Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: परिचारकांना विरोध करणारे विरोधक खरंच सक्षम आहेत का ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

परिचारकांना विरोध करणारे विरोधक खरंच सक्षम आहेत का ?

Surajya Digital
Last updated: 2023/01/02 at 1:19 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ महाराष्ट्रात 2 भयंकर ब्लास्ट

 

पंढरपूर/ सूरज सरवदे : पंढरपूर अर्बन बँकेची निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे परिचारिकांनी आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केले आहे. त्यामुळे परिचारांना विरोध करण्याचा मानस असणारे मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे परिचारकांना विरोध करणारी विरोधक खरंच सक्षम आहेत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे ? Are the opponents against Prashant Pracharak really capable Dilip Dhotre Abhijit Patil Pandharpur

 

नगरपालिका असो वा कॉरीडोर या माध्यमातून परिचारक यांना टार्गेट करणारे दिलीप धोत्रे यांच्या समविचारी पॅनलने अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र पूर्वतयारीच्या अभाव, परिचारक यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठीचे नियोजन नसणे, बँकेच्या नियमांच्या अज्ञानामुळे सर्वच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

पंढरपुरात परिचारक विरोधक मोठ्या प्रमाणावर आहेत. त्या सर्वांची एकत्रित मोठ बांधणाऱ्या नेत्याची उणीव सध्या पंढरपुरात जाणवत आहे. परिचारक विरोधी गटाची नेतृत्व सक्षम व्यक्तीकडे गेल्यास परिचारक यांना सक्षम विरोधक निर्माण होईल. अभ्यासू विश्वासू नेतृत्वाची गरज आणि पोकळी भरून काढण्याचे काम परिचारक विरोधी नेतृत्वाला करावी लागणार आहे.

स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या नंतर परिचारक यांच्या विरोधातील पोकळी निर्माण झाली आहे. मनसे आणि समविचारी आघाडी यांचा परिचारक यांच्या विरोधातील निवडणूक लढण्याचा पहिलाच प्रयोग अयशस्वी झाला आहे. त्यामुळे परिचारक विरोधात अभिजीत पाटील यांच्यासारखा सक्षम पर्याय समोर आले तर ते परिचारक यांच्याशी दोन हात करू शकतील अशी चर्चा पंढरपुरात रंगताना दिसते.

● परिचारक विरोधात अभिजित पाटील सक्षम पर्याय

 

परिचारक विरोधी मतांची मोळी बांधण्याचे काम येणाऱ्या काळात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्याकडे गेले तर एक प्रकारे परिचारक यांच्याविरोधात सक्षम पर्याय निर्माण होणार आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करून नुकताच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी आपले नेतृत्व पुन्हा सिद्ध केले आहे.

 

□ महाराष्ट्रात 2 भयंकर ब्लास्ट

 

नववर्षाच्या पहिल्याच दिवसाला महाराष्ट्रात दोन भयंकर स्फोट झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरीमध्ये फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट झाला आहे. यात 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव एमआयडीसीतील जिंदाल कंपनीतही भीषण स्फोट झाला. यात 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

You Might Also Like

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट

सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार

सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू

सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

संजय गायकवाडांना समज देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

TAGGED: #opponents #PrashantPracharak #really #capable #DilipDhotre #AbhijitPatil #Pandharpur, #पंढरपूर #परिचारक #विरोध #विरोधक #खरंच #सक्षम #दिलीपधोत्रे #प्रशांतपरिचारक #अभिजितपाटील
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पत्नीसमोर शेतकरी पतीला मोटारीतून पळवले; चौघांना अटक करण्यात यश
Next Article सोलापूर विमानसेवेचा प्रश्न सोडविण्यात खासदार सकारात्मक नाहीत – आमदार रोहित पवार

Latest News

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट
सोलापूर July 10, 2025
सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार
सोलापूर July 10, 2025
crime
सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू
सोलापूर July 10, 2025
पावसाळ्यात वाढला डेंग्यूचा धोका; सहा महिन्यात २८७ जणांना डेंग्यूची लागण
महाराष्ट्र July 10, 2025
सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
सोलापूर July 10, 2025
वडोदरा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा १५ वर; बचावकार्य सुरू
Top News July 10, 2025
मुख्यमंत्री विदर्भाचा, पण काही कामाचा नाही – बच्चू कडू
Top News July 10, 2025
ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात, 2145 वैज्ञानिक ‘नासा’मधून पडले बाहेर
Top News July 10, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?