खाली पडला.

त्यानंतर त्याने उठून आपल्याजवळील चाकू काढून बेसावध असलेल्या प्रविण सोनवणे याच्या मांडीला अगोदर भोसकले. त्यामुळे ते खाली पडले असता त्याने जाधवर यांच्याही छातीवर व पोटावर भोसकले. त्यामुळे गंभीर जखमी होवून ते खाली पडले. त्यांना इतरांनी उचलून जवळील वस्तीवरील खोलीत नेले व खोलीला आतून कडी लावून बसले असता तेथेही गुरव पाठलाग करत आला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शिवीगाळ करत आता तुम्हांला जिवंत सोडणार नाही, असे म्हणू लागला. थोड्या वेळाने तो निघून गेल्यानंतर त्यांना उपचारासाठी बार्शी येथे नेण्यात आले. तेथे त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना सोलापूरला हलविण्यात आले.

* मध्यरात्री संशयास्पदरित्या दबा धरुन बसलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

बार्शी : शहराच्या मध्यवर्ती भागात मध्यरात्रीच्या सुमारास संशयास्पदरित्या दबा धरुन बसलेल्या दोन तरुणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात पोलिस अंमलदार फिरोज मुन्नुमिया बारगीर व ज्ञानेश्वर प्रभुलिंग घोंगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स.पो.नि. ज्ञानेश्वर उदार, सपोफौ. अजित वरपे, पोलिस अंमलदार माळी, ठेंगल, घोंगडे यांचे पथक बार्शी शहरात रात्र गस्त घालत शिवाजी आखाडा येथे पोहचले असता तिथे साक्षी बिअर शॉपी लगत भिंतीच्या आडोशाला दोघे जण अंधारात दबा धरून बसलेले दिसले.

पोलिसांना पाहून ते तिथून पळुन जावू लागले. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडले. त्यावेळी रात्रीचे सव्वा एक वाजले होते. त्यांना ताब्यात घेवुन नाव, पत्ता विचारला असता प्रारंभी ते उडवाउडवीची उत्तरे देवु लागले.  नंतर त्यांनी त्यांची नावे यशराज राजेश देशपांडे  (रा. पाटील प्लॉट, बार्शी),  श्रीकांत बाळासाहेब सुरवसे  (रा. चैत्यन्य नगर उपळाई रस्ता, बार्शी)   असे नाव असल्याचे सांगीतले. त्यांना तेथे येण्याचे कारण विचारले असता समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यावरुन ते चोरीसारखा अपराध करण्याच्या उददेशाने थांबले असावेत म्हणुन त्यांना ताब्यात घेवुन पोलीस ठाणे येथे आणण्यात आले. त्यांच्या विरूध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 122 (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #PolicePatil #seriously #injured #alcohol #bite, #मद्यपी #भोसकले #पोलिसपाटील #गंभीर #जखमी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मॉक ड्रिल दरम्यान एकाचा जीव वाचवताना मंत्र्याचे निधन
Next Article मेनरोडवरील पथदिवे जेसीबीच्या साह्याने पाडणार्‍या सातजणांवर गुन्हा दाखल

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?