Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पोलिसांना पंढरपुरातील दोन बालविवाह रोखण्यात यश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

पोलिसांना पंढरपुरातील दोन बालविवाह रोखण्यात यश

Surajya Digital
Last updated: 2021/12/27 at 6:33 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

पंढरपूर :  सध्या केंद्र शासन तरुणींच्या विवाहाचे वय १८ वर्षावरुन २१ वर्षे करण्याचा कायदा करण्याच्या तयारीत आहे. असे असतानाच काल रविवारी (ता. २६) पंढरपूर तालुक्यातील दोन‌ बालविवाह पोलीसांच्या सतर्कतेमुळे रोखण्यात यश आले आहे.

पंढरपूर तालुक्यातील तिसंगी व आजोती येथे होणारे बालविवाह रोखले‌ असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.

याबाबत अधिक‌ माहिती अशी की, कण्हेरगाव (ता.माढा जि सोलापूर ) येथील एका १३ वर्षीय मुलीचा बालविवाह पंढरपूर तालुक्यातील आजोती येथील युवकाशी होणार असल्याची गोपीनिय माहिती पोलीसांना मिळाली.

उपविभागीय पोलिस अधिकारी  विक्रम कदम  यांचे मार्गदर्शनाखाली पो नि  मिलिंद पाटील, पोलीस अंमलदार परशुराम शिंदे, श्रीराम ताटे, बालाजी कदम, भराटे, तन्वी यादव यांनी सदर ठिकाणी अचानक जाऊन अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह होण्यापूर्वी रोखला.  त्या मुलीस महिला व बालकल्याण समिती सोलापूर यांचे समक्ष हजर केले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

याचबरोबर पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमध्ये अकलूज येथील एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह सोलापूर येथील युवकाशी मस्के वस्ती, तिसंगी (ता.पंढरपूर जि. सोलापूर) येथे होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली.  उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांचे  मार्गदर्शनाखाली पो नि  धनंजय जाधव,पोलीस उपनिरीक्षक केदार, पोलीस अंमलदार करचे, बाबर, सावंत, इंगोले, महिला पोलीस वाघे व राणी कडसरे यांनी तात्काळ सदर ठिकाणी जाऊन होणार बालविवाह विवाह होण्यापूर्वी थांबवून सदर मुलीला महिला व बालकल्याण समिती सोलापूर यांचे समक्ष हजर केले.

बालविवाह करणे हा बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार गुन्हा आहे. आपल्या आजूबाजूस अशा अल्पवयीन मुलींचे बालविवाह होत असल्यास तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती देण्यात यावी. माहिती कळविणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाईल. तसेच पंढरपूर तालुका व ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमध्ये पोलीसांच्या विशेष पथकाने २ अल्पवयीन मुलींचे बालविवाह होण्यापूर्वी रोखले असून सदर मुलींच्या पालकांना कायद्याची माहिती देऊन योग्य प्रकारे समुपदेशन केले आहे व मुलींना बालकल्याण समिती समोर हजर केले असल्याची माहिती विक्रम कदम (उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर) यांनी दिली.

* दारूड्या मित्रांमध्ये हाणामारी
सोलापूर :- रविवार पेठ जुना बोरामणी नाका परिसरात तिघा दारूड्यां मित्रांमध्ये हाणामारी होवून चारचाकी गाडीचे काच फोडून 15 हजाराचे नुकसान केले. ही घटना शनिवारी ( 25 डिसेंबर))  घडली.
मनोज शंकर सोलनकर (वय 28, रा. 224, कल्पना नगर, अक्कलकोट रोड सोलापूर) याने त्याचा मित्र प्रशांत बंड याला दारू पिण्यासाठी बोलावले. त्यावेळी प्रशांत याने त्याच्या सोबत त्याचा मित्र सोमलिंग फुलारी याला घेवून आला. तिघेजण मिळून दारू पिले आणि घरी परत येत असताना सोमलिंग याने एका घरावर दगड मारला. त्याला विचारले असता त्याने चापट मारली. मनोज यानेही त्याला चापट मारली. त्यावेळी प्रशांत याने पळत येवून मनोज याला म्हणाला तू माझ्या मित्राला का मारतो, असे म्हणून मनोज याचा भाऊ शिवप्रसाद याला लाथाबुक्याने मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यावेळी मनोज याचा चुलत भाऊ राजकुमार सोलनकर व भावजी गोविंद पांढरे यांनी भांडण सोडवण्यासाठी मध्ये आल्यावर त्यांनाही प्रशांत आणि सोमलिंग या दोघांनी दगडाने मारहाण केली. चार चाकी कारचे काच फोडून 15 हजाराचे नुकसान केले, अशी फिर्याद मनोज सोलनकर यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात दिली.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Police #succeed #preventing #two #child #marriages #Pandharpur, #पोलिस #पंढरपूर #दोन #बालविवाह #रोखण्यात #यश
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एसटी कर्मचाऱ्यांचे आत्महत्यांचे सत्र सुरूच, आणखी एकाने घेतला गळफास
Next Article सनी लिओनीला अटक करा! सोशल मीडियावर मागणी, ‘मधुबन’ गाणं बदलणार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?