Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दिलीप मानेंना भाजपमध्ये येण्याचे आमंत्रण; शिवसेना प्रवेशाचा निर्णय चुकल्याची कबुली राजकीय सोलापूर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

दिलीप मानेंना भाजपमध्ये येण्याचे आमंत्रण; शिवसेना प्रवेशाचा निर्णय चुकल्याची कबुली राजकीय सोलापूर

Surajya Digital
Last updated: 2022/10/12 at 7:03 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

• सोलापूर : ति-हे (ता. उत्तर सोलापूर) येथील सिद्धनाथ शुगर मिल्स साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ तर झाला शिवाय या कार्यक्रमादरम्यान आ. जयकुमार गोरे आणि माजी आ. दिलीप माने यांच्यात राजकीय जुगलबंदीत रंगली. Invitation to Dilip Mane to join BJP; Political Solapur admits that Shiv Sena entry decision was wrong

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ माने कोठूनही या; मात्र विधानसभेत या■ राज्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस; महाराष्ट्रात आजही पावसाचा अलर्ट

 

या जुगलबंदीत आमदार गोरे यांनी माने यांनी मी २०२४ मध्ये पुन्हा विधानसभेत जाईन, तेव्हा माने तुम्ही माझ्यासोबत असावेत. ती इच्छा कशी पूर्ण करायची, हे मला इथली काहीच कल्पना नाही. त्यामुळे मी बाकीच्या विषयावर काही बोलणार नाही. गरज भासली तर आमच्या पक्षात बाकीच्या सर्व व्यवस्था करायला, आम्ही कुठं कमी पडणार नाही, असे सांगत त्यांनी माने यांना भाजप प्रवेशाचे आमंत्रण दिले. त्यामुळे आगामी काळात माने यांच्या राजकीय प्रवेशाबाबत विविध तर्क विर्तकांना उधाण येणार आहे.

 

कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ भाजप आमदार जयुकमार गोरे आणि राष्ट्रवादीचे नेते सदाशिव पाटील यांच्या हस्ते मोळी टाकून करण्यात आला. या कार्यक्रमात माने यांनी आ. गोरे यांच्याबरोबर असलेले मैत्रीचे किस्से सांगितले.

 

दिलीप माने म्हणाले, मी, सदाशिव पाटील आणि आ. गोरे चांगले मित्र आहोत. सदाशिव आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, तर जयकुमार गोरे हे भाजपमध्ये आहेत. माझा अजून काय पत्ता नाही. बघू पुढे. एकदा घाई करून चूक झाली आहे,’ असे वक्तव्य करून २०१९ मध्ये शिवसेना प्रवेशाचा निर्णय चुकला, अशी कबुली दिली. त्यावर आमदार गोरे म्हणाले की, माने मी सांगेन की, राजकारणात आपले अस्तित्व महत्त्वाचे असते.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

कुणाचे कितीही गणित असले तरी राजकारणात निवडून येणारे गणितच आपण मांडायचे असते. आता तुम्ही काही करा; पण निवडून येणारे गणितच मांडा. कुठे (कोणत्याही पक्षात) मांडायचे तिथे मांडा; पण निवडून येणारे गणित मांडा. आपण कोठूनही या; मात्र विधानसभेत या. तशी गरज भासली तर आमच्या पक्षात बाकीच्या सर्व व्यवस्था करायला आम्ही कुठे कमी पडणार नाही.

 

माने राजकारणात गडबड, घोटाळे होत असतात. पण, धाडस केल्याशिवाय काहीच मिळत नाही. अपयश येते, पण त्याचा फार विचार करायचा नाही. मी भाजपमध्ये आहे, त्यामुळे मी तुम्हाला भाजप प्रवेशाचे निमंत्रणच देईन, माझी काही अडचण नाही. पण, मी काय ते सांगायला येथे आलो नाही. मी भाजपमध्ये काम करतो, तेव्हा मला मनापासून आनंद होतो. खूप चांगल्या पध्दतीचा अनुभव मला भाजपमध्ये आल्याचे ते म्हणाले. आ. गोरे यांनी दिलीप माने यांना दिलेल्या आमंत्रणामुळे माने यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीबाबत पुन्हा एकदा सस्पेन्स वाढला आहे.

 

□ माने कोठूनही या; मात्र विधानसभेत या

 

आ. गोरे म्हणाले की, जाता जाता एवढेच सांगेन की, माझी एक इच्छा आहे, मी २०२४ मध्ये पुन्हा विधानसभेत जाईन, तेव्हा माने तुम्ही माझ्यासोबत असावेत. ती इच्छा कशी पूर्ण करायची, हे मला इथली काहीच कल्पना नाही. त्यामुळे मी बाकीच्या विषयावर काही बोलणार नाही. पण, आपण कोठूनही या; मात्र विधानसभेत या.. तशी गरज भासली तर आमच्या पक्षात बाकीच्या सर्व व्यवस्था करायला, आम्ही कुठे कमी पडणार नाही.

 

■ राज्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस; महाराष्ट्रात आजही पावसाचा अलर्ट

 

कोल्हापूरसह जिल्ह्यातील विविध भागात आज पावसाने चांगलेच झोडपले. अनेक ठिकाणी तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या जोरदार पावसामुळे सकल भागांसह शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. गांधीनगर वळीवडे तसेच पन्हाळा भागाला सुद्धा पावसाने चांगलेच झोडपून काढले. तर बारामतीच्या मुर्टी, मोरगाव यांसह अनेक ठिकाणी ढगफुटी पाऊस पडला. दरम्यान, अजून काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

राज्यात सध्या अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे. परतीच्या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. बीड, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, पुणे या जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला आहे. राज्यात आजही (12 ऑक्टोबर) पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार संपूर्ण कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

You Might Also Like

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

TAGGED: #Invitation #DilipMane #join #BJP #Political #Solapur #admits #ShivSena #entry #decision #wrong, #सोलापूर #दिलीपमाने #भाजप #आमंत्रण -शिवसेना #प्रवेश #निर्णय #चुकल्याची #कबुली #राजकारण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महापालिका परिवहन उपक्रमाकडील त्या वॉल्वो बसेस विका किंवा चालवा !
Next Article सोलापूरहून दिल्लीस जाण्यासाठी नवीन रेल्वेची झाली सोय, अशी आहे वेळ

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?