नाशिक : इगतपुरी येथे एका रेव्ह पार्टीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मुंबई – आग्रा हायवेवरील मानस रिसॉर्टमधील स्काय ताज व्हिलातील २ बंगल्यात ही पार्टी सुरू होती. याची टीप मिळाल्यानंतर नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी टीमसह या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी अनेकजण नशेत दिसले. यात १० पुरुष व १२ महिलांचा समावेश होता, यातील ४ बॉलीवूड अभिनेत्री आहेत. पोलिसांनी २२ जणांना अटक केली आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1409192429245194243?s=19
इगतपुरीत सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर आज रविवारी (ता. २७) पहाटे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. छाप्यात पोलिसांनी कोकेन ड्रग्जसह इतर अमली पदार्थ व रोकड जप्त केली आहे. पोलिसांनी एक विदेशी महिला, मराठी व दक्षिणात्य चित्रपट क्षेत्रात काम करणार्या पाच अभिनेत्री, २ कोरियोग्राफर महिलांसह २२ जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या एका महिलेचाही समावेश आहे. पार्टीसाठी अमली पदार्थ कोठून आणले. याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक मुंबईत दाखल झाले आहे. मुंबईमधून नायजेरियन नागरिकास चौकशी ताब्यात घेतले आहे. त्यास पोलीस तपासाठी इगतपुरीत आणले आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1409123759449985025?s=19
ऑनलाईन कपडे विक्रीचा व्यवसाय चार वर्षांपासून निरज ऊर्फ अरव ललित शर्मा व सुराणा यांची ओळख आहे. पियुष शहाच्या वाढदिवासाची पार्टी देण्यासाठी शुक्रवारी (ता. २५) सकाळी विभा दिनेशभाई गोंडलिया या अरव, रुचिरा नार्वेकर आणि आकीब खान यांच्यासमवेत इगतपुरीतील स्काय ताज व्हीलामध्ये थांबले. या ठिकाणी शुक्रवारी रात्री १२ वाजता पियुषचा वाढदिवसाचा केक कापण्यात आला. दुसर्या दिवशी शनिवारी रात्री ८ नंतर रेव्ह पार्टीला सुरुवात झाली. तरुण व तरुणी मद्यधुंद व नशेत नाचगाणी, धिंगाणा करत हुक्का, चरस, गांजा व ड्रग्जची पावडरसह मादक पदार्थांचे सेवन करत होते. मध्यरात्री २ वाजता पोलिसांनी छापा टाकला.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1409116454792753157?s=19
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
https://twitter.com/SurajyaDigital/status/1409096057665904644?s=19
इगतपुरीतील दोन बंगल्यांमध्ये उच्चभ्रू वस्तीतील पुरुष व महिला अवैधरित्या पार्टी करत असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी स्काय ताज व्हीला व स्काय लगून व्हीला येथे छापा टाकला. छाप्यात पोलिसांनी ड्रग्ज व हुक्क्याचे सेवन करताना मद्यधुंद अवस्थेत २२ जण आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरुन केकेन इतर अंमली पदार्थ जप्त केले. या पार्टीत इराणची एक महिला, चित्रपट क्षेत्रातील पाच महिला सहभागी असल्याचे समोर आले. त्यात बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या एका महिलेचाही समावेश आहे. पोलिसांनी २२ जणांना ताब्यात घेतले. यामध्ये १० पुरुष व १२ महिलांचा समावेश आहे.शिवाय पोलिसांनी स्काय ताज व्हीला व स्काय लगून व्हीला येथील कर्मचार्यांना ताब्यात घेतले आहे.
* ताब्यात घेतलेल्यांची नावे
संशयित पियुष शेट्टीया, आरव शर्मा, विशाल मेहता, रोहित अरोरा, अकीब खान, वरुण बाफणा, करिश्मा, चांदणी भटिजा, श्रुती शेट्टी, रुचिरा नार्वेकर, विदेशी महिला अझार फारनुद, शनैया कौर, हिना पांचाल, अषिता, शिना, प्रिती चौधरी, कौशिकी अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1409058963061051392?s=19