Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पूजा अरुण राठोडचा यवतमाळमध्ये गर्भपात, दोन्ही घटनेत 45 तासांचे अंतर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

पूजा अरुण राठोडचा यवतमाळमध्ये गर्भपात, दोन्ही घटनेत 45 तासांचे अंतर

Surajya Digital
Last updated: 2021/02/17 at 7:22 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : पूजा अरूण राठोड नावाच्या मुलीचा गर्भपात झाल्याची माहिती समोर येत आहे. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पूजाचा गर्भपात करण्यात आला. पूजा अरूण राठोड ही 6 फेब्रुवारीला पहाटे 4 वाजून 34 मिनिटांनी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. तशी नोंद अहवालात आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात  आणखी मोठी माहिती समोर येतेय. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पूजा अरूण राठोड नावाच्या मुलीचा गर्भपात झाल्याची नोंद आहे. ही पूजा अरूण राठोड हीच पूजा चव्हाण आहे का याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. पण नाव पूजा आणि त्यानंतर ह्या प्रकरणात अरूण राठोडचं असलेलं कनेक्शन यावरुन पूजा चव्हाण हीच पूजा अरूण राठोड असावी, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे.

विशेष म्हणजे मंत्री आणि अरूण राठोड यांची ही व्हायरल ऑडिओ क्लीप आहे त्यातही प्रेग्नंसीबाबत चर्चा होताना दिसते आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही नवी माहिती महत्त्वपूर्ण मानली जाते आहे. पूजा अरूण राठोड ही 6 फेब्रुवारीला पहाटे 4 वाजून 34 मिनिटांनी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली होती. तशी नोंद अहवालात आहे. तिचा वॉर्ड क्रमांक 3 होता आणि डॉ. श्रीकांत वराडे यांनी तिच्यावर उपचार केल्याचं रिपोर्टमध्ये दिसतं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* 12 ऑडिओ क्लिप आल्या समोर

मूळ परळीच्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी ती भावासोबत पुण्यात रहात होती. तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आत्महत्येशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने रितसर तक्रार दाखल केली. इतकंच नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून, चौकशीची मागणी केली. इतकं सगळं होत असताना, पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांची ऑडिओ क्लिप समोर आली. एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिपमुळे चक्रव्यूहात सापडलेले मंत्री संजय राठोड यांचं नावही उघड झाले.

* दोन्ही घटनेत 45 तासांचं अंतर

विशेष म्हणजे पूजा अरुण राठोडचा गर्भपात ते पूजा लहू चव्हाणची आत्महत्या या दोन्ही घटनांमध्ये जवळपास 45 तासांचं अंतर आहे. डॉक्टर दप्तरी नोंदीनुसार पूजा अरुण राठोडला 6 फेब्रुवारीला पहाटे 4 वाजून 34 मिनिटांनी अॅडमिट केलं होतं. पूजा वॉर्ड क्रमांक 3 मध्ये भरती होती. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गर्भपात करण्यासाठी पूजा दाखल झाली होती. तिथे पूजा अरुण राठोड असं नाव नोंदवण्यात आलं.

दुसरीकडे पुण्यात पूजा लहू चव्हाण या परळीच्या तरुणीने 7 फेब्रुवारीला मध्यरात्री दीडच्या सुमारास आत्महत्या केली. आता पूजा अरुण राठोड आणि पूजा लहू चव्हाण एकच आहेत का? एकच असेल तर गर्भपातानंतर पूजाने पुण्यात येऊन आत्महत्या केली का? ऑडिओ क्लिपमध्ये अरुण राठोडने कथित मंत्र्यांशी बोलताना पूजा आत्महत्या करण्यावर ठाम असल्याचा उल्लेख केला होता, तो याच पूजाबाबत आहे का? असे प्रश्न आहेत.

You Might Also Like

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे

शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री

महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी

TAGGED: #PoojaRathore's #abortion #Yavatmal #45hours #apart #both #cases, #पूजाराठोड #यवतमाळ #गर्भपात #दोन्हीघटनेत #45तासांचे #अंतर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बिगबीना चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवून 52 वर्षे पूर्ण, अमिताभने केले रिट्वीट
Next Article कोरोनाने चिंता वाढली, पुणे जिल्ह्यात जमावबंदी लागू

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?