नांदेड, २९ ऑगस्ट. नांदेड शहर परिसरातील पूर परिस्थिती आणि पावसाचे प्रमाण लक्षात घेता नांदेड शहरात सदर परिस्थितीचा विचार करता नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित परिसरातील विद्युत पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे.
शिवाजीनगर, श्रावस्ती नगर, आंबेडकर नगर, जय भीम नगर, नवी आबादी, स्नेहनगर, श्रीनगर, वर्कशॉप, दीपनगर व बजाज नगर या परिसरांमध्ये पूरस्थितीमुळे अनेक निवासी घरांमध्ये पाणी शिरले आहे.
प्रत्येक भागाची प्रत्यक्ष पडताळणी करून परिस्थिती सुरक्षित झाल्यानंतरच विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल. तोपर्यंत सर्व ग्राहकांनी सहकार्य करावे, असे सहाय्यक अभियंता शिवाजीनगर, महावितरण नांदेड यांनी कळवले आहे.
