अमरावती, 9 एप्रिल, (हिं.स.)।
रमजान ईद, रामनवमी झाल्यानंतर आता शहर पोलिस आगामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महावीर व हनुमान जयंतीसाठी सज्ज झाले आहे. त्यामुळे सीपी रेड्डी यांनी आज एप्रिल रोजी पोलिस आयुक्तालयाच्या सभागृहात शांतता समितीची बैठक घेतली. अमरावती शहराच्या जातीय सलोख्याचा इतिहास पाहता जयंती, उत्सवांचा काळ शांततेत पार पडले, असा विश्वास सीपी रेड्डींनी व्यक्त केला. तसेच शोभा यात्रे दरम्यान ज्वलनशील पदार्थ व शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. यासाठी रेकार्डवरील उपद्रवींवर पोलिसांची करडी नजर राहणार असल्याचे देखील सीपी म्हणाले. तसेचसोशल मिडीयावर वादग्रस्त पोष्ट अपलोड करणाऱ्यांवर थेट गुन्हे करण्याची चेतावनी सुध्दा सीपींनी दिली.
शहरात १० एप्रिलला महाविर जयंती व १२ एप्रिलला हनुमान जयंती व १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होणार आहे. या निमित्ताने शहरातील बहुतांश भागात मोठया प्रमाणात तिन्ह जयंती उत्सव साजरे करण्यात येतील. भव्य शोभा यात्रा काढण्यात येईल. ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन सुध्दा करण्यात येईल. यानिमित्ताने पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी आज पोलिस आयुक्तालयातील सभागृहात महाविर जयंती, हनुमान जयंतीवडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शांतता समितीची बैठक घेतली. बैठकीमध्ये मनपा, महावितरणसह सह सर्व संबंधीत विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जयंती उत्सवांच्या याकाळात शहरातील सर्व स्मारके पुतळे व मंदिरांची साफसफाई करण्यातयावी, अशासूचनादेखील सीपी रेड्डी यांनी दिल्या आहेत.
बैठकीमध्ये शहरातील सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रतिष्ठित नागरिक, आयुक्तालय स्तरावरील शांतता समितीचे सदस्य, आयुक्तालयातील तिन्ही डीसीपी, एसीपी व ठाणेदार, सर्व शाखेचे पोलिस निरीक्षक उपस्थित होते. अमरावती शहर शांतप्रिय असून शांतता कायम राखण्यासाठी नेहमी सर्व समाजातील लोकांनी पोलिसांना सहकार्य केले आहे. त्यानुसार अशाच प्रकारे सर्व जातीय एकोपा कायम ठेऊन आगामी सर्व जयंतींचे उत्सव शांततेत पार पाडावे, असे आवाहन सीपी रेड्डींनी उपस्थितांना केले. जयंती उत्सवाच्या काळात शहरातील पाणी पुरवठा, विजपुरवठा खंडीत होणार नाही, शहरातील साफसफाईची मोहिम नियमित सुरू राहिल, याची काळजी सर्व संबधीत विभागांनी घेण्याचे देखील सीपी रेड्डींनी सांगितले. अशा जयंती उत्सवांच्या काळात सोशल मिडीयावर अफवा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होते. शहरात असा कोणताही प्रकार घडून नये, यासाठी कुणीही कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणारे आक्षेपार्ह मॅसेज, फोटो, व्हिडीओ व्हॉट अॅप, फेसबुक, व्टिटर, इन्टाग्रामसह कोणत्याही सोशल मिडीयावर अपलोड किंवा व्हायरल केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात तात्काळकारवाईहोईल. यासाठी सायबर पोलिस ठाण्यात स्पेशल मॉनिटरिंग सेल तयार करण्यात आला असून वादग्रस्त पोस्ट अपलोड करणारा, फॉरवर्डकरणारा, त्यावर कमेन्ट करणाऱ्यासह ग्रुप अॅडमीनवरही गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा सीपी रेड्डींनी दिला आहे.