Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गजानन महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन, पालखी उद्या प्रभाकर महाराज मंदिरात तर सोमवारी उपलप मंगल कार्यालयात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

गजानन महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन, पालखी उद्या प्रभाकर महाराज मंदिरात तर सोमवारी उपलप मंगल कार्यालयात

Surajya Digital
Last updated: 2022/07/02 at 8:51 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ उळे येथे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले स्वागतस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ संत गजानन महाराज पालखी आज प्रभाकर महाराज मंदिरात□ सोमवारी गजानन महाराज पालखीचे उपलप मंगल कार्यालयात होणार दर्शन

□ उळे येथे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले स्वागत

 

सोलापूर : ‘गण गण गणात बोते’ आणि विठुनामाचा जयघोष करीत शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज शनिवारी (दि.2 जुलै) सायंकाळी उळे (ता. दक्षिण सोलापूर) येथे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. Gajanan Maharaj palanquin arrives in Solapur district, palanquin tomorrow at Prabhakar Maharaj temple and Monday at Upalap Mangal office

 

जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पालखी व वारकऱ्यांचे भक्तिभावात स्वागत केले. यावेळी प्रांत अधिकारी हेमंत निकम, प्रांत अधिकारी सुमित शिंदे, उळे गावचे सरपंच अप्पा धनके, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अमोल कुंभार, मंडळ अधिकारी चंद्रकांत हेडगिरे, सुखदेव पाटील, जगदीश धनुरे यांच्यासह वारकरी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी गजानन महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. पालखीचा आजचा मुक्काम उळे येथे असून उद्या सकाळी पालखी सोलापूर शहरात प्रवेश करणार आहे.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

□ संत गजानन महाराज पालखी आज प्रभाकर महाराज मंदिरात

 

आषाढी एकादशीनिमित्त शेगाव होऊन पंढरपूरला निघालेली शेगाव संस्थानची श्री संत गजानन महाराजांची पालखी आज (रविवारी) सम्राट चौक येथील श्री सद्गुरू प्रभाकर महाराज मंदिरात येणार आहे, अशी माहिती श्री सद्गुरू प्रभाकर महाराज मंदिर ट्रस्टचे चीफ ट्रस्टी दत्तात्रय देशमुख यांनी दिली.

श्री संत गजानन महाराज पालखी सोलापूरात आल्यानंतर सकाळी ११ वाजता प्रभाकर महाराज मंदिरात येईल. या ठिकाणी श्री सद्गुरू प्रभाकर महाराज व श्री संत शेगाव गजानन महाराज यांच्या पालखी भेटीचा सोहळा होईल. श्री सद्गुरू प्रभाकर महाराज मंदिरातर्फे पालखीचे पूजन होणार आहे. श्री संत गजानन महाराजांचा आवडता पदार्थ असलेल्या पिठलं भाकरीचा नैवेद्य यावेळी दाखवला जाईल. यानंतर आरती होऊन भाविकांना दर्शन व महाप्रसाद मिळणार आहे. सोलापूरकरांनी यावेळी उपस्थित रहावे आणि दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभाकर महाराज मंदिर ट्रस्टचे चीफ ट्रस्टी दत्तात्रय देशमुख यांनी केले आहे.

 

 

□ सोमवारी गजानन महाराज पालखीचे उपलप मंगल कार्यालयात होणार दर्शन

 

पंढरपूरला आषाढी वारीसाठी निघालेली शेगाव येथील श्री गजानन महाराजांची पालखी सोमवार दि. 4 जुलै रोजी सात रस्ता येथील उपलप मंगल कार्यालयात येणार आहे, अशी माहिती उपलप मंगल कार्यालयाचे मालक ऋतुराज उपलप यांनी दिली.

कोरोनामुळे दोन वर्षाच्या काळानंतर श्री गजानन महाराजांची पालखी सोलापुरात येत आहे. सोमवार दि. 4 जुलै रोजी सकाळी 10 वाजता श्री गजानन महाराजांची पालखी उपलप मंगल कार्यालय या ठिकाणी येईल. प्रथेप्रमाणे पालखीचे स्वागत करण्यात येईल. दिवसभर पालखीच्या दर्शनाची व्यवस्था असणार आहे. पालखीसोबत येणाऱ्या वारकऱ्यांची उपलप परिवाराकडून जेवणाची आणि मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून शिरा देण्यात येणार आहे.

कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. त्यामुळे श्री गजानन महाराज पालखी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन ऋतुराज उपलप यांनी केले आहे.

 

 

 

You Might Also Like

डॉ. वळसंगकर प्रकरण : २५ दिवस लोटले तरी पोलिसांच्या हाती काहीच नाही

सोलापुरात आतापासूनच बेरजेचे राजकारण सुरू

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळ संपविण्यासाठीच खासदार झाले – प्रणिती शिंदे

सोलापूरात गुटखा मिळतोय सर्रास दुकाने-टपर्‍यांवर

भारतीय सैन्यदलापुढे पाकला गुडघे टेकावे लागले – प्रणिती शिंदे

TAGGED: #Gajanan #Maharaj #palanquin #arrives #Solapur #district #tomorrow #PrabhakarMaharaj #temple #Monday #Upalap #Mangal #office, #गजानन #महाराज #पालखी #सोलापूर #जिल्हा #आगमन #उद्या #प्रभाकरमहाराज #मंदिर #सोमवारी #उपलप #मंगल #कार्यालय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मनीष काळजेंना निष्ठेचे फळ मिळणार ? 2012 पासून एकनाथ शिंदेंच्या संपर्कात
Next Article कोणत्याच राज्यपालांनी मला पेढा भरवला नाही, नव्याने येणारी यादी राज्यपाल लगेच मंजूर करतील – शरद पवार

Latest News

रवींद्र जाडेजा आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर राहणारा पहिला खेळाडू
देश - विदेश May 14, 2025
महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती जगभरात पोहोचण्याची गरज : विष्णू मनोहर
महाराष्ट्र May 14, 2025
ऑस्कर विजेते हॉलीवूड दिग्दर्शक रॉबर्ट बेंटन यांचे निधन
देश - विदेश May 14, 2025
रेशनकार्डसाठी लाच घेणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यास पकडले, खासगी एजंटही जाळ्यात
महाराष्ट्र May 14, 2025
राज ठाकरेंच्या प्रस्तावाला आमचा आजही सकारात्मक प्रतिसाद – संजय राऊत
राजकारण May 14, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा – हर्षवर्धन सपकाळ
महाराष्ट्र May 14, 2025
सातार्‍यात ‘टेस्ला’चे युनिट येणार; जिल्ह्याच्या विकासाला चालना
महाराष्ट्र May 14, 2025
पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून मालेगावचा तरुण ताब्यात
महाराष्ट्र May 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?